Monday, 17 March 2025

नासाच्या Space X -Crew -10 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात पोहोचले

  

 नासाच्या Space X Crew Dragon -10 मोहिमेतील अंतराळवीरांसह Endurance अंतराळयान अंतराळात झेपावताना -फोटो -नासा -संस्था

नासा संस्था -15 मार्च -

नासा आणि Space X Crew -10 मोहिमेतील नासाच्या अंतराळवीर Anne McClain अंतराळवीर Nicole Ayers जपानचे अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर Kirill Peskov हे चारही अंतराळवीर स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत ह्या आधी प्रतिकुल हवामानामुळे ह्या अंतराळवीरांचे स्थानकात जाणे लांबले होते अखेर हवामान उड्डाणासाठी अनुकूल झाल्यामुळे Space X Crew Dragon Endurance ह्या अंतराळवीरांसह स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले  

नासाच्या Kennedy Space Center Florida मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून Falcon -9 रॉकेटच्या साहाय्याने Space X Crew Dragon ह्या अंतराळवीरांसह अंतराळात झेपावले उड्डाणाआधी ह्या अंतराळवीरांची उड्डाणपूर्व प्रक्रिया पार पडली त्यांचे हेल्थ चेकअप,स्पेससूट फिटिंग चेकअप,स्पेस सूट लिकेज आणि इतर आवश्यक चेकअप करण्यात आले  त्या नंतर हे चारही अंतराळवीर उड्डाणस्थळाकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला त्यांचे कुटुंबीय,मित्र आणि नासा संस्थेतील प्रमुख हजर होते त्या सर्वांनी त्यांच्याशी काही क्षण संवाद साधला आणि त्यांना सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या 

Space X Crew Dragon आणि Falcon -9 रॉकेटचेही अंतिम चेकअप करण्यात आले हवेचे प्रेशर,लिकेज चेक केल्यानंतर हे चारही अंतराळवीर Space X Crew Dragon मध्ये आसनस्थ झाले सीट चेकअप नंतर आणि सर्व व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यावर रॉकेट प्रज्वलित झाले आणि अंतराळात झेपावले काही क्षणातच रॉकेट व्यवस्थित कार्यरत झाले आणी काही वेळात Dragon रॉकेट पासून वेगळे होण्यात यशस्वी होऊन स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले त्या नंतर Falcon -9 रॉकेटचा पुन्हा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला काही वेळातच रॉकेट पुन्हा उड्डाणस्थळी पृथ्वीवर खाली उतरले तेव्हा ह्या अंतराळयानाचा उड्डाण सोहळा पाहण्यासाठी जमलेल्या उपस्थितांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला 

 

   The crew of NASA’s SpaceX Crew-10 mission to the International Space Station poses for a photo during their Crew Equipment Interface Test at NASA’s Kennedy Space Center in Florida. The goal of the training is to rehearse launch day activities and get a close look at the spacecraft that will take them to the International Space Station.

 

नासाच्या Space X Crew Dragon मोहीम 10 चे चार अंतराळवीर स्थानकात जाण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था

अंतराळ प्रवासात अंतराळवीर नासा संस्थेच्या लाईव्ह संपर्कात होते संस्था प्रमुखांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांच्या अंतराळप्रवासा दरम्यानच्या भावना व्यक्त करण्यास सांगितले तेव्हा सर्वांनीच नासा,JAXA ,ROSCOSMOS आणि Space X संस्थेचे त्यांना हि अनमोल संधी दिल्याबद्दल आभार मानले त्यांच्या मुळेच आम्ही स्थानकात जाऊ शकतो तेथे वास्तव्य करणार आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

रविवारी 16 मार्चला 12.04 a.m.ला Space X Crew Dragon स्थानकाच्या Hormony Module जवळ पोहोचले  आणि 1.45a.m.ला स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ह्या अंतराळवीरांनी एकामागून एक स्थानकात प्रवेश केला तेव्हा स्थानकात सध्या वास्तव्यास असलेल्या सर्व अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले अंतराळवीर सुनीता विल्यम्स ह्यांनी नेहमीप्रमाणे ह्या अंतराळवीरांचे नाचत जोशात स्वागत केले काही वेळातच ह्या अंतराळवीरांचा स्थानकातील Welcome Ceremony पार पडला तेव्हा नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादा दरम्यान पुन्हा एकदा ह्या अंतराळवीरांनी नासा आणि इतर संस्थेचे आभार मानले आणि त्यांच्या कुटुंबियांचे मित्रांचे त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल धैर्याबद्दल आभार मानत आम्ही सुखरूप पोहोचल्याचे सांगितले नासामधील त्यांच्या टीमचेही त्यांनी दिलेल्या ट्रेनींग बद्दल आभार मानले 

 The four SpaceX Crew-10 members and the seven Expedition 72 crew members join eahc other for a welcoming ceremony shortly after the SpaceX Dragon crew spacecraft docked and the hatches opened.

Space X -Crew -10 मोहिमेतील नासाचे अंतराळवीर Anne mcClain,Nichole Ayers,जपानी अंतराळवीर Takuya Onishi आणि रशियन अंतराळवीर kirill Peskov स्थानकातील सर्व अंतराळवीरांसोबत Welcome Ceremony दरम्यान -फोटो नासा संस्था

 हे चारही अंतराळवीर प्रोफेशनल पायलट असल्याने हि मोहीम वैशिष्ट्यपुर्ण होती ह्या मोहिमेच्या कमांडर Anne दुसऱ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेल्या आहेत ह्या आधी 2018 मध्ये नासाच्या अंतराळ मोहीमेत त्या 58-59च्या Flight Engineer होत्या आणि  Soyuz MS -11मधून स्थानकात वास्तव्यास गेल्या होत्या त्यांनी 204 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि त्या दरम्यान त्यांनी स्थानकाच्या कामासाठी दोनवेळा स्पेसवॉक केला होता त्यांनी वेगवेगळ्या वीस SpaceCraft मधून उड्डाण केले आहे स्थानकात  दूसऱ्यांदा प्रवेश करताना इतक्या अंतराळवीरांना एकत्र पाहून आनंद झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली जपानी अंतराळवीर Takuya Onishi ह्यांनी देखील दुसऱ्यांदा स्थानकात प्रवेश केल्याचा आनंद झाल्याचे सांगितले नासाची अंतराळवीर Nicole आणि रशियन अंतराळवीर Kirill ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असल्यामुळे तो आनंद अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले

हे चारही अंतराळवीर आता अंतराळ मोहीम 72-73 मधील अंतराळवीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या अंतराळस्थानकातील अंतराळवीरांची संख्या 11 झाली असून 17 मार्चला Space X-9 अंतराळ मोहिमेतील दोन अंतराळवीर Nick Hague ,रशियन अंतराळवीर Aleksandr Gorbunov सोबत अंतराळवीर सुनीता विल्ल्यम्स आणि Butch Wilmore पृथ्वीवर परततील

Saturday, 8 March 2025

Blue Origin NS-31 मोहिमे अंतर्गत फक्त महिलांना अंतराळ पर्यटन घडवणार

 Headshots of the six NS-31 crewmembers.

 

\Blue Origin-8 मार्च

Blue origin च्या New Shepard अंतराळयानातुन मोहीम 30 चे अंतराळयात्री अंतराळ पर्यटन करून पलतल्यानंतर आता Blue Origin co.ने मोहीम 31मधील सहा अंतराळप्रवाशांची घोषणा केली असून विशेष म्हणजे ह्या सर्व कर्तुत्ववान महिला आहेत

ह्या मोहिमेत Aisha Bove,Amada Nguyen,Gayle King,Katy Perry,Kerianne Flynn आणी Lauren Sanchez ह्या अंतराळप्रवाशी महिलांचा समावेश आहे ह्या सर्व महिला कर्तबगार आहेत आणी त्यांनी त्यांच्या क्षेत्रात सन्मान प्राप्त केला आहे ह्या महिला टिमचे नेतृत्व Lauren ह्यांच्या कडे सोपविण्यात आले आहे पृथ्वीबद्दलच्या त्यांच्या  दृष्टीकोनाला आव्हान देणाऱ्या,भावी पीढीला सक्षम करणाऱ्या त्यांच्या कथा शेअर करणाऱ्या आणी युवा पीढीला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना नेतृत्व करण्याचा बहुमान देण्यात आला आहे 

Aisha Bove -  Rocket Scientist, Entrepreneur & Global Stem Advocate -सध्या नासा संस्थेत कार्यरत आहेत आणी Stem Board Engineer फर्मच्या CEO आहेत  अल्पावधीत विस्तारलेल्या आणि आर्थिक दृष्टया नावारूपाला आलेल्या ह्या फर्मला अमेरिकेतील पहिल्या पाच हजार नामांकित कंपन्यांच्या यादीत दोनदा स्थान मिळाले आहे त्या LINGO cdtech co.च्या संस्थापकही आहेत त्यांच्या संस्थेत गरजु हुशार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते बहामियन वंशाच्या Aisha ह्यांना अंतराळविश्वाचे लहानपणापासूनच आकर्षण आहे त्यांचा कॉलेज ते अंतराळापर्यंतचा प्रवास जगभरातील युवा पीढीला त्यांचे स्वप्न साध्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल 

Amanda Nguyen  - Bioastronautics Research Scientist आहेत त्यांनी Harward center Astrophysics MIT NASA & International Institute of Astronautical Sciences येथे संशोधन केले नासाच्या Kepler Exoplanet Mission ह्या नासाच्या शेवटच्या STS-135 शटल मोहिमेतही त्यांनी काम केले आहे त्यांनी अनेक शोषित अत्याचार ग्रस्त महिलांना न्याय मिळवून दिला म्हणून त्यांना Time तर्फे Woman Of the Year पुरस्काराने गौरविण्यात आले शिवाय त्यांचे नोबेल शांती पुरस्कारासाठी नामांकन झाले होते ह्या अंतराळ पर्यटनानंतर व्हिएतनाम आणी आग्नेय आशीयाई देशातील अंतराळ प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरतील  त्यांच्या ह्या टिममधील सहभागामुळे व्हिएटनाम आणी युनायटेड स्टेटस मध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील

Gayle King -ह्या पुरस्कारप्राप्त पत्रकार ,CBS Morning च्या Co Host,Oprah Daily editor आणी Siris -XM radio वरील Gale king in the house कार्यक्रमाच्या Host आहेत गेल्या दशकभरात त्यांची ओळख एक संवेदनशील  प्रतिभावंत धाडसी पत्रकार,उत्कृष्ट संभाषण कौशल्य असलेली मुलाखतकार अशी आहे ह्या दहा पहिल्या कर्तृत्वान महिला फ्लाईट टीममध्ये सहभागी झाल्यामुळे त्या त्यांच्या Comfart Zone मधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक आहेत

Katy Perry -115 बिलियन पेक्षाही जास्त विक्री होणाऱ्या संगीत कलाकारांपैकी सर्वाधिक मागणी असलेल्या महिला जागतिक पॉप सुपरस्टार आणी युनिसेफच्या सदिच्छादूत आहेत,मुलांच्या आरोग्य ,समानता,शिक्षण आणि संरक्षणासाठी काम करणाऱ्या त्या परोपकारी कार्यकर्ता आहेत त्यांचे स्वतःचे Firework foundation आहे त्याद्वारे त्या गरजू उदयोन्मुख युवा पिढीला प्रोत्साहित करतात ह्या महिला टीममध्ये सहभाग मिळाल्यामुळे सन्माना बरोबरच त्यांचे हे अंतराळ पर्यटन त्यांच्या मुलीला आणि अंतराळ प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना त्यांचे स्वप्न कृतीत आणण्यासाठी प्रोत्साहित करेल असे त्या म्हणतात

kerianne Flynn -फॅशन आणि मानव संसाधन क्षेत्रात त्यांनी यशस्वी कारकीर्द केली आहे त्या Allen Stevenson School (High line &Hudson River Park)  Board मध्ये दहा वर्षांपासून कार्यरत आहेत शिवाय त्या कथाकथना द्वारे महिला समुपदेशन करतात हॉलिवूड मधील महिलांचा शोध घेणाऱ्या ऐतिहासिक पुस्तक लेखिका This Changes Everything (2018) ह्या  विचार प्रवर्तक चित्रपटाच्या निर्मात्या आहेत Lili Ledbetter ह्या शोषित महिलांच्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणाऱ्या महिला वकिलाच्या सन्मानार्थ हा चित्रपट आहे त्यांना साहसाचे आणि अंतराळ विश्वाचे आकर्षण आहे त्यांना आशा आहे कि ,त्यांचे हे अंतराळ उड्डाण त्यांचा मुलगा Dex आणि युवा पिढीला  त्यांचे द्येय साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करेल 

Lauren -Emmy Award Winning Journalist,New Yark Times च्या लेखिका,पायलट,Bezos Earth Fund च्या उपाध्यक्षा आहेत  2016 मध्ये त्यांना Helicopter Pilot  परवाना मिळाला त्यांनी Black Ops Aviation ची स्थापना केली त्या स्वत: च्या मालकीची हवाई चित्रपटआणि निर्मिती संस्था स्थापित करणाऱ्या पहिल्या महिला आहेत 2024 New Yark Times मध्ये त्यांचे सर्वाधिक विक्री होणारे मुलांचे The Fly Who Fly To Space पुस्तक प्रकाशित झाले 2024 मध्ये त्यांना उत्कृष्ट Helicopter विमान चालक व्यावसायिक म्हणून Elling Halvorson Vertical Hall Of Fame Award ने सन्मानित केले आहे त्यांचे ह्या पर्यटनाद्वारे भावी पिढीला प्रोत्साहित करण्याचे द्येय आहे 

ह्या सर्व महिला अंतराळ प्रवाशांची अंतराळ पर्यटनाची तारीख निश्चित झाली नाही मात्र नावे घोषित झाली आहेत

Wednesday, 5 March 2025

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील Firefly Blue Ghost अंतराळयान चंद्रभुमीवर सुरक्षीतपणे ऊतरले

 First image captured by Firefly's Blue Ghost lunar lander, taken shortly after confirmation of a successful landing at Mare Crisium on the Moon's near side. This is the second lunar delivery of NASA science and tech instruments as part of the agency's Commercial Lunar Payload Services initiative.

 नासाच्या आर्टीमस मोहिमेतील Firefly Blue Ghost अंतराळयान चंद्रभूमीवर उतरताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 मार्च

नासाच्या आर्टिमस मोहीमेतील Firefly कंपनीचे Blue Ghost अंतराळयान रविवारी दोन मार्चला सकाळी 3.34 मिनिटाला चंद्रभुमी वरील ऊत्तर पुर्व भागातील 300 मैल अंतराच्या ज्वालामुखी प्रवण क्षेत्रातील Marecrisium मधील Mons Latreille येथे सुरक्षीतपणे खाली ऊतरले 

आर्टीमस मोहीमेतील सहभागी Firefly संस्थेने बनविलेले Blue Ghost Lunar Lander अत्याधुनिक दहा सायंटिफिक ऊपकरण चाचणीसाठी 15 जानेवारीला नासाच्या Kennedy Space center Florida येथील ऊड्डाण स्थळावरुन चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले होते आणि 45 दिवसांच्या ह्या चंद्र मोहिमेतील 15 व्या दिवशी यानाने पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत सुरक्षित प्रवेश करून हि मोहीम यशस्वी केली होती 

30 जानेवारीला Blue Ghost चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचताच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि यानाने चंद्राच्या कक्षेत डिसेंट प्रवेश केल्यानंतर Blue Ghost यानातील Stereo कॅमेऱ्यांच्या साहाय्याने चंद्रकक्षेत शिरतानाचे फोटो ह्या यानाने पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या यानात सहा Stereo कॅमेरे फिक्स केलेले असून त्यातील चार Short Focal Length कॅमेरे आहेत आणि दोन Long Focal Length कॅमेरे आहेत ह्या फोटो आणि व्हिडिओ मुळे शास्त्रज्ञांना Blue Ghost यानाच्या चंद्रकक्षा प्रवेश प्रक्रियेच्या वेळची आधीची आणि नंतरची तेथील स्थिती तसेच चंद्राच्या आसपासच्या वातावरणातील त्यावेळेस झालेल्या परिणाम बदलाची स्थिती समजण्यास मदत होणार आहे 

आता Blue Ghost चांद्रयान चंद्रभूमीवर चंद्रावरील एक दिवस म्हणजे 14 दिवस मुक्काम करेल Blue Ghost यान चंद्रावर पोहोचल्याने आता त्यातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि ह्या यानातील सायंटिफिक उपकरणे आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतल्या जाईल यानातील रोबोटिक आर्म,हॅमर आणि इतर उपकरणाद्वारे चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील जमिनीची उत्खनन क्षमता उत्खनना नंतरची तेथील खडक,माती,वाळू ,मिनरल्स आणि इतर गोष्टीचे नमुने घेऊन ते व्यवस्थित गोळा करण्याची क्षमता चेक केल्या जाईल चंद्रावरील वातावरणातील संशोधित माहिती,जागतिक Navigation Satellite system ,Radiation Tolerant Computing क्षमता चेक केल्या जाईल नविन तंत्रज्ञान वापरून चंद्रावरील चिकट धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपकरणाची कार्य क्षमता तपासण्यात येईल हि धूळ झटकण्यासाठी आणि अंतराळयान व अंतराळवीरांच्या स्पेससूटचे ह्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठीच्या ह्या नवीन यंत्रणेची यशस्वीता चेक करण्यात येईल ह्या संशोधित माहितीमुळे अंतराळातील हानिकारक कॉस्मिक किरणे आणि इतर वायूपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत होईल 

Firefly Blue Ghost ची हि मोहीम यशस्वी झाल्यामुळे नासाचे Acting Administrator Janet Petro ह्यांनी आनंदित प्रतिक्रिया व्यक्त केली," नासा संस्था आणि अमेरिकेतील व्यावसायिक कंपनीच्या साहाय्याने शुभारंभ झालेल्या ह्या मोहिमेच्या यशामुळे अंतराळ विश्वातील भविष्यकालीन अंतराळ मोहीम सुरक्षित होईल आणि ह्या अंतराळयानाने गोळा केलेली संशोधित माहिती आगामी आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीरांसाठी त्यांच्या सुरक्षित अंतराळ प्रवासासाठी उपयुक्त ठरेल आधीच्या अपोलो मोहिमेतील त्रुटी दूर करून यानात नवीन technology आणि यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे ह्या यंत्रणेच्या चाचणी यशस्वीतेनंतर यानाची सुरक्षितता दीर्घकालीन वापरण्यासाठीची योग्यता आणि अंतराळवीरांची सुरक्षितता निश्चिती होईल

Friday, 28 February 2025

Blue Origin NS-30 मोहीमेतील सहा अंतराळ प्रवासी अंतराळ पर्यटन करून परतले

 

 Blue Origin च्या NS -30 अंतराळ पर्यटन मोहिमेतील अंतराळ प्रवाशी -फोटो -Blue Origin

 Blue Origin - 25 फेब्रुवारी 

Blue Originच्या  New Shepard अंतराळ यानाने मानवी अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत आजवर नऊ वेळा धाडसी नागरिकांना अंतराळ प्रवास घडवला आहे आणि आता दहाव्यांदा  Blue ओरीजिन ने  NS-30 अंतराळ पर्यटन मोहिमे अंतर्गत सहा धाडसी अंतराळ प्रवाशांना 25 फेब्रुवारीला अंतराळ पर्यटन घडवले आहे 

Blue ओरिजिन च्या NS -30 ह्या मोहिमेत Lane Bess, Jesus Calleja,Elaine Chia Hyde,Dr.Richard Scott, भारतीय वंशाचे Tushar Shah आणी एका धाडसी प्रवाशाचा समावेश होता हे सहाही अंतराळ प्रवासी 25 तारखेला मंगळवारी Blue Origin च्या West Texas येथील उड्डाण स्थळावरून सकाळी 9.30 वाजता अंतराळ पर्यटनासाठी निघाले ह्या सर्व अंतराळ प्रवाशांना घेऊन New Shepard अंतराळयान रॉकेटच्या साहाय्याने अंतराळ पर्यटनासाठी अंतराळात झेपावले 

 New Shepard अंतराळयान उड्डाणानंतर काही मिनिटातच अंतराळात पोहोचले आणि अंतराळातील पृथ्वी आणि अंतराळ ह्यांची सीमारेषा असलेली karman line भेदून अंतराळात प्रवेशले अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचताच ह्या अंतराळ प्रवाशांनी आनंदाने जल्लोष केला  आणी अंतराळयानात तरंगण्याचा अद्भुत आनंद अनुभवला त्या वेळी सर्वांच्या तोंडून ,"Oh! My God! Awesome! Space Is So Black ! Amazing Feeling! Earth Is So Beautiful !" अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या आणि अवघ्या दहाबारा मिनिटांचा अंतराळ पर्यटनाचा हा अद्भुत अनुभव घेऊन हे सर्व प्रवासी पृथ्वीवर परतले 

त्यांच्या स्वागताला त्यांचे नातेवाईक व Blue Origin संस्थेचे Vice President Phil Joyce हजार होते ते म्हणाले ," आमच्या ह्या अंतराळ पर्यटन मोहिमेमुळे जगभरातील उद्योजक,सायंटिस्ट,डॉक्टर्स आणि धाडसी नागरिकांना अंतराळ पर्यटन करता येते अंतराळातून पृथ्वीकडे पाहण्याचा आनंद घेता येतो,अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीचा अनुभव घेता येतो अंतराळ पर्यटनानंतर पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या आनंदित प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला  आवडतात त्या आम्हाला प्रेरित करतात आम्ही धाडसी नागरिकांना पृथ्वीवरून अंतराळ प्रवासासाठीचा मार्ग तयार करतो

Lane Bess दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनासाठी गेले होते 19 डिसेंबर 2021मध्ये NS -19 मोहिमे अंतर्गत ते अंतराळ पर्यटनासाठी गेले होते मी दुसऱ्यांदा अंतराळ पर्यटनासाठी गेलो होतो हा अद्भुत आनंद,हा अनुभव पुन्हा:पुन्हा घ्यावासा वाटतो जगाकडे बघण्याचा दृष्ठीकोन बदलतो पृथ्वी सौन्दर्य अलौकिक आहे पायलट असलेल्या Elaine ह्यांना  लहानपणापासूनच Space Program पाहण्याची आवड होती त्यांचे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते त्या म्हणतात मी पायलट असल्यामुळे आजवर अनेकदा आकाशात भरारी मारली आहे आकाशातील ग्रह तारे पाहिले आहेत मला तिथे जायची इच्छा होती लहानपणी अंतराळविश्व मला भुरळ पाडायच म्हणूनच मी पायलट झाले तिथे प्रत्यक्षात जाऊन पाहण्याच अनुभवण्याच,उड्डाण करण्याच माझ स्वप्न होत ते आज पूर्ण झालय! हा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो 

सर्वांनीच अंतराळातून पृथ्वीच सौन्दर्य अलौकिक दिसत आणि तिथून पृथ्वीकडे पाहताना विचारांची दिशा बदलते वेगळा दृष्ठीकोन मिळतो असे सांगितले आम्हाला ह्या क्षणी आमच्या भावना व्यक्त करताना शब्द सुचत नाहीत आम्ही खूप आनंदी झालो आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली 

 

 ह्या सहाही अंतराळ प्रवाशांना ते अंतराळपर्यटनाहून परतल्यावर ते अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट आणि त्यांच्या कर्तृत्वाचे वैशिष्ठ असलेले गौरव चिन्ह कोरलेला Patch देण्यात आला

Saturday, 22 February 2025

नासाच्या Space X-Crew -10 मोहीमेतील चार अंतराळवीर मार्चमध्ये स्थानकात वास्तव्यास जाणार

Official crew portrait for NASA’s SpaceX Crew-10 mission with NASA astronauts Anne McClain and Nichole Ayers, JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Takuya Onishi, and Roscosmos cosmonaut Kirill Peskov.

 नासाच्या Space X Crew -10 अंतराळ मोहीमेतील सहभागी रशियन अंतराळवीर Kirill Peskov ,नासाचे अंतराळवीर Nichole Ayers ,Anne MacClain आणि जपानच्या अंतराळवीर Takuya Onishi -फोटो -नासा संस्था

 

नासा संस्था- 21 फेब्रुवारी 

नासाच्या Space X-Crew -10 मोहीमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर Anne Mcclain,अंतराळवीर Nicole Ayers जपानचे अंतराळवीर Takuya Onishi आणी रशियन अंतराळवीर Kirill Peskov हे चारजण मार्च महिन्यात स्थानकात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी जाणार आहेत 

अंतराळवीर Anne McClain ह्या मोहीमेचे कमांडर पद सांभाळणार असुन अंतराळवीर Nichole Ayers पायलटपद सांभाळणार आहेत जपानचे अंतराळवीर Tukuya Onishi आणी रशियन अंतराळवीर Kirill Peskov हे दोघे ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम सांभाळणार आहेत 

हे चारही अंतराळवीर नासाच्या Florida येथील Space Center मधील 39 A ह्या ऊड्डाण स्थळावरुन स्थानकात जाण्यासाठी ऊड्डाण करतील Space X Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह 12 मार्च़ला संध्याकाळी 7.48 ला Falcon 9 rocket च्या सहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावेल 

नासाचे अंतराळवीर Nichole Ayers आणी रशियन अंतराळवीर Kirill Peskov हे दोघे पहिल्यादाच अंतराळस्थानकात रहायला जाणार असल्याने त्यांचा हा पहिलाच अंतराळ प्रवास आहे नासाच्या अंतराळवीर Anne MacClain आणी जपानचे अंतराळवीर Tukuya Onishi ह्यांची मात्र हि दुसरी अंतराळवारी आहे ते दुसऱ्यांंदा स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत सध्या हे अंतराळवीर Florida येथील नासा संस्थेत उड्डाणपूर्व अंतिम तयारीत  व्यस्त आहेत

हे अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यावर अंतराळ मोहीम 73 मधील अंतराळवीरांसोबत तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होतील आणि त्या नंतर Space X Crew -9 चे अंतराळवीर पृथ्वीवर परततील त्यांच्या सोबत अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore ह्यांनाही परत आणण्याचा नासा संस्थेत  विचार सुरु आहे

Wednesday, 12 February 2025

नासाच्या आर्टीमस मोहिमेतील Firefly Blue Ghost चांद्रयानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

 This image from the short focal length camera, shows a can-like structure which is Blue Ghost’s main engine. The bright objects to the engine’s right and to the left are the lander’s foot pads. The pointed object at the top left is another NASA payload, the Lunar Instrumentation for Subsurface Thermal Exploration with Rapidity (LISTER) instrument, led by Honeybee Robotics, a Blue Origin company, headquartered in Longmont, Colorado. LISTER is designed to measure the heat flow from the interior of the Moon.

नासाच्या आर्टीमस मोहिमेतील Firefly Blue Ghost अंतराळयान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना यानातील कॅमेऱ्यांनी घेतलेला फोटो -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 10 फेब्रुवारी

आर्टीमस मोहीमेतील सहभागी Firefly संस्थेने बनविलेले Blue Ghost lunar lander ने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला आहे  Blue Ghost Lunar Lander चंद्र भुमीवरील संशोधीत माहिती गोळा करण्यासाठी बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक दहा सायंटिफिक ऊपकरण चाचणीसाठी 15 जानेवारीला नासाच्या Florida येथील Kennedy Space center मधील ऊड्डाण स्थळावरुन चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले होते आता Blue Ghost चंद्रयानाच्या 45 दिवसांच्या ह्या मोहिमेतील 15 व्या दिवशी यानाने पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत सुरक्षित प्रवेश करून हि मोहीम यशस्वी केली आहे 

 30 जानेवारीला Blue Ghost चांद्रयान चंद्राच्या कक्षेजवळ पोहोचताच यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि यानाने चंद्राच्या कक्षेत डिसेंट प्रवेश केला आणि यानातील Stereo कॅमेऱ्यांच्या साहाय्याने चंद्रकक्षेत शिरतानाचे फोटो पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठविले ह्या यानात सहा Stereo कॅमेरे फिक्स केलेले असून त्यातील चार Short Focal Length कॅमेरे आहेत आणि दोन Long Focal Length कॅमेरे आहेत ह्या फोटो आणि व्हिडिओ मुळे शास्त्रज्ञांना Blue Ghost यानाच्या चंद्रकक्षा प्रवेश प्रक्रियेच्या वेळची आधीची आणि नंतरची तेथील स्थिती तसेच चंद्राच्या आसपासच्या वातावरणातील त्यावेळेस झालेल्या परिणाम बदलाची स्थिती समजण्यास मदत होईल 

आर्टीमस मोहिमे अंतर्गत चंद्रावर पोहोचणाऱ्या ह्या नव्या अद्ययावत अंतराळयानांमुळे आणि यानातील संशोधित अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणामुळे चंद्रावरील संशोधन करण्यास शास्त्रज्ञांना आणि भविष्यकालीन अंतराळवीरांना फायदा होईलच शिवाय नवीन तंत्रज्ञानही चंद्रावर पोहोचेल आणि यानाची सुरक्षितता,उपयुक्तता आणि यानातील अत्याधुनिक सायंटिफिक उपकरणांची चाचणी घेतल्या जाईल आणि अशा मोहिमांमुळे भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांचा अंतराळप्रवास सुरक्षित होण्यास त्यांना संशोधन करण्यास मदत होईल 

Blue Ghost अंतराळयानातील स्वयंचलित अत्याधुनिक उपकरणाची आणि टेकनॉलॉजिची कार्यक्षमता चाचणी यानाच्या चंद्र प्रवेशामुळे यशस्वी ठरली आहे शिवाय यानातील कॅमेरे देखील व्यवस्थित कार्यरत झाले आहेत त्यामुळे त्यांची फोटो घेण्याची क्षमता चाचणी देखील यशस्वी ठरली आहे आता 16  दिवस Blue Ghost चंद्राच्या कक्षेत  भ्रमण करेल आणि तेथील संशोधित माहिती व फोटो गोळा करून पृथ्वीवर नासा संस्थेत पाठवेल आणि नंतर ठरलेल्या वेळी सुरक्षितपणे खाली चंद्रभूमीवर उतरेल

 एकदा का Blue Ghost यान चंद्रावर पोहोचले कि त्यातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि ह्या यानातील सायंटिफिक उपकरणे आणि प्रणालीच्या कार्यक्षमतेची चाचणी घेतल्या जाईल यानातील रोबोटिक आर्म,हॅमर आणि इतर उपकरणाद्वारे चंद्रभूमीवरील आणि भूगर्भातील जमिनीची उत्खनन क्षमता उत्खनना नंतरची तेथील खडक,माती,वाळू,मिनरल्स आणि इतर गोष्टीचे नमुने घेऊन ते व्यवस्थित गोळा करण्याची क्षमता चेक केल्या जाईल चंद्रावरील वातावरणातील संशोधित माहिती,जागतिक Navigation Satellite system ,Radiation Tolerant Computing क्षमता चेक केल्या जाईल शिवाय नविन तंत्रज्ञान वापरून चंद्रावरील चिकट धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपकरणाची कार्य क्षमता तपासण्यात येईल हि धूळ झटकण्यासाठी आणि अंतराळयान व अंतराळवीरांच्या स्पेससूटचे ह्या धुळीपासून संरक्षण करण्यासाठीच्या ह्या नवीन यंत्रणेची यशस्वीता चेक करण्यात येईल ह्या संशोधित माहितीमुळे अंतराळातील हानिकारक कॉस्मिक किरणे आणि इतर वायूपासून पृथ्वीचे संरक्षण करण्यास मदत होईल

Tuesday, 4 February 2025

नासाच्या Axiom -4 व्यावसायिक अंतराळ मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यासाठी जाणार

 Axiom -4 मोहिमेतील सहभागी हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu ,इसरोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला नासाच्या अंतराळवीर Peggy Whitson आणि पोलंडचे अंतराळवीर Stawosz Uznariski -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 4 फेब्रुवारी

अमेरिकेने अंतराळ विश्वातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी आणि अंतराळयान बनविण्यासाठी व्यावसायिक कंपन्यांना परवानगी दिल्यानंतर Space X कंपनीने ह्या मोहिमेत सहभागी होत शुभारंभ केला आणि   Crew Dragon अंतराळ यानातून अंतराळवीरांना अनेकदा सुरक्षित अंतराळ प्रवास घडवीत हि मोहीम यशस्वी केली त्या नंतर Axiom Space कंपनीनेही ह्या व्यावसायिक अंतराळ मोहिमेत पदार्पण केले आणि तीनवेळा अंतराळवीरांना सुरक्षितपणे स्थानकात नेऊन आणले आता  नासाच्या Axiom -4 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 

Axiom -4 मोहिमे अंतर्गत नासाच्या अंतराळवीर आणि Axiom Space कंपनीच्या Human Space Flight Director Peggy Whitson,भारतीय अंतराळ संस्था इसरोचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला,युरोपियन अंतराळवीर Stawosz Uznanski Wisniewski (Poland ) आणि हंगेरीचे अंतराळवीर Tibor Kapu हे चार अंतराळवीर स्थानकात वास्तव्यासाठी जाणार आहेत ह्या मोहिमेत अंतराळवीर Peggy Whitson ह्या कमांडरपद तर शुभांशु शुक्ला हे पायलट पद सांभाळणार असून पोलंडचे अंतराळवीर Stawosz आणि हंगेरीयन अंतराळवीर Tibor Kapu हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळणार आहेत 

नासाच्या फ्लोरिडा येथील Kennedy Space Center येथील उड्डाणस्थळावरून हे चारही अंतराळवीर Space X Crew Dragon अंतराळ यानातून अंतराळस्थानकात जाण्यासाठी उड्डाण करतील वसंत ऋतूत हे अंतराळवीर स्थानकातील चौदा दिवसांच्या वास्तव्यासाठी जाणार आहेत आणि तिथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी होणार आहेत ह्या व्यावसायिक मोहिमेत नासा आणि भारतीय अंतराळसंस्था ह्यांच्या सहकार्याने प्रथमच इसरोचे  भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सहभागी होणार आहेत पोलंड आणि हंगेरीचे अंतराळवीर देखील ह्या मोहिमेत पहिल्यांदाच सहभागी झाले आहेत 

Ax-4 मोहिमेतील नासाच्या माजी अंतराळवीर Peggy Whitson मात्र अनेकवेळा स्थानकात वास्तव्यास गेल्या असून त्यांनी एक वर्ष सलग स्थानकात राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे त्या म्हणतात," Axiom मोहिमेतील विविध देशांच्या अंतराळवीरांसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान आहे हे अंतराळवीर बुद्धिमान आहेत अंतराळविश्वातील संशोधन करण्याचा त्यांचा दृष्टिकोन नवा आहे त्यांच्या देशाच्या ह्या व्यावसायिक सहभागामुळे आमच्या मोहिमेला संशोधन करताना मदत मिळेल अंतराळ विश्वात व्यावसायिक दृष्ठीने औद्योगिक प्रगती होईल शिवाय त्यांच्या देशातील भावी पिढीला ह्या अंतराळविश्वात करिअर करताना प्रेरणा मिळेल आणि ह्या अमर्याद अंतराळ विश्वात संशोधन करण्यासाठीची पाऊलवाट मिळेल !"

ह्या आधी 2022एप्रिल मध्ये Axiom-1 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 17 दिवस वास्तव्य केले 2023 मध्ये Axiom -2 मोहिमेत चार अंतराळवीरांसह  Peggy Whitson ह्यांनी कमांडरपद सांभाळत आठ दिवस स्थानकात वास्तव्य करीत हि मोहीम यशस्वी केली आणि 2024 च्या जानेवारी महिन्यात Axiom -3 मोहिमेतील अंतराळवीरांनी स्थानकात 18 दिवस वास्तव्य केले होते 

अंतराळातील ह्या फिरत्या अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीतील प्रयोगशाळेत गेल्या चोवीस वर्षांपासून विविध देशांचे अंतराळवीर सतत जातात,तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतात आणि नवनवीन शोध लावतात पृथ्वीवर करता येत नाहीत अशा पृथ्वी संरक्षण,मानवी आरोग्यासाठी,औद्योगिक विकासासाठीच्या संशोधनात सहभागी होतात स्थानकातील विपरीत वातावरणाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाची संशोधित माहिती गोळा करतात अंतराळस्थानक म्हणजे अंतराळविश्वातील व्यावसायिक अर्थव्यवस्था विकसित करणारी Sprigboard आहे आणि ती अधिक सशक्त करण्याचे नासाचे द्येय आहे त्यासाठी ह्या व्यावसायिक संस्थेच्या सहकार्याने अंतराळ मोहिमा कमी खर्चात सुरक्षित आणि नियमित करण्याचा नासाचा उद्देश आहे ह्याचा उपयोग भविष्यकालीन मंगळ आणि दूरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी होईल नासा संस्थेतील ISS Program Manager Dana Weigel ,म्हणतात ,"आम्ही ह्या व्यावसायिक मोहिमेच्या यशस्वी सहभागामुळे आनंदित झालो आहोत आणि Axiom च्या नियमित व्यावसायिक सेवा सुरु करण्यासाठी उत्सुक आहोत