Saturday, 11 April 2026

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतील चारही अंतराळवीर चंद्राला यशस्वी गवसणी घालून पृथ्वीवर पोहोचले

 NASA’s Artemis II crew in their Orion spacecraft is back on Earth. They successfully completed a parachute-assisted splashdown in the Pacific Ocean off the coast of San Diego at 8:07 p.m. EDT (5:07 p.m. PDT).

नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील Orion अंतराळयान आणि अंतराळवीर अमेरिकेच्या  पॅसिफिक महासागराच्या San Diego येथील खाडीत पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -(Space news) 10 एप्रिल  

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman ,Victor Glover,Christina Koch आणि कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hansen चंद्राला यशस्वी गवसणी घालून पृथ्वीवर पोहोचले ह्या अंतराळविरांनी अमेरिकेच्या अपोलो मोहिमेनंतर पन्नास वर्षांनी सुरु झालेल्या ह्या चांद्रमोहिमेत ऐतिहासिक विक्रम नोंदविला शुक्रवारी संध्याकाळी 5.7 मिनिटांनी (स्थानिक वेळ) अमेरिकेतील पॅसिफिक महासागराच्या San Diego येथील खाडीत Orion अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले 

  

 Orion अंतराळयान पॅसिफिक महासागरात उतरल्यानंतर नासाच्या रिकव्हरी बोटी तेथे पोहोचल्या -फोटो नासा संस्था  

पॅसिफिक महासागरात अंतराळयान पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरल्यानंतर अंतराळयान आणि अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी विशेष डिझाईन केलेल्या नासा आणि अमेरिकन लष्कराच्या रिकव्हरी बोटी आणि रिकव्हरी टीम तेथे पोहोचल्या त्यांनी अंतराळयानाजवळ जाऊन अंतराळवीरांना खुल्या पाण्यातच अंतराळयानातून बाहेर काढले आणि नासाच्या हेलिकॉप्टर मधून त्यांना USS John Murtha जहाजाच्या डेकवर नेले तेथे त्यांचे प्राथमिक चेकअप झाल्यानंतर ह्या अंतराळवीरांना शनिवारी विमानाने नासाच्या Huston येथील Johnson Space Center येथे पोहोचविण्यात आले 

   

आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman ह्यांना नासाच्या हेलिकॉप्टरने John Murtha जहाजावर नेताना -फोटो -नासा संस्था 

अंतराळवीर Reid,Christina ,Victor आणि Jeremy पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्यानंतर नासाचे Administrator Jared Isaacman ह्यांनी अंतराळवीरांचे स्वागत केले ," हि ऐतिहासिक मोहीम यशस्वी केल्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि तुमचे पृथ्वीवर स्वागत ! ह्या ऐतिहासिक मोहिमेला परवानगी व आर्थिक पाठिंबा दिला त्या बद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांचेही आभार! ह्या अंतराळवीरांनी अत्यंत कौशल्याने,धैर्याने हि अत्यंत जोखमीची मोहीम पार पाडली आणि Orion अंतराळयान आणि त्यातील अत्याधुनिक सिस्टीम्सची चाचणी घेतली शिवाय चंद्राच्या काळोख्या भागात प्रवेश करताना जीवाची पर्वा न करता घोका पत्करला आणि आजवर मानवाला अज्ञात असलेल्या ह्या भागातील कक्षेत प्रवेश करून संशोधित माहिती आणि फोटो घेतले हि ऐतिहासिक वैशिष्टपूर्ण कामगिरी अमेरिकेसाठी गौरवास्पद आहे त्यांचे ह्या देशाप्रती समर्पण आणि धैर्य  आणी चिकाटी नासा संस्था संस्थेतील सहभागी देश आणि आर्टेमिस मोहिमेतील शास्त्रज्ञ आणि इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि भविष्यकालीन मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्रभूमीवर उतरण्यासाठीची पाऊलवाट ठरेल !"


अंतराळवीर Reid Wiseman त्यांच्या दिवंगत पत्नी Carroll सोबत - फोटो- नासा संस्था 

ह्या अंतराळवीरांनी चंद्राच्या कक्षेतील दुरवरच्या भागात प्रवेश करून आधीच्या अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांचा रेकॉर्ड मोडला तेव्हा नासा संस्थेतील प्रमुखांनी लाईव्ह संपर्क साधत त्यांचे अभिनंदन केले त्या क्षणी अंतराळवीरांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते तेव्हा अंतराळवीर Hansen म्हणाले ह्या मोहिमेसाठी आमची निवड झाली तेव्हा आमचे कुटुंबीय आनंदित झाले होते पण दुर्दैवाने अंतराळवीर Reid ह्यांच्या पत्नी हे यश पहायला हयात नाहीत 2020 मध्ये त्या हे जग सोडून गेल्या आता ह्या क्षणी त्यांना त्यांच्या पत्नीची आठवण झाली म्हणून आम्ही आता आम्हाला दिसलेले चंद्र भुमीवरील विवर जे आधीच्या Glushko Craterआणी Ohm Craterच्या जवळपास आहे आणी तो पृथ्वीवरून  आपल्याला कधी कधी चमकत्या ठिपक्याच्या स्वरूपात दिसतो म्हणून आम्ही सर्वांनी त्यांच्या स्मरणार्थ ह्या विवराला Carroll Moon Crater असे नाव देण्याचे ठरविले आहे तुमची परवानगी आहे का ? तेव्हा त्यांनी होकार दिला पण नासा संस्थेतील मान्यवरांच्या निर्णयानंतर ह्या वर अंतिम शिक्कामोर्तब होईल  

ह्या अंतराळवीरांनी त्यांच्या दहा दिवसांच्या मोहिमेत पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधून चंद्रावरील पृथ्वीचा उदयास्त,सूर्यग्रहण आणि त्या दरम्यान झालेल्या उल्कापाताचा प्रकाशझोत ह्यांचे लाईव्ह व्हिडीओ व फोटो दाखविले त्यांनी पृथ्वीवरील लाईव्ह संपर्कादरम्यान अमेरिकेतील निवडक प्रसारमाध्यमांशी,अंतराळस्थानकातील अंतराळवीरांशी देखील संवाद साधला

  

 अंतराळवीर Christina Koch  अंतराळ प्रवासादरम्यान चंद्राच्या कक्षेतुन पृथ्वीकडे पहाताना - फोटो -नासा संस्था

अंतराळवीर Jessica ह्यांना Christina Koch म्हणाल्या," स्थानकातून पृथ्वीकडे पाहताना आपल्याला आपल्या पृथ्वीचे सौन्दर्य आणि महत्व कळते पण चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीकडे पाहताना आपल्याला दुसरी बाजु दिसते पृथ्वीभोवतीचा प्रचंड अंधार  पाहून ह्या प्रचंड ब्रह्मांडात एकट्या पृथ्वीने आपले सौन्दर्य कसे टिकविले ह्याचे आश्चर्य वाटते पृथ्वीवरील जगभरातील मानव  सारखाच आहे तो एकाच वातावरणात राहतो जगण्यासाठी एकाच वायूचा उपयोग करतो त्या मुळे ह्या वैशिष्ठपूर्ण एकमेव पृथ्वीच्या संरक्षणाची जाणीव तीव्रतेने होते !"

No comments:

Post a Comment