
नासाच्या Space X Crew-11अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर एकमेकांशी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 2 ऑगस्ट
नासाच्या Space X Crew- 11अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाची अंतराळवीर Zena Cardman अंतराळवीर Mike Fincke जपानचे अंतराळवीर Kimiya Yui आणि रशियन अंतराळवीर Oleg Platonov सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत हे चारही अंतराळवीर गुरुवारी 31 जुलैला स्थानकात जाणार होते पण हवामान उड्डाणासाठी अनुकूल नसल्यामुळे हे अंतराळवीर एक दिवस उशिराने एक ऑगस्टला स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले
नासाच्या Kennedy Space center मधील 39 A ह्या ऊड्डाण स्थळावरून सकाळी 11.43 वाजता Space X Crew Dragon ह्या अंतराळविरांसह अंतराळात झेपावले ह्या मोहिमेत अंतराळवीर Zena Cardman ह्यांनी कमांडर पद Mike Fincke
ह्यांनी पायलटपद सांभाळले तर अंतराळवीर Kimiya yui आणी अंतराळवीर Oleg Platonov ह्या दोघांनी मिशन स्पेशालिस्ट पद सांभाळले
Falcon 9 राँकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावल्यानंतर काही वेळातच Dragon मधील नियोजित प्रक्रिया पार पडल्या आणि स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली Dragon राँकेट पासुन वेगळे झाले आणी अत्यंत वेगाने स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले ह्या अंतराळप्रवासा दरम्यान हे अंतराळवीर नासाच्या Florida येथील Johonson Space Center मधील टीम प्रमुखांच्या लाईव्ह संपर्कात होते

नासाच्या Space X 11अंतराळ मोहीमेतील अंतराळवीर Oleg Platonov अंतराळवीर Mike Fincke अंतराळवीर Zena Cardman आणि Kimiya Yui -फोटो -नासा संस्था
शनिवारी दुपारी 2.27 वाजता (स्थानिक वेळ) Dragon स्थानकाजवळ पोहोचले त्या नंतर स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि Space X Dragon ह्यांच्यातील Docking आणि Hatching प्रक्रिया पार पडली अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश करण्याआधी Dragon मधील लिकेज व इतर यंत्रणा तपासली त्यांनी त्यांचे स्पेससूट चेंज केले दुपारी 3.46 वाजता अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकातील अंतराळवीर Anne McClain ,Nicole Ayers ,Jony Kim आणि Takuya Onishi ह्यांनी स्थानकात त्यांचे स्वागत केले
स्थानकात प्रवेश केल्यानंतर काही क्षण ह्या अंतराळवीरांनी एकमेकांशी बातचीत केली त्या नंतर थोड्या वेळाने स्थानकातील सर्व अंतराळवीर एकत्र जमले आणि नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला त्यावेळी स्थानकाचे सध्याचे कमांडर Takuya Onishi ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले," आता तुम्हाला आमच्या सोबत काम करावयाचे आहे सध्या स्थानकात खूप काम आहे Mike आणी Kimiya तुमचे स्थानकात पुन्हा स्वागत तुमच्या पुर्वानुभवाचा आम्हाला फायदा होईल मोहीम 73 मध्ये तुमचे स्वागत ! असे म्हणत त्यांनी ह्या अंतराळवीरांना स्थानकात पोहोचल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले !"
अंतराळवीर Zena म्हणाल्या," मी खरेच निशब्ध झालेय पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करून स्थानकात पोहोचले तुमच्या स्वागताने भारावून गेले तुमचे आभार हे स्थानक इथल वातावरण अमेझिंग आहे त्या साठी ह्या माझ्या सहकारी मित्रांचे देखील आभार त्यांच्या सोबतचा प्रवास छान होता इथे येण्याची संधी दिल्याबद्दल नासा आणि Space X चे आभार आता सर्वांसोबत संशोधन करताना मजा येईल !'
Mike -,"मी चवथ्यांदा स्थानकात प्रवेश केला तेव्हा पुन्हा ह्या अंतराळातल्या माझ्या घरी आल्याचा आनंद झाला इतक्या वर्षात अंतराळवीरांनी हे स्थानक छान सांभाळले आहे आता आपण काळजी घेऊ Takuya तुमच्या स्वागताबद्दल आभार आता मिळून संशोधन करण्याची संधी मिळालीय आधीपेक्षा उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करेन ह्या मोहीम 10 मधील अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर पोहोचणार आहेत त्यांचे नातेवाईक त्यांची वाट पाहात आहेत त्यांना सुरक्षित पृथ्वीवर पोहोचण्यासाठी शुभेच्छा !
Kimiya -तुम्हा सर्वांनी आनंदाने आमचे स्वागत केले त्या बद्दल आभार !आता तुम्हा मोहीम 73 मधील अंतराळवीरांसोबत इथे संशोधन करणार आहे मी उत्कृष्ठ काम करण्यासाठी प्रयत्न करेन ह्या 11 अंतराळवीरांसोबत वास्तव्य करताना संशोधन करताना मजा येईल
Oleg -"माझ्याही अशाच भावना आहेत तुमच्या उत्साही स्वागताबद्दल आभार ! पहिला अंतराळ प्रवास,स्थानक इथल वातावरण पाहून आश्चर्यचकित झालोय असे म्हणत त्यांनी रशियावासीयांशी रशियन भाषेत संवाद साधत सर्वांचे आभार मानले !"
अंतराळवीर Zena आणी Oleg हे प्रथमच स्थानकात वास्तव्यास गेले आहेत अंतराळवीर Mike चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत तर Kimiya दुसऱ्यांंदा स्थानकात वास्तव्यास गेले आहेत हे सर्वजण आता एकत्रित स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील लवकरच मोहीम 11मधील अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
ह्या अंतराळविरांच्या launching आणी स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टि.वी वरुन करण्यात आले होते आणी हौशी नागरिकांना Virtual guest म्हणून ऊपस्थित रहाण्याची संधीही देण्यात आली होती
No comments:
Post a Comment