
नासाचे पार्कर सौर यान सूर्याच्या अंतर्गत करोना भागातून भ्रमण करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-3 जून
नासाच्या पार्कर सोलर प्रोबने 19 जुनला सुर्याच्या अंतर्गत भागात शिरून अत्यंत जवळुन 3.8 मिलीयन मैल अंतरावरून 24 वी फेरी पुर्ण केली ह्या सौर मोहिमेतील शास्रज्ञांनी नियोजित केलेली हि शेवटची फेरी होती
22 जुनला शास्त्रज्ञांनी प्रसारित केलेल्या माहिती नुसार पार्कर सोलर प्रोब सौरयान शेवटची फेरी मारून सूर्याच्या अंतर्गत कक्षेतून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले असुन हे सौरयान नियमित भ्रमण करत आहे नासाच्या सौर मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या नियोजना नुसार 2026 पर्यंत पार्कर सौरयान सूर्याच्या कक्षेत भ्रमण करून सखोल निरीक्षण करेल आणी संशोधित माहिती मिळवेल
पार्कर यान सुर्याच्या कक्षेत शिरले आणी यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली तेव्हा यानावर पृथ्वी वरील संस्थेचे नियंत्रण नव्हते पार्कर सौरयान ताशी 430,000 मैल वेगाने करोना भागाच्या अत्यंत जवळुन मार्गक्रमण करत होते ह्या आधी डिसेंबर 2024 मध्ये आणी मार्च 2025 मध्ये देखील पार्कर सौरयानाने ईतक्याच वेगाने फेरी मारली होती
विषेश म्हणजे सुर्याच्या अंतर्गत अत्यंत ऊष्ण असलेल्या करोना भागातून फेरी मारुन देखील पार्कर यान सुरक्षित बाहेर पडले ह्या सौरयानाला सुर्याच्या तीव्र ऊष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून यानाच्या Shield मध्ये Innovative Carbon Foam चा वापर करून Thermat Protection System बसविण्यात आली होती त्या मुळे पार्कर यान 1.600 ते 1700 f. (870 ते 930 c.) पर्यंत ऊष्णतेतही सुरक्षित राहुन सूर्याच्या अंतर्गत भागातून बाहेर पडू शकेल
14 जुन ते 24 जुनपर्यंत पार्कर सौरयानातील चार अत्याधुनिक यंत्रणेद्वारे सुर्याच्या करोना भागातील निरीक्षण आणी संशोधीत सायंटिफिक माहिती गोळा करण्यात आली सध्या सुरू असलेल्या सुर्याच्या अकरा वर्षाच्या सायकल मध्ये सुर्य अत्यंत Active Phase मध्ये असताना सोलर घडामोडी सौरवारे सौरवादळांची तिव्रता मोजण्यात आली सद्या सूर्याच्या अंतर्गत भागातून अत्यंत शक्तिशाली आगीच्या ज्वाळा बाहेर पडत आहेत
सुर्याच्या ह्या अंतर्गत घडामोडी दरम्यान अंतराळात प्रचंड वेगाने बाहेर पडणारे आगीचे लोट अग्नी ज्वाळांंचा हानिकारक प्रभाव पृथ्वीवर,अंतराळस्थानकात रहाणाऱ्या अंतराळवीरांवर पृथ्वीवरील Satellites Powergrid आणी Air travel करणाऱ्यांवर होतो त्या बाबतीतली संशोधीत माहितीही गोळा करण्यात आली हि माहिती अंतराळ विश्वातील भविष्य कालीन दुरवरच्या चंद्र आणी मंगळ मोहिमे साठी ऊपयुक्त ठरणार आहे
सुर्याच्या अंतर्गत भागातील मॅग्नेटिक फिल्ड मध्ये अंतराळातील प्रचंड
वेगाने वाहणारे वारे धुळ आणी हानीकारक Cosmic कीरणे आत ओढल्या जातात सर्व
जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा
पेटता गोळा आहे त्याच्या अंतर्गत भागात ज्वलनशील पदार्थ आणी हानिकारक वायूमुळे सतत
आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत
किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात
त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय
क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण
गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात
जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि
त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर
अंतराळात फेकल्या जातात
ह्या भडकत्या शक्तीशाली ज्वाळांमधून अपायकारक विनाशकारी सौर कीरणे बाहेर पडतात पृथ्वीवरील रेडिओ Communications ,Electric Power Grids,Navigation Signals अंतराळ यान आणि अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी हे सौर वादळ धोकादायक ठरू शकते
24 व्या अखेरच्या फेरी नंतरही पार्कर सौरयान आश्चर्यकारकरीत्या ठिकठाक आहे यान आणी यानातील अद्ययावत यंत्रे सुरक्षित आहेत आणी पुन्हा माहिती मिळवण्यासाठी सक्षम आहेत असे नासाच्या Washington येथील संस्थेतील पार्कर सौर मोहिमेतील Program Scientist- Arik Posner म्हणतात सध्या सुर्य त्याच्या 11व्या Cycle phase मध्ये असताना ह्या काळात सुर्यच्या आकारात helisphere मध्ये काय बदल होतात ह्या बाबतीत देखील सखोल संशोधन करण्याची हि सुवर्ण संधी आहे असेही ते म्हणतात
नासाच्या Maryland येथील Johnson Hapkins Applied Physics Laboratory (APL) मधील शास्त्रज्ञांनी पार्कर सोलर प्रोबचे डिझाईन आणी निर्मिती केली होती
No comments:
Post a Comment