दसरा ते संक्रांति दरम्यान आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक मध्ये कुठल्याही शहरात,खेड्यात,रस्त्या,रस्त्यावर काळे कपडे धारी लोक दिसतात मग ते तिरुमला,तिरुपतीच मंदीर असो,कि कानिपाकमचे गणपती मंदीर असो किव्हा रस्त्यातील छोटी मोठी मंदिरे .एवढेच नाही तर हैद्राबाद,कर्नुल सारख्या शहरात साध्या व काही मोठ्या हॉटेलात,दुकानात देखील मालकापासून सेल्समन पर्यंत असे काळे कपडेधारी भक्त दिसतात.कुतूहल म्हणून सहज विचारले असता कळालेली माहिती अशी की ते ऐयाप्पा स्वामीचे भक्त आहेत.
केरळ मधील साबरीमला इथे ऐयाप्पा स्वामीचे मंदिर आहे हे मंदिर पहाडात असल्याने कित्येक मैल पायी जावे लागते जवळच पंपा नदी वाहते मंदिरापासून पाच किलोमीटर अंतरावर जंगलात सतत बारुदाचा स्फोट केल्या जातो जेणे करून वाघ सिंहा सारखी श्वापद दूर पळावीत मंदिरात जाताना वाटेत पाच ठिकाणी नारळ फोडल्या जातात व अंघोळ केल्या जाते काळे कपडे असतील तरच प्रवेश मिळतो नाहीतर दुरूनच दर्शन घ्यावे लागते.
ह्या स्वामीची कथा अशी सांगितल्या जाते कि हे स्वामी म्हणजे अगदी लहान बालक होते ते एकदा मित्रांसमवेत जंगलात फिरायला गेले तेव्हा जंगलात वाघ आला ,मित्र घाबरून पळाले परंतु ऐयाप्पा स्वामी मात्र वाघाशी खेळत बसले तेव्हा त्यांचे मित्र घाबरून ऐयाप्पाच्या आई,वडिलांना घेवून आले त्यांनी पण ते दृश्य पहिले नंतर ते स्वामी जंगलात अदृश्य झाले म्हणून त्या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले.
दर वर्षी संक्रांतीला श्रद्धाळूंना स्वामी ज्योतीच्या स्वरुपात दर्शन देतात अशी भक्तांची श्रद्धा आहे म्हणूनच दसऱ्यानंतर संक्रांति पर्यंत स्वामी भक्ती केल्या जाते त्यासाठी पंचेचाळीस दिवस काळे कपडे वापरले जातात दाढी केल्या जात नाही चटई वर झोपावे लागते ब्रम्हचर्य पाळले जाते पायात चप्पल वापरल्या जात नाही स्वतःचे जेवण स्वतः बनवले जाते आता काळानुरूप स्वयंपाक बनवला जात नसला तरीही इतर गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात काहीजण मात्र देवळात जाण्यासाठी शेवटची स्टेप येते तेव्हा काळे कपडे घालून पायऱ्या चढतात. हे व्रत बायकांना करता येत नाही पण चाळीशी नंतर हे व्रत बायका करू शकतात.

No comments:
Post a Comment