Saturday, 2 March 2013

मैथिली जावकर

(नाशीक येथून प्रकाशित होणाऱ्या पोलिस न्यूज ह्या पाक्षीकासाठी व मुक्त वार्ताहर म्हणून मी घेतलेली हि मुलाखत )
मैथिली जावकर
                                        दामिनी,घरकुल,थरार,सांजभूल ,इन्स्पेक्टर ,कामेडी डॉट काम ,अशा छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा साकारताना आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवत घराघरात परिचित झालेली एक गुणी प्रतिभासंपन्न उगवती अभिनेत्री मैथिली जावकर यवतमाळ इथे षड्यंत्र ह्या नाटकाच्या निमित्त्ताने येउन गेली तेव्हा तिच्या ह्या नाट्य प्रवेश विषयी तिच्या अभिनय कारकिर्दी विषयी आणि एकूणच तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी तिच्याशी बातचीत केली तेव्हा तिची लगबग सुरु होती षड्यंत्र ह्या नाटकात ती मेन रोल करत असल्यामुळे तिला बघायला ,तिची स्वाक्षरी घ्यायला व तिच्यासोबत फोटो काढायला येणारया तिच्या चाहत्यांची गर्दी होती त्या प्रत्येकांशी संवाद साधत ती फोटो देत होती त्या मुळे नाटक संपल्या नंतरच तिच्याशी बोलायला वेळ मिळाला सुंदर आणि गोड मैथिली आपल्या आदबशीर वागण्याने समोरच्यांना आकर्षून घेते.

                                              नाटक संपल्यानंतर मुलाखत देताना मैथिली
                            मैथिलीने अगदी के जी ज़ि. पासूनच नाटकात कामे केलीत शाळेत असल्या पासून ते थेट महाविध्यालायापर्यंत प्रत्येक वर्षी ती नाटकात कामे करायची आणि बक्षीस पटकवायची लहानपणापासूनच तिने अभिनय क्षेत्रात यायचं हे नक्की केल होत शिकत असतानाच ती वेगवेगळ्या नाट्यस्पर्धेत भाग घ्यायची ,आंतर विद्यापीठ ,आंतर राज्य व कामगार कल्याण केंद्र अशा विविध स्पर्धेतल्या नाटकात तिने कामे केलीत आणि ह्या स्पर्धेत तिला उत्कृष्ट अभिनेत्रीच बक्षीस पण मिळाल. घरून तसा विरोध नव्हता फक्त शिक्षण पूर्ण करण्याची अट होती ती तिने पूर्ण केली. तिने हिंदी लिटरेचर  घेवून M .A  केलंय .
              मैथिली मुंबईचीच तिथच तीच शिक्षण झाल आणि करिअरची सुरवात पण मैथिली म्हणते की ,मला अभिनया व्यतिरिक्त इतर कशात रस नव्हता मी ह्या क्षेत्रात आले नसते तर खूप अस्वस्थ राहिले असते मग मी काही केल असत कि नाही कोण जाणे आपली नाटकाची आवड जोपासत असतानाच मैथिलीने वेगवेगळे छंद पण जोपासलेत भरतनाट्यम ,स्विमिंग ,हॉर्स रायडींग ,कराटे ,खो,खो, ब्याडमींटन ह्यात ती पारंगत आहे स्काउट  मधेही ती उत्साहाने भाग घ्यायची थोडक्यात तू आल राउंडर आहेस तर !म्हटल्यावर मैथिली हसून दाद देते.

                                  मैथिली जावकर व अशोक शिंदे नाटकातील एका प्रसंगात
तुला पहिला ब्रेक कोणी दिला असे विचारल्यावर मैथिली सांगते
       92 ते 95 पर्यंत मैथिली एकांकिका व नाटके करत होती मग सत्यदेव दुबेंनी तिला "सावल्या" ह्या नाटकात संधी दिली पण खरा ब्रेक प्रकाश बुद्धिसागर ह्यांनी "आई परत येतेय " ह्या नाटकातून दिलाय त्यात तिच्या सोबत उषा नाडकर्णी होत्या त्या नाटकात तिला बेस्ट अक्ट्रेस च बक्षीस मिळाल त्या नंतर" सुपारी "हि एकांकिका "डोळे मिटून उघड,उघड" केल त्यात विजय चव्हाण ,अतुल परचुरे होते "अफलातून" ,दांडेकरांचा सल्ला " ही कमर्शियल नाटक केली तिने संतोष पवारांचं "जाणून बुजून " केलाय सप्तपदीचे पायलट एपिसोड केलेत .त्या नंतर २००० साली तीच शोभायात्रा हे नाटक आल त्यातल्या '"बार्बी" ह्या फारिनर मुलीच्या भूमिकेन तिला नाव मिळाल स्वत:ची ओळख मिळवून दिली आणि मग त्यातल काम पाहून "चार चौघी" मिळाल त्यातला प्रतीक्षा लोणकरचा रिप्लेस रोल तिला मिळाला नाटकातली तिची कामे पाहून विशेषत: "शोभायात्रा " पाहून "कुमार सोहनिंनी" तिला"मानसी "मालिकेत काम दिल आणि मैथिलीचा आपसूकच छोट्या पडद्यावर प्रवेश झाला.दामिनी ,घरकुल,थरार ,कामेडी डॉट काम ,चार दिवस सासूचे ,सांजभूल अशा अनेक मालिकांनी तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ती अधिकारी बंधूच्या हिंदी मालीकातुनहि काम करतेय सब टी वि वर एस बास आणि"सजन झूट न बोलो "मुधून ती येतेय.
हिंदीचा अनुभव कसा होता ? मराठी भाषिक म्हणून अडचण आली का ?
मैथिली सांगते - हिंदी लिटरेचर केल असल्याने भाषेची अडचण आली नाही शिवाय अधिकारी बंधूच सिरियल असल्याने फक्त स्टोरी वेगळी आणि भाषा वेगळी बाकी स्पॉट बॉय पासून क्यामेरा मन पर्यंत सारे तेच होते त्या मुळे  अडचण आली नाही
                                   
       
 नाटय  सिरियल मधल्या घोडदौडी सोबत तिचा आता चित्रपटातही प्रवेश झालाय मैथिलीच्याच शब्दात सांगायचं तर तिने यशाची आणखी एक पायरी सर केलीय "आधारस्तंभ" ह्या चित्रपटात तिने लक्ष्मीकांत बेर्डे सोबत काम केलय त्यात ते दोघेही पत्रकार होते. खिमजीभाई सत्रा ह्या गुजराती उध्योगपतीचा हा मराठी सिनेमा तिच्या नाटकातल काम पाहून त्यांनी तिला हि भूमिका दिली ह्यात विक्रम गोखले ,दिलीप प्रभावळकर ,रमेश भाटकर ,अशोक शिंदे ह्या सारख्या मान्यवर कलावंतासोबत काम करायला मिळाल्यामुळे मैथिली खुश होती शिवाय ती सत्यमेव जयते ह्या चित्रपटात काम करतेय त्यात दोघेही इन्स्पेक्टर आहेत त्यातला व इन्स्पेक्टर सिरियल मधला इंस्पेक्टरचा रोल तिने खूप एन्जॉय केलाय त्यातला थरार ,धाडस ,घोड दौड तिला खूप आवडली वास्तविक जीवनातही तिला अस धाडस करायला खूप आवडत. मैथिली आई वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे तु दौरयावर गेल्यावर ते तुला मिस करत असतील न! ती चटकन उत्तरते "हो, ना "!
आत्ताची मैथिली आणि पहिल्याची मैथिली ह्यात काही फरक झालाय का ? विशेषत:: मैत्रीणीत वावरताना     मैथिली म्हणते ,मुळीच नाही ,घरी तर मी फक्त मैथिलीच आहे मैत्रीणीत देखील मी पूर्वी सारखीच मिसळते माझ्या आई वडिलांनी माझ्यावर असे संस्कार केलेत कि अजूनही माझे पाय जमिनीवरच आहेत ,मैथिलीला नातेवाईकात पूर्वीप्रमाणेच मोकळेपणाने मिसळायला आवडते
तू सौंदर्याची निगा कशी राखतेस ?
 मैथिलि म्हणते कि ,मी व्यायाम अर्थात वेळ मिळाला तरच करते स्विमिंग करते तेलकट तुपकट खाण्याच टाळते शक्यतो घरूनच जेवण्याचा डबा नेते.
                                             

           खरच , नाटक सिनेमा, सिरियल ह्यांचा तोल सांभाळताना मैथिलीन यशाचा पण तोल सांभाळाय
मैथीलीच्या अभिनयातली सहजता परिपक्वता तिच्यात देखील दिसते तिच्याशी बोलताना तिच्यातली
साधीसुधी निरागस मैथिली डोकावते तिच्यातली नम्रता मनाला भावते आणि तिच्या सहकलावंतांनी
तिच्या चांगुल पणाची दिलेली पावती पाहून मैथीलीच्या भावी यशाची खात्री पटते वेळ बराच झालेला असतो मैथिलीला पुढच्या दौरयावर जायचं असत मलाही घरी पोहचायची घाई असते "तुझे षड्यंत्र नाटकातल काम एकदम झकास होत ह !" असे सांगून व तिचे आभार मानून मी मुलाखत संपवते.

yojana.duddalwar@gmail.com

Wednesday, 27 February 2013

अशोक शिंदे ( प्रतिभावंत सिने अभिनेते )

                                                                                                    
अशोक शिंदे
        रेशीम गाठी ,पवळा,सासर माहेर ,अशी असावी सासू ह्या सारख्या अगणित सिनेमातून ,नाटकातून
आणि छोट्या पडद्यावरच्या कित्येक सिरीयल्स मधून विशेषत: बंदिनी ,घरकुल मुळे घराघरात परिचित झालेले सिने नाट्य  कलावंत अशोक शिंदे यांची भूमिका बरयाच वाहिन्यां वरून प्रसारित होणारया सिरियल मध्ये असतेच. मी मुक्त वार्ताहर म्हणून त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते गंधाली ह्या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त होते त्या दिवशी ते दिवस भराचे शुटींग आटोपून रात्रीच्या मुक्कामाला पुण्याला आले होते व  लगेचच सकाळी परत चित्रीकरण स्थळी जाणार होते. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला विशेष म्हणजे त्यांच्या सोबत मोहन वाघ ,रमेश भाटकर वै. प्रभूती तिथे होत्या त्यांची गप्पांची मस्त मैफल रंगली होती तरी देखील त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून मिळालेल्या निवांत  क्षणातून  वेळ काढून मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानले व मुलाखतीला सुरवात केली
                              मुळचे सातारयाचे असलेले अशोक शिंदे यांचे कुटुंबीय नंतर पुण्यात स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळा कॉलेजातून नाटकातून कामेही केलेली त्या मुळे लहानपणीच अभिनयात कारकीर्द करायचं नक्की केलेलं असल तरी घरच्यांचा मात्र थोडासा विरोध होता कारण आधी शिक्षण पूर्ण कर मग काय ते कर अस त्याचं ठाम मत होत त्यांनीही त्या मताचा आदर ठेवत त्या काळात फक्त आभ्यासावर लक्ष केंद्रित करत आधी इंजिनीयरच शिक्षण पूर्ण केल ते बी.ई इलेक्ट्रानिक्स आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.
           नंतर मात्र त्यांनी मिळेल ती नाटक केली तेव्हा त्यांच्या सोबत मोहन जोशी होते आम्ही दोघे तेव्हा
पुण्यातली जवळ जवळ सगळी नाटकं करायचो काही वेळेस तर कमी पैशात सुद्धा नाटकं केली नंतर मुंबईत आलो.पेइंग गेस्ट म्हणून राहिलो अर्थातच खूप संघर्ष करावा लागलाच अस अशोक शिंदे सांगतात.
षड्यंत्र नाटकातील प्रसंग
            अशोक शिंदेना पहिला ब्रेक जयश्री गडकरींनी दिला खरेतर त्यांचा पहिला सिनेमा "पवळा" नावाचा होता त्यात मोहन जोशी ,श्वेता नगरकर ,बाळ धुरी वै. मडळी होती त्यात त्यांनी" पठ्ठे बापुरावा ची" भूमिका साकारली होती पण तो सिनेमा रिलीज झाला नाही मग त्यांनी " सासर माहेर हा सिनेमा केला पण
त्या आधी "रेशम गाठी" रिलीज झाला तसा पहिला ब्रेक त्यांना जयश्री गडकरींनी अशी" असावी सासू"मधून दिला.
                    लहानपणीचा स्टेजवरचा निरागस आनंद आणि संघर्षा नंतरचा सफलतेचा आनंद शब्दातीत होता अस ते आपल्या पहिल्या ब्रेक नंतरच्या अनुभवा बद्दल सांगतात नंतर सिनेमे मिळत गेले "वाहवा "होत गेली मग पुंन्हा त्यांना मागे वळून पहाव लागलच नाही.अजूनही त्यांची घोडदौड चालूच आहे.
          एकाच वेळी सिनेमा सिरियल्स ह्यात कामे करताना दोन्हीचा मेळ साधताना त्यांची तारांबळ उडते सकाळी सिनेमाच सुटिंग ,दुपारी सिरियल्स मग पुन्हा रात्री सिनेमा असा त्यांचा दिवसभरचा भरगच्च कार्यक्रम असतो सध्या टी वी वरच्या बऱ्याच चानल्स वरच्या सिरियल्स मध्ये ते कामे करताहेत.
त्यांच्या फिगर मेंटेनस बद्दल सांगताना त्यांनी सांगितलं , ते सकाळी सहसा जेवत नाहीत नुसती फळे खातात ज्यूस पीत नाहीत कारण त्यात शुगर असते रात्री एकदाच जेवतात शिवाय ते रोज सकाळी अर्धा तास रनिंग आणि अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात मग ते कोठेही असले तरी नियम मोडत नाहीत
               अभिनय करताना काही खास तयारी करावी लागते का अस विचारल्यावर ते म्हणतात आता अभिनय त्यांच्या अंगवळणी पडलाय वेळेवर स्क्रिप्ट हाती येते कधी एक तास आधी तर कधी अगदी वेळेवर पण लहानपणापासून काम केल्याने अडचण येत नाही.तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे बुद्धिमान आहातच त्या मुळे संवाद लक्षात ठेवण सोप जात असेल शिवाय तुम्ही कुठल्याही व्यक्तिरेखेत फिट्ट बसता मग तो साधा सरळ नायक असो कि क्रूर खलनायक अस मी सांगितलं
त्या वर ते हसून Thanks म्हणतात.
         तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका करता कधी साधी सरळ तर कधी खलनायकी ढंगाची क्रूर कधी आनंदी तर कधी दु:खी! मग भाव भावनांचा हा मेळ कसा काय साधता? कारण थोडा वेळ तरी त्याचा परिणाम मनावर राहातच असेल ना ! अस मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं ,ते स्विच ऑन स्विच ऑफ पद्धतीने काम करतात.
नाटक,सिनेमा आणि सिरिअल्स यातलं त्यांच आवडत माध्यम नाटक आहे कारण ते लाईव असत त्यांना हिंदीतही काम करायचय पण ते योग्य संधीची वाट पाहताहेत
बरोबर आहे मराठीतले गुणी कलावंत हिंदीत फुटकळ भूमिका करताना पाहून लोकांना वाईट वाटत अस सांगताच त्यांनी नाना पाटेकरची आठवण करून दिली
त्यांच्या जीवनातली अविस्मरणीय घटना सांगताना त्यांनी मी वाईट गोष्टी चटकन विसरतो व चांगलच लक्षात ठेवतो अस सांगितलं.
            काल रात्री बारा वाजता ह्या सिनेमाची आठवण ते सांगतात "मी ती घटना कधीच विसरू शकत नाही
त्या सिनेमात मी ,मधु कांबीकर ,अलका कुबल वै, मंडळी होती. मी त्यात खलनायकाची भूमिका केली होती मी त्यात वाईट प्रवृत्तीचा आमदार असतो व अलका कुबल माझी बायको असते ती साधी सरळ व खूप चांगली असते मी तिचा सतत छळणारा व त्रास देणारा नवरा असतो मधु कांबीकर खलनायिका असते मी अलका कुबलला फसवतो अस त्यात दाखवण्यात आल होत त्या मुळे अलका कुबल वेडी होते .त्या सिनेमाच्या प्रीमियरला मी गेलो होतो बायकांची चिक्कार गर्दी होती सिनेमा सुटल्यावर काही जणीच माझ्याकडे लक्ष गेल त्यांनी अश्या काही नजरेन माझ्या कडे पाहिलं कि बस्स! आणि त्या एकमेकीला सांगू लागल्या," हाच बघ तो दुष्ट बायकोला छळणारा ह्याच्या मुळेच ती वेडी झाली" आणि त्या मला चक्क शिव्या देऊ लागल्या मला वाईट वाटल पण त्या वेळेस माझ्या सोबत रणजीत सिंह मोहिते पाटील होते ते म्हणाले अरे, हीच तर तुझ्या यशाची खरी पावती आहे ." !
अशोक शिंदे आपल्या अभिनय कारकिर्दी वर समाधानी तृप्त आहेत पण अजूनही त्यांना ह्या फिल्ड मध्ये खूप काही चांगल कारावस वाटतंय शिवाय समाजसेवाही करायचीय.
              अशोक शिंदेंचा प्रेमविवाह झालाय त्यांना दोन मुलीही आहेत आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून
ते आपला मोकळा वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत व आई वडिलांसोबत घालवतात अगदी घरकुल मधल्या अनिरुद्ध सारखाच कर्त्यव्यदक्ष प्रेमळ मुलगा ,पती आणि पिता पण त्या सिरियल मध्ये स्वभावाच्या अनेक छटा त्यांनी यशस्वीपणे पेलल्यात. त्याचे " संसार मांडते मी ", " शिर्डी के साईबाबा " आणि इतर अनेक सिनेमे,सिरीयल्स व अनेक नाटके तेव्हा येण्याच्या मार्गावर होते आतापर्यंत अशोक शिंदे यांचे जवळपास दोनशेच्या वर सिनेमे प्रदर्शित झाले आहेत .
            सध्या बरयाच चानल्स वरून त्यांच्या सिरियल्स सुरु आहेत विशेषत; स्वप्नांच्या पलीकडले हि स्टार वाहिनी वर प्रसारित होणारी डेलीसोप त्यांचे षड्यंत्र हे नाटक यवतमाळ येथे येऊन गेले तेव्हाही त्यांना भेटण्याचा योग आला त्यांनीहि आवर्जून आठवण ठेवून विचारपूस केली त्यांचा त्या नाटकातला खलनायक पाहून खरोखरच त्यांच्या अभिनयाची चुणूक दिसली.
                     त्यांच्यातला विनय,दुसरयाना मान देण्याची निगर्वी वृत्ती हेच तर त्यांच्या यशाच रहस्य आहे
पहिल्याच क्षणी साधेपणामुळे ते समोरच्याचे मन जिंकतात आपल्यातल्या मोठेपणाचा जराही गर्व त्यांच्या ठाई दिसत नाही. नुकताच त्यांचा नवा सिनेमा "विशेष म्हणजे ही माझी मिसेस " प्रदर्शित झालाय.
                        "स्टार प्रवाह" ह्या वाहिनी वर सध्या त्यांची "लगोरी "ही नवी मालिका पण  सुरु झालीय
त्यात ते आधुनिक प्रेमळ पित्याची भूमिका साकारत आहेत.
                 
 yojana.duddalwar@gmail.









































Friday, 18 January 2013

सर्प मित्रांना आवरा

                       सापांची भीती वाटू नये म्हणून काही सर्प मित्र काम करतात ते लोकांना साप पकडण्यास मदत करतात व साप पकडण्यास शिकवतात पण आता हे हौशी सर्प मित्र लोकांची डोकेदुखी ठरू लागले आहेत कारण ते त्याचा गैरफायदा घेऊ लागले आहेत . असे लोक साप पकडून ते लोकांच्या घरातील आवारात , नालीत ,झाडावर कधी कधी घरात देखील सोडतात व नंतर त्यांनाच पकडायला बोलवावे लागते किव्हा ते पकडून दाखवतात अर्थात सारेच सर्पमित्र असे नसतात.पण काही जण लाकांना उपद्रव देणारेही असतात तर काही जण काही दुर्मिळ सापांची विक्री करून लोकांना त्रास तर देतातच शिवाय गुप्त धनाचे आमिष दाखवून लोकांना लुबाडतात अशा सर्प मित्रांना मागे पकडण्यात आले होते पण ते पुन्हा सक्रिय झाले आहेत.
                    अशा लोकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी नाहीतर लोक सापांना मारण्यास मागे पुढे
पाहणार नाहीत.

भोंदू साधू पासून सावध व्हा


                   समाजात भोंदू साधूची कमतरता नाही ,गावोगावी,खेड्यापाड्यात,शहरात देखील असे भोंदू साधू असतात .ते साध्या भोळ्या लोकांना फसवतात .जेव्हा फसवणूक उघडकीला येते तोपर्यंत असे साधू परागंदा झालेले असतात म्हणूनच अशा साधू पासून सावध राहावे.
                    जेव्हा लोक आपली समस्या घेवून साधू कडे जातात तेव्हा ते त्यांच्याच तोंडून ऐकलेली माहिती जाणून घेवून त्यांचा माग काढतात त्यांची आणखी माहिती गोळा करून जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा ते चकित होतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.ते सांगतील तसे उपाय करतात ,ते म्हणतील ते आणून देतात सोने,नाणे ,पैसे व इतर वस्तू मग त्या साधूला दक्षिणा म्हणून देतात ,पूर्ण पणे लुबाडल्या नंतर भोळ्या भक्तांच्या लक्षात हि गोष्ट येते पण साधू त्यांना दाद देत नाही.
                     कधी,कधी तर ते त्यांचा फोन देखील चोरून ऐकतात भोळ्या भक्तांनी त्त्यांना फोन नंबर दिलेला असतोच ,कधी फोनला क्लिप बसवून तर कधी फोन वायर मधेच दुसरया फोनला जोडून ,तर कधी काही भ्रष्ट कर्मच्यारांना हाताशी धरून अशा गोष्टी घडतात.
                       हे साधू आपल्या भोळ्या भक्तांना हातातून अंगारे,कुंकू काढून दाखवतात त्यासाठी त्यांच्या शर्टाच्या बाहीत हाताच्या कोपरयात ते कुंकवाची किव्हा अंगारयाची पुडी कशी लपवतात ते अंध श्रद्धा निर्मुलन समिती कित्येकदा दाखवत असते कित्तेक टी ,वी चानेल वरूनही अशी माहिती प्रसारित होत असते असे साधू हवेतून हातचलाखीने अंगठी कशी काढून दाखवतात हे देखील एका चानेल वरून दाखवण्यात आले होते त्या अंगठ्या देखील अशाच भोळ्या भक्तांकडून हडपलेल्या होत्या शिवाय नारळ आधीच फोडून त्यात चिंधी,हळद,कुंकू,लिंबू घालून मग ते चमत्कार म्हणून त्यातून काढणे अंगातील भूत काढण्याच्या नावाखाली झोडपणे घरात भूत आहे हे दाखवण्यासाठी घरातल्या वस्तू गहाळ करणे ,कपडे फाडणे घरात लिंबू टाकणे जळते कपडे टाकणे हे देखील दाखवून दिले होते ह्या मध्ये काही बिल्डर देखील सहभागी असतात एखादी वास्तू भारलेली आहे हे दाखवून ती विकायला भाग पाडण्यासाठी अशी कामे केल्या जातात तर कधी गुप्तधन आहे असे सांगून साप सोडल्या जातो मागे काही साधुनी त्याच घरातील वस्तू दागिने चोरवून तिथेच पुरून गुप्त धन आहे हे सिद्ध करण्यासाठी असे केल्याची बातमी देखील वाचण्यात आली होती शिवाय एका साधूने तर काही भक्तांना कसे ब्ल्याक मेल केले काही तरुणींना साप अंगावर सोडून दुष्कृत्य करण्यास कसे बाध्य केले आणि त्याला काही फसवल्या गेलेल्या लोकांनी कसे पकडले हे देखील त्या चानेल वाल्यांनी निर्भीडपणे दाखविले होते
                   तेव्हा पैसे ,दागिने डबल करून देण्याचा दावा करणारया अशक्य गोष्ट शक्य करूनसमस्या सोडवून देण्याचा दावा करणाऱ्या साधू पासून सावध राहणेच बरे अन्यथा तुम्ही फसवले जाण्याची शक्यता असते.

Tuesday, 8 January 2013

हुरडा विक्री आता गाडीवर

                           पूर्वी शेतातून हुरडा पार्ट्या रंगत ,थंडी सुरु होताच शेतात्त ज्वारी कोवळ्या हुरड्या वर आली कि ,शेतातून हुरडा पार्टी दिल्या जाई तेव्हा हुरडा खायला शेतातच जावे लागे घरी हुरडा पार्टीच्या वेळेस उरलेला भाजलेला हुरडाच आणल्या जाई.पण जग बदलत चालल ,आणि हुरड्याच मार्केटिंग झाल मग शेतातच ढाब्या सारखे बाकडे,खुर्च्या टाकून हुरडा खायला मिळू लागला पण ह्याचा फायदा फक्त गाडीवाल्यांनाच मिळत असल्यानेच कि काय हुरडा भाजी मार्केट मध्ये विक्रीस आला तिथून तो मग pack केलेल्या पाकिटातून किराणा दुकानात पोहचला.
       आणि आता तो चक्क गाडीवर विकायला आलाय. परवा नागपूरच्या बर्डी मध्ये हुरड्याची गाडी दिसली तेव्हा नवल वाटले कारण आता पर्यंत फळे व भाजीपाला फक्त गाडीवर विकायला येत होता .आता लवकरच तो यवतमाळ मध्ये पण विकायला येईल कदाचित दारावर सुद्धा गाडीवरून हुरडा विकायला आल्यास नवल वाटणार नाही उलट गृहिणींना घरबसल्या हुरडा खायला मिळेल अर्थात त्यात शेतातल्या हुरडा पार्टीचा आनंद मात्र मिळणार नाही.

Tuesday, 1 January 2013

नववर्षाभिनंदन

                                                     ढगा आडूनी हळू,हळू
                                                                                   रविराज अवतरला
                                                           चंदेरी रुपेरी सोनेरी
                                                                                     प्रकाश घेवूनी आला
                                                        अंधारल्या सृष्ठी तला
                                                                                       तम  दूर सारीला  
                                                            चरा चरातून  नवचैत्यन्य                       
                                                                                      अन उत्साह संचारला
                                                             पानगळीने तरुवर
                                                                                      निष्पर्ण जरी झाला
                                                                 नव निर्मितीचा ध्यास त्याने
                                                                                        मनी जागवला

काळ्या कपड्यातली भक्ती

         दसरा  ते संक्रांति दरम्यान आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक मध्ये कुठल्याही शहरात,खेड्यात,रस्त्या,रस्त्यावर काळे कपडे धारी लोक दिसतात मग ते तिरुमला,तिरुपतीच मंदीर असो,कि कानिपाकमचे गणपती मंदीर असो किव्हा रस्त्यातील छोटी मोठी मंदिरे .एवढेच नाही तर हैद्राबाद,कर्नुल सारख्या शहरात साध्या व काही मोठ्या हॉटेलात,दुकानात देखील मालकापासून सेल्समन पर्यंत असे काळे कपडेधारी भक्त दिसतात.कुतूहल म्हणून सहज विचारले असता कळालेली माहिती अशी की ते ऐयाप्पा स्वामीचे भक्त आहेत.      
                       केरळ मधील साबरीमला इथे ऐयाप्पा स्वामीचे मंदिर आहे हे मंदिर पहाडात असल्याने कित्येक मैल पायी जावे लागते जवळच पंपा नदी वाहते मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलात सतत बारुदाचा स्फोट केल्या जातो जेणे करून वाघ सिंहा सारखी श्वापद दूर पळावीत मंदिरात जाताना वाटेत पाच ठिकाणी नारळ फोडल्या जातात व अंघोळ केल्या जाते काळे कपडे असतील तरच प्रवेश मिळतो नाहीतर दुरूनच दर्शन घ्यावे लागते.  
                     ह्या स्वामीची कथा अशी सांगितल्या जाते कि हे स्वामी म्हणजे अगदी लहान बालक होते ते एकदा मित्रांसमवेत जंगलात फिरायला गेले तेव्हा जंगलात वाघ आला ,मित्र घाबरून पळाले परंतु ऐयाप्पा स्वामी मात्र वाघाशी खेळत बसले तेव्हा त्यांचे मित्र घाबरून ऐयाप्पाच्या आई,वडिलांना घेवून आले त्यांनी पण ते दृश्य पहिले नंतर ते स्वामी जंगलात अदृश्य झाले म्हणून त्या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले.
                       दर वर्षी संक्रांतीला श्रद्धाळूंना स्वामी ज्योतीच्या स्वरुपात दर्शन देतात अशी भक्तांची श्रद्धा आहे म्हणूनच दसऱ्यानंतर संक्रांति पर्यंत स्वामी भक्ती केल्या जाते त्यासाठी पंचेचाळीस दिवस काळे कपडे वापरले जातात दाढी केल्या जात नाही चटई वर झोपावे लागते ब्रम्हचर्य पाळले जाते पायात चप्पल वापरल्या जात नाही स्वतःचे जेवण स्वतः बनवले जाते आता काळानुरूप स्वयंपाक बनवला जात नसला तरीही इतर गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात काहीजण मात्र देवळात जाण्यासाठी शेवटची स्टेप येते तेव्हा काळे कपडे घालून पायऱ्या चढतात. हे व्रत बायकांना करता येत नाही पण चाळीशी नंतर हे व्रत बायका करू शकतात.