Monday, 25 November 2013

लिटील चाम्पस

                    T. V. वर "कौन बनेगा करोडपतीचा" एपिसोड सुरु होता नेहमी प्रमाणे अभिताभ यांच्या पुढे हॉट सीट वर कोणी मोठी व्यक्ती नाही तर कौटिल्य नावाचा लिटील वंडर बसून होता. अभिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो क्षणाचाही विलंब न लावता पटापट अचूक उत्तरे देत होता ते ऐकून क्षणभर अभिताभजीही अवाक झाले. आप तो ग्यानी हो अस अभिताभजीनी म्हणताच कौटिल्य म्हणाला नाही आप ग्यानी हो आणि आप ग्यानीच हे तू,तू ,मै,मै स्टाईल म्हणण बराच वेळ रंगल आणि शेवटी कौटिल्य पुढे अभिताभजीनी हार मानली त्यान अभिताभजी सोबत लुंगी डान्सही केला खरेतर एवढ्या लहान वयातल कौटिल्यच अफाट ज्ञान,कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कमालीची स्मरणशक्ती पाहून सार जगच अचंबित झालंय. जी प्रश्नोत्तरे पाठ करायला सामान्यांना तासनतास लागतात नव्हे तीथे हा छोटा कुठल्याही प्रश्नांची विना विलंब अचूकउत्तरे देतो हा अदभुत चमत्कार म्हणावा की निसर्गाची अलौकिक देणगी हा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न . बर! अस अचाट बालवयीन ज्ञान असणारा कौटिल्य एकटाच नाही मागे एका जुळ्या बहिणीचीही बालवयातली अफाट बुद्धिमत्ता एका न्यूज चानल वरून दाखवण्यात आली होती . ह्या बालवयीन कुशाग्रतेच शास्त्रीय विश्लेषण व्हायला हवे.
              हल्लीचे लिटील champs अफलातून आहेत मग ते क्षेत्र गायन, वादन,नृत्य ,अभिनय किंवा कुठलाही कला अविष्कार असो त्यात हे लिटील champs मागे नाहीत आधी सा रे ग म प मग इंडियन idol ह्या गायनाच्या स्पर्धेत ह्या लहान मुलांची गाणी ऐकली मुग्धा वैशंपायन ,पद्मनाभ हे लोभस,गोंडस छोटे आणि कार्तिकी, प्रथमेश ,आर्या ,रोहित राउत जेव्हा ताकदीन गातात तेव्हा नवल आणि कौतुकही वाटतच कारण त्या साठीचा रियाज त्यांनी न थकता केलेला असतो.
                 डान्स इंडिया डान्स असो कि एखादा reality show त्या साठी अथक परिश्रम करावे
लागतात आणि आताचे काही डान्स प्रोग्राम मध्ये सर्कशीतल्या प्रमाणे स्टंटचा समावेश केलेला असतो अशा रियालिटी शो मध्ये कसरत करताना क्षणाचाही विलंब घातक ठरू शकतो तेव्हा ह्या कोवळ्या बालकांना timing च भान ठेवत नाचण किती कठीण ? ह्याच श्रेय ह्या लिटील champs प्रमाणे त्यांच्या कोरियोग्राफरस ला पण जात . पूर्वी शाळा कॉलेजातून किंवा कधी मधी होणारया कार्यक्रमातून शिक्षकांनी निवडलेल्या मुलांची वर्णी लागायची त्यासाठी स्टेज डेअरिंग ,अंगभूत कला गुण असण आवश्यक असे. आता सतत असे कार्यक्रम होत असतात त्या मुळे कोरिओग्रफ़र,ड्रेस डिझायनर ,Event Manager असे नवे व्यवसाय नावारूपाला आले आहेत अर्थात त्या साठी भरपूर फी देखील आकारल्या जातेय.शिवाय ह्या नव्या प्रयोगामुळे अभिजात नृत्याविष्कार कमी पहायला मिळत आहेत
                  पूर्वी अभिनय क्षेत्रात जूनिअर मेहमूद,सचिन पिळगावकर ,माष्टर राजू ,उर्मिला मंतोडकर पल्लवी जोशी ,तिचा भाऊ अलंकार अशी कितीतरी बाल कलाकार मंडळी नावारूपाला आली होती त्यांना त्या साठी खूप संघर्ष करावा लागल्याच ते मुलाखतीतून नेहमी सांगतात पण आता सहजतेन T . V सिरियलस ,जाहिरातीमधून ही बालकलाकार मुले सिनेमातही अभिनय करू लागलेत पूर्वी "जिलेबी" केल्याच आजोबांनी सांगताच पळून गेलेला छोटू घरी परततो ती जाहिरात आणि त्यातला छोटू साऱ्यांनाच आवडला होता आता असे अनेक लोभस गोंडस छोटे जाहिरात,सिरियल मधून सहजतेन वावरतात तर काही "श्वास" सारख्या सिनेमातून अंतर राष्ट्रीय स्तरावर ही पोहोचली आहेत.                          
                    ह्या नव्या पिढीन आता आणखी एक नव नवलाच पाउल उचललय ही पोर आता संजीव कपूरच्या जुनियर "माष्टर शेफ " ह्या पाककला स्पर्धेत पोहोचलीत . ज्या वयात आई कडे खाऊसाठी हट्ट करायचा ,भातुकलीच्या खेळातला लुटुपुटीचा स्वयंपाक करायचा त्या वयात हि मुले कुकरी शो मध्ये कुशलतेन खरोखरचा स्वयंपाक करताना पाहून आपल्याला थक्क व्हायला होत. हि छोटी मुले एकत्रित पणे पदार्थाची चर्चा करतात , पदार्थ बिघडला तर ,मार्क कमी मिळाले किंवा नंबर आला नाही तर हिरमुसतात ,रडतात आणि सुधारणा करत मोठयांच्या जोडीन मोठयांच्या तोडीचे पदार्थ करतात तेव्हा खरच नवल वाटत. आधीच्या पिढयांपर्यंत लहान मुलांना स्वयंपाक घरात पाऊल टाकताच बाहेर पिटाळल्या जायचं. खूपच मागे लागल तर कणकेचा गोळा अन छोट पोळपाट दिल जायचं gas जवळ हि त्यांना जाऊ दिल जात नव्हत. भातुकलीच्या खेळातही चुरमुरे, शेंगदाणे फार फार तर आई त्यांना छोटे फराळाचे करून देई आणि पोर देखील स्वत:च काम स्वत: कर म्हटल कि पळ काढत पण आताची लिटील champs संजीव कपूरच्या कृपेन स्वयंपूर्ण होऊ लागलीय अर्थात T.V. च अनुकरण छोटी मुले करतात तेव्हा gas पेटवताना भाजी चिरताना मुलांवर लक्ष ठेवण आवश्यक आहे. ह्या बाबतीत संजीव कपूरला मानायला हव त्यांनी आधी गृहिणी मग पुरुष ,तरुणाई आणि आता चक्क छोटी मुलं ह्यांना कुकरी शो तून स्वयंपूर्ण केलय.
              मागे दै. लोकसत्तात बायका पुरुषांना स्वयंपाक घरात लुडबुड करू देत नाहीत ह्या विषयावर प्रतिक्रिया मागवल्या होत्या तेव्हा मी म्हटल होत कि उलट त्या तर म्हणतील ,"या! स्वयंपाक घरात तुमच सहर्ष स्वागतच आहे वर्षानु वर्षे आम्ही ह्याच क्षणाची वाट पाहतोय कि कधी स्वयंपाक घरातून सुटका होतेय"! सुदैवान आता पुरुष हि त्यांना स्वयंपाकात हातभार लावू लागलेत आणि आता लिटील champs स्वयंपाक शिकू लागलेत म्हणजे स्वयंपाक घराचा गाडा आता खरया अर्थान चार पायावर चालू लागला तर नवल वाटायला नको.
                     सद्या सर्वत्र भ्रष्टाचार ,चोरया ,लुटालूट ह्याना उत आलाय अशा वेळेस ह्या लिटील champs ना देशासाठी लढताना धारातीर्थी पडलेल्या नौजवानांची विजयी गाथेची ओळख करून द्यायला हवी शिवाय स्वातंत्र पूर्व काळातील स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी देशासाठी शत्रूकडून छळ सोसला आणि प्रसंगी
आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या शूर वीर ,सावरकर ,वल्लभभाई पटेल ,टिळक,आगरकर,महात्मा गांधी आणि त्याही आधी शिवाजी ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,ह्याच्या कथा सांगायला हव्या त्यांच स्मरण ह्या लिटील champs ना प्रेरणादाई ठरेल.
                         नुकतीच एका छोटया मुलाने मंगळसूत्र चोराला पिटाळून लावल्याची बातमी पहिली औरंगाबाद इथल्या एका इमारतीतल्या रखवालदाराच्या छोटया मुलाने त्याच इमारतीतल्या एकामहिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळणाऱ्या चोराचा दगड मारून पाठलाग केला तेव्हा चोराने मंगळसूत्र तिथेच टाकून पळ काढला ह्या साठी त्या छोटयाच्या धैर्याच कौतुक करायला हव शिवाय त्याचा आदर्श इतरांनीही घ्यायला हव विशेषत: रोज हजारो मंगळसूत्र चोरीच्या घटना होत असताना हि गोष्ट कौतुकास्पद आहे.

Thursday, 21 November 2013

यवतमाळ येथे gas सिलिंडरची अवस्था खराब

यवतमाळ येथे सध्या ग्राहकानां वितरीत करण्यात येणाऱ्या सिलिंडरची अवस्था खराब असून सिलिंडर रंग उडालेले,चपटलेले,धुळीने माखलेले असे असून काही सिलिंडर च्या वरची रिंग थोडीशी तुटलेल्या अवस्थेत आहे असे  सिलिंडर लोकांच्या जीवाला घातक असतात मागे यवतमाळात सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना  घडली  असून देखील असे सिलिंडर वितरीत केल्या जात आहेत तरी संबंधितानी ह्या कडे लक्ष देवून लोकांना चांगले सिलिंडर देण्याची सोय करावी व खराब अवस्थेतील सिलिंडरस कंपनीने  परत घ्यावेत .नागरिकांनी तक्रार केल्यास सिलिंडर बदलून देऊ असे सांगून प्रत्यक्षात मात्र बदलवून दिल्या जात नाही.काही वेळेस गाडीत चांगले सिलिंडर असूनही ते न देता खराब स्थितीतलेच सिलिंडर घ्या नाहीतर नका घेवू अशी उत्तरे मिळतात
फोटो -पूजा दुद्दलवार -BE(Soft)BMC
                   Gas सिलेंडरची खराब अवस्था ,वरची रिंग तुटण्याच्या अवस्थेत



                          

Saturday, 16 November 2013

पडध्यामागचे फिल्मी सितारे

                  पण सध्या तरी सर्वत्र श्री आणि जान्हवीची म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ह्यांची हवा आहे त्या मुळेच बहुतांश channels वरून त्याचं दिवाळी सेलिब्रेशन , त्यांच्या आवडी निवडी ,करिअर अभिनय ह्या बद्दलची माहिती प्रसारित झाली फिल्मी सितारे मग ते कुठल्याही मालिकेतले असोत एकदा का प्रकाश झोतात आले कि पडध्या वरच त्याचं झगमगत वलय पाहून पडद्यामागे हे तारे कसे कसे असतात ,कसे वागतात ह्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते कित्येकजण तर पडद्यावरच त्याचं आयुष्य हेच त्याचं खर आयुष्य आहे अस मानु लागतात.
                           टी वी मुळे आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्मी सितारयांच पडद्या मागच आयुष्य आपण सहजतेन पाहू शकतोय आजची नवी पिढी देखील आपली पब्लिसिटी पटकन cash करत चाहत्याशी फोनवरून संवाद साधतेय त्यांच्यात सहजतेन मिसळतेय गावागावात कार्यक्रमातून हजेरी लावतेय त्या मुळेच लोकांना हे कलावंत आपलेसे वाटतात.
                       टी .वी. येण्याआधी आणि नंतरही सिने,नाटय कलावंताना भेटण त्यांच्याशी संवाद साधण तितकस सोप नव्हत आणि त्या आधी मुंबई पुण्या बाहेरील चाहत्यांना त्यांची झलक दिसणहि दुर्लभ होत फक्त पेपरच्या रविवार पुरवणीतून त्यांच्या बद्दल वाचायला मिळे लहानपणी आई आम्हाला तीन पाहिलेल्या पन्हाळगड वर झालेल्या शुटींग च रसभरीत वर्णन सांगायची दीक्षित मास्तर (कवी संजीव ) ह्यांच्या गीतांचा समावेश असलेल्या बोलपटातील नामवंत अभिनेत्री ,तिच्या सोबतच तीच वास्तव्य त्या, दरम्यान तीन अनुभवलेलं तीच चांगुलपण ,तिची राहणी,तिचा अभिनय ह्या बद्दल ती आम्हाला नेहमी सांगायची तेव्हा नवल वाटायचं पण म्हणून आम्हाला सिनेमे पाहण्याची मुभा नव्हती कारण नंतर च वातावरण बदलल वर्षातून एक दोन सिनेमे तेही चांगले असतील तरच पहायला मिळत.नाटक उशिराने असल्याने फारसे कोणी पाहत नसत आमच्या दूरच्या मावस काकांकडूनहि आम्हाला सिने कलावंतांचे किस्से कळत
शाळेत असताना एकदा आम्हाला आमच्या वर्ग मैत्रिणीकडून "शशिकला "सोलापुरात आल्याच कळाल तिच्या घराच्या समोरच शाशिकालाजीचघर होत तीन आम्हाला शाशिकलाजीची भेट घडवण्याच कबुल केल अर्थात घरच्यांच्या परवानगीन आम्ही दुसरया दिवशी भेटण्याची वेळ ठरवली पण जायला वेळ झाला अन त्यांची आरामाची वेळ संपली ती त्यांच्या व्यायामाची वेळ होती त्या मुळे त्यांनी दुसरया दिवशी भेटीची वेळ दिली आमचा हिरमोड झाला पण मैत्रिणीच्या माडीवरून आम्ही शाशिकलाजींना पाहिलं शाशिकलाजी त्यांच्या वयापेक्षा कितीतरी लहान दिसत होत्या सुंदर सडपातळ गुलाबी सलवार कमीझ घातलेल्या शाशिकलाजी माडीवर येरझारा घालत होत्या त्या वेळेस त्या एक प्रथितयश अभिनेत्री आणि खलनायिकाही होत्या.
एकदा बेंगलोर च्या काबिनी जंगल सफारी मध्ये अमेरिकन अभिनेत्री गोल्डी हॉन तिच्या फिल्मी युनिट सोबत आली होती पंचेचाळीसची गोल्डी हॉन अवघी विशीची दिसत होती तिच्या सहकारयाकडून तीच वय कळाल तेव्हा तिच्या फिगर maintenance च नवल वाटलं दिवसभर लंच ,डीनर ,camp फायर मध्ये आम्ही सोबत होतो दुसरया दिवशी आम्ही थोडस शुटींग ही पाहिलं तिच्या सहकारयाकडून दुपारी भेटण्याची वेळ ठरवली पण नंतर वेटर कडून तीन खूप ड्रिंक्स घेतल्याच कळाल अन आम्ही तिच्याशी बोलण्याचा विचार बदलला सुधाचंद्रंन आम्हाला एकदा मुंबईत दिसली ती अंधेरीला तिच्या गाडीत एकटीच ड्रायवरची वाट पहात होती तिचा ड्रायवर तिला न सांगता कोठेतरी निघून गेला होता आणि तिला शुटींग स्थळी लवकर पोहोचायचं होत .
             पुढे मी रीतसर पत्रकारितेचा कोर्स केला अन अशोक शिंदे ,मैथिली जावकर ,रमेश भाटकर ,कुलदीप पवार ह्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली पुण्याला माझ्या कुटुंबीयांसोबत अशोक शिंदे यांची मुलाखत रंगली अर्थात आधी रीतसर मुलाखतीची वेळ ठरवूनच. त्या दरम्यान त्यांचा अभिनय संघर्ष ,कुटुंब वत्सलता ,अन समोरच्याला मान देण्याची वृत्ती अनुभवली नंतर यवतमाळ येथे आल्यावर त्यांनी आवर्जून आठवण ठेवली रमेश भाटकर पुण्यात "हृदयस्पर्शी "सिनेमाच्या प्रिमियर साठी आले होते त्यांनी तो सिनेमा आवर्जून पहा अस सांगितलं पण वेळेअभावी आम्हाला सिनेमा पाहता आला नाही नंतर तो आम्ही पहिला आणि आम्हाला तो आवडलाही यवतमाळ येथे तेही नाटकाच्या निमित्ताने आले तेव्हा खलनायकी ढंगाची त्यांची भूमिका पाहून आश्चर्य वाटल खर पण त्याही भूमिकेत त्यांचा अभिनय उत्तम असल्याच मी त्यांना सांगितलं.


                   "बायको बिलंदर नवरा कलंदर " ह्या कुलदीप पवार दिग्दर्शित करत असलेल्या नाटक च्या निमित्ताने कुलदीप पवार यवतमाळ येथे आले होते इथल्या एका शाळेच्या प्रांगणात ते नाटक होणार होते आणि त्याच शाळेच्या hall मध्ये त्यांच्या मेकअप वैगरेची सोय केलेली होती hall ला पडदा बांधून महिला कलाकारांची चेंजिंग ची सोय केलेली होती कुलदीप पवार आपल्या सहकारयांशी चर्चा करण्यात मेकअपमन मेकअप करुन देण्यात ,प्रेसमन कपड्यांना प्रेस करण्यात मग्न होते साऊंड मन आणि इतर कलावंतांची ये जा सुरु होती व्यस्ततेमुळे कुलदीप पवारांनी मुलाखतीसाठी नंतरची वेळ दिली आणि ते सह कलाकारांना अभिनयाचे प्रात्यक्शित दाखवू लागले.


                              कीर्ती गोसावी मेकअ करून तयार होते त्यांना त्यांच्या आजोबांचा अभिनय वारसा लाभलेला आहे एका प्रश्ना दरम्यान कीर्ती गोसावी हे IIT पवई तून engineer झालेले आहेत हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं तेव्हा आमच बोलण ऐकून कुलदीप पवार म्हणाले ,"अहो !लोकांना वाटत इथले लोक मद्दड असतात, अर्ध शिक्षित असतात .पण तस नाही इथंही डॉक्टर engineerआहेत अभिनय करण , नाटकात काम करण काय इतक सोप असत ? उलट इथे तर कॉमन सेन्सचा खूप वापर करावा लागतो वैयक्तिक अडचणी दूर ठेवून अभिनय करावा लागतो खूप संकट येतात पण न डगमगता त्यांना तोंड ध्यावे लागते ,कितीतरी व्यवधान सांभाळावी लागतात . कित्येकदा एखाद्या व्यावसायिकाचा फोन येतो कि आमचा मुलगा अभ्यासात हुशारनाही त्याच तिथे ही जमत नाही त्याला तुमच्या कडे घ्या . पण हेकाय इतक सोप असत! एकवेळ अभ्यास करून घोकंपट्टी करून engineer होता येत पण अभिनय अंगात असावा लागतो इथे मेहनतीला पर्याय नाही वेळेवर अभिनय करावा लागतो संवाद म्हणावे लागतात ,वेळ निभावून न्यावी लागते इथे अंगभूत कलागुणांना महत्व असत!"



बरोबर आहे ,अशोक शिंदे engineer आहेत ,मैथिलीही उच्चशिक्षित आहे आणि आता तर नवीन कलावंतही doctor, engineer आहेत त्यांच्या प्रसिद्धी वलया मागे त्यांची अपार मेहनत ,चिकाटी,एकाच वेळी अनेक सिरियल्स मधले संवाद पाठ करण शुटींगच्या वेळा साभांळण ,धावपळीत शुटींग स्थळी पोहोचण आणि आपल डायेट सांभाळत ,सारा ताण विसरून चाहत्यांशी हसत मुखान संवाद साधण हेच फिल्मी सिताऱ्यांच खर आयुष्य असत .

Wednesday, 30 October 2013

अखेर यवतमाळ येथिल शास्त्री नगर येथे पाणी पुरवठा पूर्ववत

                       अखेर नागरिकांच्या तक्रारीची व बातम्यांची दखल घेत पाणी पुरवठा विभागाने शास्त्री नगर मधील पाणी पुरवठा सुरळीत केला आहे त्या मुळे गृहिणींनी सुटकेचा श्वास घेतला आहे पण हा पाणी पुरवठा किती दिवस सुरळीत राहील कोण जाणे शिवाय अजूनही भरपूर पाणी साठा असता नाही पाणी अजूनही एक दिवसाआडच सोडण्यात येते तरी तो पाणी पुरवठा दररोज करण्यात यावा अशी लोकांची मागणी आहे

Wednesday, 23 October 2013

दिवाळीच्या तोंडावर यवतमाळ येथील शास्त्री नगर येथे उशीराने पाणी पुरवठा

         यंदा विर्भात पाऊस नको इतका पडला त्या मुळे कित्येक ठिकाणी पूर आला तोही दोन तीनदा त्या मुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आणि धरणाची दारे उघडुन पाणी बाहेर सोडावे लागले.उन्हाळ्यात दुष्काळाने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना वाटले आता पाणी नियमित येईल पण गेल्या दोन तीन महिन्या पासून यवतमाळ येथील शास्त्रीनगर,दाते कॉलेजच्या मागची बाजू येथे पाणी पुरवठा अनियमित होत आहे दसरयालाही पाणी उशिराने म्हणजे संध्याकाळी पाच वाजता झाला.
      आता दिवाळीच्या तोंडावर तर पाणी दुपारनंतर केव्हाही कमी दाबाने होत आहे सकाळी कधी थेंब,थेंब कमी दाबाने पाणी बाहेर अंगणात येते व घरात दुपारी पाच वाजता पाणी सोडल्या जाते आज दिनांक तेवीस रोजी तर रात्री आठ वाजता थेंब,थेंब बाहेर पाणी सोडण्यात आले तर घरात रात्री दहा वाजता थोड्या ज्यास्त दाबाने थोडा वेळ पाणी सोडण्यात आले ह्या बाबतीत विचारणा केल्यास कधी लाईट नसल्याने उशिराने तर कधी टाकीत पाणी भरल्या न गेल्याने उशिरा तर कधी व्हाल्व नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते तो कधी दुरुस्त होईल व कधी पाणीपुरवठा सुरळीत होईल हे संबंधितांनी जाहीर करावे कित्येकदा तर यवतमाळ येथे बाहेर धो,धो पावूस पडत असताना घरात मात्र पाणी येत नाही अशी स्थिती होती आधीच यवतमाळ येथे एक दिवसाआड पाणी सोडण्यात येते त्या मुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागते तेही यवतमाळ येथे मुबलक पाणीसाठा असताना तेव्हा संबंधितानी ह्या कडे लक्ष देवून नागरिकांना रोज सकाळी वेळेवर पाणी मिळेल ह्या कडे लक्ष ध्यावे ./div>

Monday, 14 October 2013

महाराष्ट्रीयन लूक

                   नुकतीच गोकुळ अष्टमीची धामधूम संपली,पाठोपाठ गौरी,गणपतीही उत्साहात साजरे झाले आणि आता नवरात्रोत्सव सुरु आहे नवरात्रात पूर्वी गरब्याला महत्व होत ते गुजराथी समाजात पण हळू,हळू गरब्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाल अन गरबा प्रकाशझोतात आला त्याने तारे, तारका, गायक,वादक ह्यांनाही भुरळ पाडली आणि ते गरब्यात येताहेत म्हटल्यावर तरुण तरुणी,आणि इतर नागरिकही त्यात हौसेन सामील होऊ लागले गरब्यामुळे घागराचोळीलाही महत्व आले घागरयाचे वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळाले लहानथोर सारयांनाच तो पेहराव आवडला आणि त्याने मार्केट काबीज केल.
                        आता घागरा चोळीला स्पर्धा करीत नऊवारी झोकात पुढे आलीय नव्या रुपात,नव्या ढंगात . नव्या पिढीला तीच अप्रूप वाटतंय म्हणून कि काय आताशा नऊवारी जिकडे तिकडे मानान मिरवतेय fashion डिझायनरलाही तीन भुरळ पाडलीय मागे एका fashionशो मध्ये नऊवारीचा नवा अविष्कार पाहायला मिळाला हि नऊवारी धोतीसारखी शिवलेली वर कुडता आणि नाकात नथ अशा नव्या जोशात सामोरी आली होती.
                 आता तर काय जिथे तिथे नऊवारी दिसू लागलीय पूर्वी ब्राम्हणात नवरात्रात अष्टमीला घागर फुंकत तेव्हा किव्हा मंगळागौरीला हौसेन नऊ वारी साडी घातली जायची हे सण टी.वि वर आले आणि मग प्रत्येक सणाला टी .वि.वरच्या अभिनेत्री channel वरच्या बातमीदार महिला नऊ वारी ,नथ हौसेन घालू लागल्या मिरवणुकीत महिला युवतीहि नऊवारी परिधान करून नथ घालून सहभागी होऊ लागल्यात.
              आता नवरात्रोत्सवात ठिकठीकाणी देवीचा जागर ,होम हवन ,आरत्या,गोंधळ ह्या सोबतच वेगवेगळ्या स्पर्धा सुरु आहेत आणि ह्या स्पर्धेत नऊवारी नथीसह महाराष्ट्रीयन लुक ह्या नावान दाखल झालीय .म्हणतात ना! कालचक्र अविरत फिरत जुनी गोष्ठ पुन्हा नव्यान येते अगदी fashion सगट तशीच नऊवारी नथीसह fashion विश्वात दिमाखान विराजमान झालीय.
           हे पाहून खरच नवल वाटत स्वातंत्र पूर्व काळात बायका नऊ वारी साडी नेसत कारण सहा वारी साडी नेसायची त्यांना मुभाच नव्हती मग त्या विरोधात ब्र काढायची कोणाची बिशाद! नऊ वारी साडी ,नाकात नथ आणि अंगभर दागिने घालून दिवसभर घरात राबण त्यांच्या अंगवळणी पडल होत .त्या वेळच्या समाज सुधारकांच्या अथक प्रयत्नाने सहावारी साडी अस्तित्वात आली समाज सुधारक आगरकर यांचही मत अस होत कि बायकांनी नऊवारी धोती सारखी शिवलेली वर कुडता आणि ओढणी असा सुटसुटीत पोशाख परिधान करावा त्या काळी त्यांना खूप विरोधही झाला ,खूप संघर्ष करावा लागला हाच संघर्ष मधल्या पिढीला सलवार कमीज घालण्यासाठी करावा लागला त्या वेळेस ते इतक सोप नव्हत स्वातंत्र पूर्व काळात पुरषांनाही धोतर शर्ट आणि टोपी असाच पोशाख वापरावा लागे आणि आजचे नव युवकही हौसेने धोती कुडता नव्या रुपात घालू लागले आहेत.
            आई,आजीच्या संघर्षाचा वारसा पुढे नेत मधल्या पिढीच्या कृपेन आजच्या स्रीया सहजतेन
जीन्स ,स्कर्ट्स सलवार कमीज इतकच काय आपल्याला हवा तो ड्रेस परिधान करू शकतात खरेतर आजच्या स्रियांसाठी सर्वार्थान हे गोल्डन युग आहे चुलीपासून अंतराळात भरारी मारलेल्या स्रियांच यशस्वी युग ,अर्थात चुलीलाही आता glamour प्राप्त झालय संजीव कपूर आणि तत्सम शेफची ,अन channel वाल्याची कृपा.
                   आजची पिढी वेगवान आहे करिअरिष्ट आहे अशा वेळेस नऊ वारीचा हा नवा अविष्कार किती दिवस टिकेल?स्रिया पुन्हा जुन्या कडे वळतील? नऊ वारी साडी घालून नथ घालून सणांच सेलिब्रेशन करण नव्या युवतींना किती काळ आवडेल? त्या त्यात किती काळ अडकतील? हे येणारा काळच ठरवेल.
                 काही का असेना आगरकराना अपेक्षित असलेला आणि आधीच्या पीढीन ज्या साठी संघर्ष केला तो वेश आता fashion म्हणून नव्या रुपात नव्या झोकात मिरवतोय हा काळाचाच महिमा अर्थात जुन्या वेशभूषेत सणवारात अडकताना पुन्हा जुना काळ तर येणार नाही ना! ह्याची दक्षता मात्र घ्ययला हवी.

यवतमाळ येथील दुगोत्सव


               एकता दुर्गोत्सव मंडळ


यवतमाळ येथील छोटी गुजरी येथील एकता दुर्गोत्सावाचे हे ४२वे वर्ष असून दर वर्षी ते एखाद्या ज्वलंत समस्येवर प्रकाश टाकतात ह्या वेळी त्यांनी स्त्री भ्रूणहत्त्या ,हुंडा बळी ,वृद्धांची समस्या म्हणजे त्यांचे पालनपोषण न करता त्यांच्याच घरातून त्यांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे तसेच स्री,पुरुष असमानता,या सारख्या समस्या पाहून चूप न बसता त्या विरोधात आवाज उठवा असा संदेश देणारे बोर्ड लावले होते मंदिराची सजावट पत्रावळ्या व द्रोण ह्यांच्या साह्याने केली असून कलकत्ता येथील कारागिरांना त्या साठी पंधरा दिवस लागले .

 


नवशक्ती दुर्गोत्सवमंडळ
येथील कार्यकर्ते दरवर्षी अखंड ज्योत अभियान राबवतात त्याला नागरिक भरभरून प्रतिसाद देतात गणपती मंदिरा जवळ असलेल्या ह्या मंडळाने ह्या वर्षी सरस्वती ,लक्ष्मी आणि दुर्गा अशा तीन देवीची प्रतिस्थापना केली होती.


हितेन्वेशी दुर्गोत्सव मंडळ
येथील मंडळाने झोपाळ्यावर बसलेल्या देवीची मूर्ती विलोभनीय असून, मंडळाचे हे एकविसावे वर्ष आहे.

लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ
आर्णी रोड येथील ह्या मंडळाने देवीच्या मागे ,शंकराची पिंड व त्यावर गुहेतून झिरपणारे  पाणी असा देखावा तयार केला.

पोलिस लाईन येथील आकर्षक मंदिरात विराजमान झालेली देवी.

निवांत क्षणी प्रसादाचा आस्वाद घेताना पोलिस
फोटो -पूजा दुद्दलवार -BE (Soft).BMC