
नासाच्या Axiom-4 मोहिमेतील अंतराळवीरांसह Space X Dragon मंगळवारी 5.32 a.m.ला (स्थानिक वेळ) California येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरताना फोटो -Axiom Space
नासा संस्था / Axiom Space -15 जुलै
नासाच्या Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर शुभांशु शुक्ल,Peggy Whitsonअंतराळवीर Slawosz आणी अंतराळवीर Tibor पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत हे चारही अंतराळवीर 14 जुलैला सकाळी 7.10 वाजता( EST) Space X Dragon Grace मधून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले हे अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी निघण्यापूर्वी स्थानकात त्यांचा Farewell Ceremony पार पडला
नासा संंस्था - आम्ही नासाच्या Huston संस्थेतून तुमच्याशी लाईव्ह संपर्क साधत आहोत तुम्ही आनंदी दिसत आहात तुम्ही अंतराळस्थानकाला भेट दिली आणी संशोधनात सहभागी झालात त्या बद्दल धन्यवाद आता तुमचा Farewell Ceremony सुरू होईल
Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वीवर परतण्याआधी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्रित -फोटो नासा संस्था
Takuya- "मी मोहीम 73 तर्फे Peggy,Tibor,Slawosz आणी शुभांशु तुम्हा सर्वांचे आभार मानतो आम्ही तुमच्या सोबतची कंपनी खूप enjoy केली आम्हाला खूप सारा आनंद,प्रेरणा,ऊत्साह आणखी बरेच सकारात्मक अनुभव दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमची सायंटिफिक संशोधनाबद्दलची आस्था आणी व्यावसायिकता भविष्यकालीन खाजगी मोहिमेतील अंतराळवीरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल मी आशा करतो की तुम्ही देखील आमच्या सोबतचा ईथला वास्तव्याचा काळ आनंदात घालवला असेल आणि तो अविस्मरणीय ठरेल!"
Peggy - "Thanks ! खरच आम्ही देखील तुमच्या सोबतचा हा काळ खूप मजेत घालवला तुमच्यासारख्या अनुभवी अंतराळवीरांसोबत वास्तव्य करताना,संशोधन करताना नेहमीच आनंद मिळतो आणि जे घनिष्ठ मित्र बनतात त्याच्या सोबत तर हा आनंद द्विगुणित होतो मला स्पेशली तुमचे कौतुक करावयाचे आहे तुम्ही प्रेमाने आम्हाला सहकार्य केल हा अनुभव असामान्य होता त्या साठी आभार !"
Tibor -"ह्या क्षणी मी भावुक झालोय शब्द सुचत नाहीत तरीही बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही Axiom मोहिमेतील चौघे खूप व्यस्त कार्यक्रम आणि एक द्येय घेऊन इथे आलो आणि खूप शिकायला संशोधित करायला मिळाल आम्ही इथे सायंटिफिक प्रयोग केले पृथ्वीचे सौन्दर्य फोटोबद्ध केल खूप फोटो काढत गेलो फोटो चांगले निघत गेले इथल्या झीरो ग्रॅव्हीटीतले मजेशीर प्रसंग अनुभवले त्याचे व्हिडीओ काढले,पृथ्वीवरील संस्थांशी लाईव्ह संवाद साधत लोकांना आमच्या मित्रांना,कुटुंबियांना,इथून पृथ्वीदर्शन घडवले ते आनंदित झाले त्या मुळे आमचाही उत्साह वाढत गेला मुले उत्साहित झाली इथे स्थानकात सहकारी अंतराळवीरांशी मैत्री झाली रिकाम्या वेळी आम्ही काहींना विनोदी चुटकुले सांगत हसविले आणि खूप चेष्ठा मस्करी केली आम्ही हे सार ह्या साठी केल कि आपण मानव आहोत इथे स्थानकात जगभरातून वेगवेगळ्या देशातील अंतराळवीर संशोधन करण्यासाठी एकत्र वास्तव्य करतात शांततेने कुशलतेने एकमेकांना सहकार्य करतात,मदत करतात हि वैश्विक मोहीम आहे आणि आम्ही त्यात सामील झालो मला वाटत भविष्यात हि मोहीम उत्तरोत्तर वाढत जाईल आणि त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील आम्ही परतल्यावर आपापल्या देशात त्याचा विस्तार करू आणि ह्या जगात अशक्य काही नाही हे दाखऊ तुम्हा सर्वांचे नासा,Axiom आणि आमच्या संस्थेचे आभार !"
शुभांशु - मी आता खूप वेळ बोलू शकेन मी जेव्हा Dragon मध्ये बसून इथे यायला निघालो तेव्हा वाटल नव्हत कि हि अंतराळयात्रा,ह्या सर्वासोबतच स्थानकातील वास्तव्य एव्हढ आनंदायी होईल हा स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतला अद्भुत अनुभव माझ्या मागे उभे असलेल्या अंतराळवीरांसोबतच वास्तव्य सारच अविश्वसनीय आहे ह्या अनुभवी अंतराळवीरांसोबतच वास्तव्य,संशोधन करण आनंदायी होत ह्या दोन आठवड्यात आम्ही खूप सायंटिफिक प्रयोग केले काही इतर कामे केली वेळ मिळताच स्थानकाच्या खिडकीतून पृथ्वीसौन्दर्य कामेराबद्ध केल बाहेर पहाताना हे सार जादुई वाटायच त्या साठी नासा आणि इसरो संस्थेचे आभार माझ्या कुटुंबियांच्या मित्रांच्या सपोर्ट मुळे हे शक्य झाल इसरोने सगळे प्रोटोकॅल,सायन्स आणि इतर आवश्यक गतविधी विकसित करण्यासाठी अथक परिश्रम घेतले नासा संस्थेतील पार्टनर आणि टीममधील सर्वांनी सतत लाईव्ह संपर्क साधत सहकार्य केल म्हणून हि मोहीम यशस्वी झाली त्या साठी त्या सर्वांचे आभार इथे स्थानकात विविध देशातील कुशल अनुभवी अंतराळवीर सोबत संशोधन करतात वास्तव्य करतात तेव्हा मानवतेच दर्शन घडत चाळीस वर्षांपूर्वी अंतराळवीर राकेश शर्माला विचारल होत तिथून भारत कसा दिसतो तसच मलाही विचारल मी म्हणेन इथून भारत महत्वाकांक्षी,आत्मनिर्भर,निढर आणि गौरवशाली दिसतो आणि अजूनही आपला भारत "सारे जहाँसे अच्छा आहे"!
Slawosz - स्थानकातील तुम्ही केलेल्या ह्या सुंदर पाहुणचारा बद्दल तुम्हा सर्वांचे आभार,मला अजूनही तो क्षण आठवतोय hatch ओपन झाल्यावर मी तरंगत स्थानकात पहिल्यांदा प्रवेश केला आणि तुम्ही मला स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पाहायला सांगितल पृथ्वीच्या अलौकिक सौन्दर्य दर्शनाचा तो अद्भुत क्षण कायम माझ्या स्मरणात राहील इथे वास्तव्य करणाऱ्या सर्वच अंतराळवीरांनी आम्हाला आमची मोहीम पूर्ण करण्यासाठी सहकार्य केल हे यश तुमच्याशिवाय शक्य नव्हत आमच्या पोलंड देशातील ESA ,NASA आणि Axiom संस्थेतील सहभागी सर्वांचे आभार इथे स्थानकात सर्व देशातील अंतराळवीर वास्तव्य करीत एकत्रित संशोधन करतात हे स्थानक सांभाळतात Labrachis जतन करतात हे प्रशंसनीय आहे तुमच्या सोबत इथल्या झिरो ग्रॅविटीत संशोधन करताना अस वाटत कि अंतराळाला सीमा नाही अंतराळविश्वाच भविष्य उज्वल आहे इथे नवनवीन संशोधित Technology विकसित होतील नवीन Space Stationsची निर्मिती होईल "!

स्थानकातून परतण्याआधी Axiom -4 मोहिमेतील अंतराळवीरांच्या Farewell Ceremony कार्यक्रमानंतर अंतराळवीर एकमेकांचा निरोप घेताना -फोटो Axiom Space
त्यानंतर स्थानकाचे कमांडर Takuya ह्यांनी हा चारही अंतराळवीरांना तुमचा अंतराळप्रवास सुरक्षित आणि सुखाचा होवो अशा शुभेच्छा दिल्या आणि सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला आणि चारही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले त्यानंतर Dragon मधील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणी Dragon
सुरक्षित पणे स्थानकापासून वेगळे झाले काही वेळातच सर्व प्रक्रिया
व्यवस्थित पार पडल्यानंतर ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासास सुरुवात
झाली आणी 22 तासांच्या अंतराळ प्रवासा नंतर मंगळवारी हे चारही अंतराळवीर
सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचले पृथ्वीच्या कक्षेत शिरल्यानंतर ग्रेस Dragon
पॅराशूटच्या साहाय्याने California येथील समुद्राच्या खाडीत ऊतरले तेव्हा California मध्ये पहाटेचे 2.31a.m.आणि भारतात दुपारचे साडेतीन वाजले होते
ग्रेस Dragon जेव्हा California येथील समुद्रात उतरले तेव्हा नासाची
रिकव्हरी टीम तेथे पोहोचली टीममधील कर्मचाऱ्यांनी Dragon ला दोरीच्या
साहाय्याने होडीला बांधून ओढत बोटी पर्यंत आणले त्यानंतर क्रेनच्या
साहाय्याने Dragon ग्रेसला उचलून बोटीवर ठेवण्यात आले काही वेळाने आवश्यक
प्रक्रिया पार पडल्या नंतर रिकव्हरी टीममधील कर्मचाऱ्यांनी Dragon चे दार
उघडले आणि ह्या अंतराळवीरांना उचलून Dragonमधून बाहेर आणले सुरवातीला
अंतराळवीर Peggy Whitson नंतर शुभांशु शुक्ल अंतराळवीर Slawosz आणि शेवटी
अंतराळवीर Tibor सुहास्य मुद्रेने सर्वांना हात दाखवुन अभिवादन करत बाहेर
पडले ह्या अंतराळवीरांना नासाच्या रिकव्हरी कॅम्प मध्ये चेकअप साठी नेण्यात आले आता आठ दिवसांनी हे अंतराळवीर त्यांच्या घरी पोहोचतील शुभांशु ह्यांचे कुटुंबीय ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवर परतण्याचा
सोहळा पाहिल्यानंतर आनंदित झाले होते
No comments:
Post a Comment