Thursday, 9 April 2026

नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या कक्षेतील यशस्वी भ्रमणादरम्यान टिपले सूर्यग्रहणाचे फोटो

    The four Artemis II crew members participate in a live downlink on flight day six, following the conclusion of their lunar flyby.

चंद्राच्या कक्षेतील यशस्वी भ्रमणानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी आर्टेमिस मोहिमेतील  अंतराळवीर Jeremy Hansen ,Christina Koch,Reid Wiseman ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले अंतराळयानातून त्यांच्याशी संवाद साधताना अंतराळवीर -फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -7 एप्रिल 

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman ,Christina Koch,Victor Glover आणि Jeremy Hansen हे चारही अंतराळवीर Orionअंतराळयानाच्या Test  Flight मोहिमे अंतर्गत एक एप्रिल पासून  चंद्रमोहिमेवर गेले आहेत पृथ्वीच्या कक्षेत ह्या अंतराळयानाची व त्यातील सर्व अत्याधुनिक उपकरणे आणि सिस्टीमची कार्यक्षमता चेक केल्यानंतर सहा तारखेला ह्या चारही अंतराळवीरांसह Orion अंतराळयानाने चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला ह्या मोहिमेतील प्रेवेशनंतरच्या चंद्रभ्रमणा दरम्यान अंतराळवीरांनी चंद्रभूमीवरील अत्यंत महत्वपूर्ण संशोधित माहिती आणि फोटो गोळा केले आहेत अमेरिकेच्या अपोलो चंद्र मोहिमेनंतर पन्नास वर्षांनी आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या कक्षेत शिरून हि मोहीम यशस्वी केली त्या मुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले आता हे चारही अंतराळवीर पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा प्रवेश करून परतण्याच्या मार्गावर आहेत 

 The Moon, backlit by the Sun during a solar eclipse, is photographed by NASA’s Orion spacecraft on April 6, 2026, during the Artemis II mission. Orion is visible in the foreground on the left. Earth is reflecting sunlight at the left edge of the Moon, which is slightly brighter than the rest of the disk. The bright spot visible just below the Moon’s bottom right edge is Saturn. Beyond that, the bright spot at the right edge of the image is Mars.आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्र भ्रमणा दरम्यान पाहिलेल्या सूर्यग्रहणाचा हा अद्भुत क्षण- फोटो -नासा संस्था 

नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या कक्षेतील प्रवेशानंतर पृथ्वीवरुन मानवाला न दिसणाऱ्या चंद्राच्या अंधारलेल्या भागात सुरक्षितपणे प्रवेश करत हि मोहीम यशस्वी केली ह्या भागातील भ्रमणादरम्यान ह्या चारही अंतराळवीरांना चंद्रावरील सूर्यग्रहण पाहायला मिळाले आणि विशेष म्हणजे चंद्रावरून पृथ्वीचा उदय आणि अस्त देखील पाहायला मिळाला अंतराळवीरांनी मिळालेल्या ह्या अमूल्य संधीचा लाभ घेत अंतराळयानातील अद्ययावत High Resolution कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्या अद्भुत नैसर्गिक क्षणाचे हजारो फोटो त्वरित कॅमेराबद्ध करून पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवले आणि नासा संस्थेने ते जगभरातील नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध केले ह्या चारही अंतराळवीरांनी हे अवघड काम अवघ्या सात तासात पूर्ण केले 

 A muted blue Earth with bright white clouds sets behind the cratered lunar surface. The dark portion of Earth is experiencing nighttime. On Earth’s day side, swirling clouds are visible over the Australia and Oceania region. In the foreground, Ohm crater has terraced edges and a flat floor interrupted by central peaks. Central peaks form in complex craters when the lunar surface, liquefied on impact, splashes upwards during the crater’s formation.

आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांनी कॅमेराबद्ध केलेले चंद्र भूमीवरील उगवत्या पृथ्वीचे हे विलोभनीय दृश्य 

ह्या चारही अंतराळवीरांनी चंद्राच्या कक्षेतील भ्रमणादरम्यान ह्या भागातील काळोखात तेथील दुर्गम भागातील फोटो कॅमेराबद्ध केले ह्या टीमने चंद्रभूमीवरील उल्कापातामुळे पडलेले खड्डे पुरातनकाळी भूगर्भातून जमिनीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसाच्या प्रवाहाच्या खुणा भूकंपामुळे जमिनीला पडलेल्या भेगा ह्यांची नोंद फोटोतून घेतली ह्या संशोधित फोटोंमुळे शास्त्रज्ञांना चंद्रावरील भूगर्भीय माहिती संशोधित करण्यास मदत होईल अंतराळवीरांनी  घेतलेल्या फोटोतून चंद्रभूमीवरील खडकाळ भाग,उंच सखल भाग,खड्डे मातीचा रंग आणि जमिनीचा पोत स्पष्ठ दिसत आहे ह्या अंतराळवीरांच्या सूक्ष्म नीरक्षीत संशोधित फोटो आणि माहितीमुळे ह्या टीम मधील नासाचे शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत  

पृथ्वीवरील मानव रोजच चंद्र आणि सूर्याचा उदयास्त पहातो पण ह्या अंतराळवीरांनी चंद्रावरून पृथ्वीचा उदयास्त पाहिला ह्या अंतराळवीरांमुळे पृथ्वीवासीयांना देखील पृथ्वीचे अंतराळातील उगवणे आणि मावळणे पाहायला मिळाले शिवाय ह्या अंतराळवीरांना चंद्रावरील सूर्यग्रहण पाहायला मिळाले ह्या सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याभोवतीच्या प्रभामंडळाचा तीव्र प्रकाश आणि त्या प्रकाशात चंद्रभूमीवर सहा उल्कापाताचे प्रकाशझोत पडलेले दिसले ह्या अंतराळवीरांच्या चंद्राच्या कक्षेतील प्रवेशानंतर थोडा वेळ पृथ्वीशी  संपर्क देखील तुटला होता 

आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांच्या चंद्राच्या काळोख्या भागातील यशस्वी भ्रमणानंतर नासाच्या Washington  Space center मधील Associate Administrator Nicky Fox म्हणतात,ह्या अंतराळवीरांनी मानवाला अज्ञात असलेल्या चंद्राच्या काळोख्या भागातील अभूतपूर्व संशोधित माहिती व फोटो मिळवले आहेत हि संशोधित माहिती भविष्यकालीन चंद्रमोहिमेतील अंतराळवीरासाठी आणि तेथील भविष्यकालीन मानवी निवासासाठी उपयुक्त ठरेल आणि भावी अंतराळवीरांना प्रेरणादायी ठरेल 

दहा तारखेला हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असून त्यांच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याची तयारी नासा संस्थेत सुरु आहे  

No comments:

Post a Comment