Saturday 16 November 2013

पडध्यामागचे फिल्मी सितारे

                  पण सध्या तरी सर्वत्र श्री आणि जान्हवीची म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ह्यांची हवा आहे त्या मुळेच बहुतांश channels वरून त्याचं दिवाळी सेलिब्रेशन , त्यांच्या आवडी निवडी ,करिअर अभिनय ह्या बद्दलची माहिती प्रसारित झाली फिल्मी सितारे मग ते कुठल्याही मालिकेतले असोत एकदा का प्रकाश झोतात आले कि पडध्या वरच त्याचं झगमगत वलय पाहून पडद्यामागे हे तारे कसे कसे असतात ,कसे वागतात ह्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते कित्येकजण तर पडद्यावरच त्याचं आयुष्य हेच त्याचं खर आयुष्य आहे अस मानु लागतात.
                           टी वी मुळे आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्मी सितारयांच पडद्या मागच आयुष्य आपण सहजतेन पाहू शकतोय आजची नवी पिढी देखील आपली पब्लिसिटी पटकन cash करत चाहत्याशी फोनवरून संवाद साधतेय त्यांच्यात सहजतेन मिसळतेय गावागावात कार्यक्रमातून हजेरी लावतेय त्या मुळेच लोकांना हे कलावंत आपलेसे वाटतात.
                       टी .वी. येण्याआधी आणि नंतरही सिने,नाटय कलावंताना भेटण त्यांच्याशी संवाद साधण तितकस सोप नव्हत आणि त्या आधी मुंबई पुण्या बाहेरील चाहत्यांना त्यांची झलक दिसणहि दुर्लभ होत फक्त पेपरच्या रविवार पुरवणीतून त्यांच्या बद्दल वाचायला मिळे लहानपणी आई आम्हाला तीन पाहिलेल्या पन्हाळगड वर झालेल्या शुटींग च रसभरीत वर्णन सांगायची दीक्षित मास्तर (कवी संजीव ) ह्यांच्या गीतांचा समावेश असलेल्या बोलपटातील नामवंत अभिनेत्री ,तिच्या सोबतच तीच वास्तव्य त्या, दरम्यान तीन अनुभवलेलं तीच चांगुलपण ,तिची राहणी,तिचा अभिनय ह्या बद्दल ती आम्हाला नेहमी सांगायची तेव्हा नवल वाटायचं पण म्हणून आम्हाला सिनेमे पाहण्याची मुभा नव्हती कारण नंतर च वातावरण बदलल वर्षातून एक दोन सिनेमे तेही चांगले असतील तरच पहायला मिळत.नाटक उशिराने असल्याने फारसे कोणी पाहत नसत आमच्या दूरच्या मावस काकांकडूनहि आम्हाला सिने कलावंतांचे किस्से कळत
शाळेत असताना एकदा आम्हाला आमच्या वर्ग मैत्रिणीकडून "शशिकला "सोलापुरात आल्याच कळाल तिच्या घराच्या समोरच शाशिकालाजीचघर होत तीन आम्हाला शाशिकलाजीची भेट घडवण्याच कबुल केल अर्थात घरच्यांच्या परवानगीन आम्ही दुसरया दिवशी भेटण्याची वेळ ठरवली पण जायला वेळ झाला अन त्यांची आरामाची वेळ संपली ती त्यांच्या व्यायामाची वेळ होती त्या मुळे त्यांनी दुसरया दिवशी भेटीची वेळ दिली आमचा हिरमोड झाला पण मैत्रिणीच्या माडीवरून आम्ही शाशिकलाजींना पाहिलं शाशिकलाजी त्यांच्या वयापेक्षा कितीतरी लहान दिसत होत्या सुंदर सडपातळ गुलाबी सलवार कमीझ घातलेल्या शाशिकलाजी माडीवर येरझारा घालत होत्या त्या वेळेस त्या एक प्रथितयश अभिनेत्री आणि खलनायिकाही होत्या.
एकदा बेंगलोर च्या काबिनी जंगल सफारी मध्ये अमेरिकन अभिनेत्री गोल्डी हॉन तिच्या फिल्मी युनिट सोबत आली होती पंचेचाळीसची गोल्डी हॉन अवघी विशीची दिसत होती तिच्या सहकारयाकडून तीच वय कळाल तेव्हा तिच्या फिगर maintenance च नवल वाटलं दिवसभर लंच ,डीनर ,camp फायर मध्ये आम्ही सोबत होतो दुसरया दिवशी आम्ही थोडस शुटींग ही पाहिलं तिच्या सहकारयाकडून दुपारी भेटण्याची वेळ ठरवली पण नंतर वेटर कडून तीन खूप ड्रिंक्स घेतल्याच कळाल अन आम्ही तिच्याशी बोलण्याचा विचार बदलला सुधाचंद्रंन आम्हाला एकदा मुंबईत दिसली ती अंधेरीला तिच्या गाडीत एकटीच ड्रायवरची वाट पहात होती तिचा ड्रायवर तिला न सांगता कोठेतरी निघून गेला होता आणि तिला शुटींग स्थळी लवकर पोहोचायचं होत .
             पुढे मी रीतसर पत्रकारितेचा कोर्स केला अन अशोक शिंदे ,मैथिली जावकर ,रमेश भाटकर ,कुलदीप पवार ह्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली पुण्याला माझ्या कुटुंबीयांसोबत अशोक शिंदे यांची मुलाखत रंगली अर्थात आधी रीतसर मुलाखतीची वेळ ठरवूनच. त्या दरम्यान त्यांचा अभिनय संघर्ष ,कुटुंब वत्सलता ,अन समोरच्याला मान देण्याची वृत्ती अनुभवली नंतर यवतमाळ येथे आल्यावर त्यांनी आवर्जून आठवण ठेवली रमेश भाटकर पुण्यात "हृदयस्पर्शी "सिनेमाच्या प्रिमियर साठी आले होते त्यांनी तो सिनेमा आवर्जून पहा अस सांगितलं पण वेळेअभावी आम्हाला सिनेमा पाहता आला नाही नंतर तो आम्ही पहिला आणि आम्हाला तो आवडलाही यवतमाळ येथे तेही नाटकाच्या निमित्ताने आले तेव्हा खलनायकी ढंगाची त्यांची भूमिका पाहून आश्चर्य वाटल खर पण त्याही भूमिकेत त्यांचा अभिनय उत्तम असल्याच मी त्यांना सांगितलं.


                   "बायको बिलंदर नवरा कलंदर " ह्या कुलदीप पवार दिग्दर्शित करत असलेल्या नाटक च्या निमित्ताने कुलदीप पवार यवतमाळ येथे आले होते इथल्या एका शाळेच्या प्रांगणात ते नाटक होणार होते आणि त्याच शाळेच्या hall मध्ये त्यांच्या मेकअप वैगरेची सोय केलेली होती hall ला पडदा बांधून महिला कलाकारांची चेंजिंग ची सोय केलेली होती कुलदीप पवार आपल्या सहकारयांशी चर्चा करण्यात मेकअपमन मेकअप करुन देण्यात ,प्रेसमन कपड्यांना प्रेस करण्यात मग्न होते साऊंड मन आणि इतर कलावंतांची ये जा सुरु होती व्यस्ततेमुळे कुलदीप पवारांनी मुलाखतीसाठी नंतरची वेळ दिली आणि ते सह कलाकारांना अभिनयाचे प्रात्यक्शित दाखवू लागले.


                              कीर्ती गोसावी मेकअ करून तयार होते त्यांना त्यांच्या आजोबांचा अभिनय वारसा लाभलेला आहे एका प्रश्ना दरम्यान कीर्ती गोसावी हे IIT पवई तून engineer झालेले आहेत हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं तेव्हा आमच बोलण ऐकून कुलदीप पवार म्हणाले ,"अहो !लोकांना वाटत इथले लोक मद्दड असतात, अर्ध शिक्षित असतात .पण तस नाही इथंही डॉक्टर engineerआहेत अभिनय करण , नाटकात काम करण काय इतक सोप असत ? उलट इथे तर कॉमन सेन्सचा खूप वापर करावा लागतो वैयक्तिक अडचणी दूर ठेवून अभिनय करावा लागतो खूप संकट येतात पण न डगमगता त्यांना तोंड ध्यावे लागते ,कितीतरी व्यवधान सांभाळावी लागतात . कित्येकदा एखाद्या व्यावसायिकाचा फोन येतो कि आमचा मुलगा अभ्यासात हुशारनाही त्याच तिथे ही जमत नाही त्याला तुमच्या कडे घ्या . पण हेकाय इतक सोप असत! एकवेळ अभ्यास करून घोकंपट्टी करून engineer होता येत पण अभिनय अंगात असावा लागतो इथे मेहनतीला पर्याय नाही वेळेवर अभिनय करावा लागतो संवाद म्हणावे लागतात ,वेळ निभावून न्यावी लागते इथे अंगभूत कलागुणांना महत्व असत!"



बरोबर आहे ,अशोक शिंदे engineer आहेत ,मैथिलीही उच्चशिक्षित आहे आणि आता तर नवीन कलावंतही doctor, engineer आहेत त्यांच्या प्रसिद्धी वलया मागे त्यांची अपार मेहनत ,चिकाटी,एकाच वेळी अनेक सिरियल्स मधले संवाद पाठ करण शुटींगच्या वेळा साभांळण ,धावपळीत शुटींग स्थळी पोहोचण आणि आपल डायेट सांभाळत ,सारा ताण विसरून चाहत्यांशी हसत मुखान संवाद साधण हेच फिल्मी सिताऱ्यांच खर आयुष्य असत .

No comments:

Post a Comment