समाजात भोंदू साधूची कमतरता नाही ,गावोगावी,खेड्यापाड्यात,शहरात देखील असे भोंदू साधू असतात .ते साध्या भोळ्या लोकांना फसवतात .जेव्हा फसवणूक उघडकीला येते तोपर्यंत असे साधू परागंदा झालेले असतात म्हणूनच अशा साधू पासून सावध राहावे.
जेव्हा लोक आपली समस्या घेवून साधू कडे जातात तेव्हा ते त्यांच्याच तोंडून ऐकलेली माहिती जाणून घेवून त्यांचा माग काढतात त्यांची आणखी माहिती गोळा करून जेव्हा त्यांना सांगतात तेव्हा ते चकित होतात आणि त्यांच्या जाळ्यात अडकतात.ते सांगतील तसे उपाय करतात ,ते म्हणतील ते आणून देतात सोने,नाणे ,पैसे व इतर वस्तू मग त्या साधूला दक्षिणा म्हणून देतात ,पूर्ण पणे लुबाडल्या नंतर भोळ्या भक्तांच्या लक्षात हि गोष्ट येते पण साधू त्यांना दाद देत नाही.
कधी,कधी तर ते त्यांचा फोन देखील चोरून ऐकतात भोळ्या भक्तांनी त्त्यांना फोन नंबर दिलेला असतोच ,कधी फोनला क्लिप बसवून तर कधी फोन वायर मधेच दुसरया फोनला जोडून ,तर कधी काही भ्रष्ट कर्मच्यारांना हाताशी धरून अशा गोष्टी घडतात.
हे साधू आपल्या भोळ्या भक्तांना हातातून अंगारे,कुंकू काढून दाखवतात त्यासाठी त्यांच्या शर्टाच्या बाहीत हाताच्या कोपरयात ते कुंकवाची किव्हा अंगारयाची पुडी कशी लपवतात ते अंध श्रद्धा निर्मुलन समिती कित्येकदा दाखवत असते कित्तेक टी ,वी चानेल वरूनही अशी माहिती प्रसारित होत असते असे साधू हवेतून हातचलाखीने अंगठी कशी काढून दाखवतात हे देखील एका चानेल वरून दाखवण्यात आले होते त्या अंगठ्या देखील अशाच भोळ्या भक्तांकडून हडपलेल्या होत्या शिवाय नारळ आधीच फोडून त्यात चिंधी,हळद,कुंकू,लिंबू घालून मग ते चमत्कार म्हणून त्यातून काढणे अंगातील भूत काढण्याच्या नावाखाली झोडपणे घरात भूत आहे हे दाखवण्यासाठी घरातल्या वस्तू गहाळ करणे ,कपडे फाडणे घरात लिंबू टाकणे जळते कपडे टाकणे हे देखील दाखवून दिले होते ह्या मध्ये काही बिल्डर देखील सहभागी असतात एखादी वास्तू भारलेली आहे हे दाखवून ती विकायला भाग पाडण्यासाठी अशी कामे केल्या जातात तर कधी गुप्तधन आहे असे सांगून साप सोडल्या जातो मागे काही साधुनी त्याच घरातील वस्तू दागिने चोरवून तिथेच पुरून गुप्त धन आहे हे सिद्ध करण्यासाठी असे केल्याची बातमी देखील वाचण्यात आली होती शिवाय एका साधूने तर काही भक्तांना कसे ब्ल्याक मेल केले काही तरुणींना साप अंगावर सोडून दुष्कृत्य करण्यास कसे बाध्य केले आणि त्याला काही फसवल्या गेलेल्या लोकांनी कसे पकडले हे देखील त्या चानेल वाल्यांनी निर्भीडपणे दाखविले होते
तेव्हा पैसे ,दागिने डबल करून देण्याचा दावा करणारया अशक्य गोष्ट शक्य करूनसमस्या सोडवून देण्याचा दावा करणाऱ्या साधू पासून सावध राहणेच बरे अन्यथा तुम्ही फसवले जाण्याची शक्यता असते.
No comments:
Post a Comment