Saturday 29 June 2024

चंद्रावरील भविष्यकालीन घर बांधणीसाठी Fungi चा वापर करून बनविलेल्या पर्यावरण पूरक विटांची नासा संस्थेतर्फे निवड

  A pile of white bricks in a pile.

Mycelium ,Yard waste आणि Wood Chips ह्या पासून नासाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या पर्यावरण पूरक विटा -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -26 जुन  

नासाच्या आर्टेमिस मोहिमे अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत तेथे भविष्यकालीन मानवी वास्तव्यासाठी पोषक वातावरण,पाणी आणि राहण्यायोग्य ठिकाणाचा शोध घेणार आहेत सध्या त्याची जय्यत तयारी सुरु आहे भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या परग्रहावरील निवासासाठी आणि मानवी वसाहतीसाठी तेथे वास्तव्य करण्यासाठी घरांची आवश्यकता भासणार आहे नासाच्या अभिनव उपक्रमा अंतर्गत नागरिकांना चंद्रावर निवास करण्यायोग्य घर बांधण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्याची संधी जाहीर केली होती त्याच उपक्रमा अंतर्गत California येथील नासाच्या Ames Research Center मधील शास्त्रज्ञांनी घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या Fungi पासून बनविलेल्या पर्यावरण पूरक विटांची निवड निश्चित केली आहे 

शास्त्रज्ञांनी ह्या विटा Mycellia ह्या मशरूम सारख्या दिसणाऱ्या Fungi पासून तयार केल्या आहेत ह्या Fungi च्या जमिनीखाली मातीत पसरलेल्या सूक्ष्म धाग्यासारख्या दिसणाऱ्या मुळांचा वापर ह्यात केला आहे ह्या विटा वजनाने हलक्या आणि पर्यावरण पूरक आहेत ह्या विटांमध्ये वापरण्यात आलेल्या Mycellia चा वापर पाणी गाळण्यासाठी आणि सांडपाण्यातून खनिज पदार्थ वेगळे करण्यासाठी होऊ शकतो

भविष्यकालीन चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी तेथील मानवी निवास निर्मिती साठी Lander आणि Rover पाठवले जातील पण घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी नासाच्या Mycotecture Project Team मधील शास्त्रज्ञांनी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली आहे त्यांनी मश्रुम सारख्या दिसणाऱ्या Mycelium Fungi आणि त्यातील सूक्ष्म तंतूंचा वापर विटा बनविण्यासाठी केल्याने ह्या विटा पृथ्वीवर वापरण्यात येणाऱ्या विटांपेक्षा वजनाने हलक्या आहेत त्या मुळे भविष्य कालीन अंतराळ मोहिमेत इतर बांधकाम साहित्यासोबत पृथ्वीवरून चंद्रावर पाठवणे सोपे होईल शिवाय ह्या विटा साचेबद्ध आकारात तयार करता येतात त्या मुळे घर बांधताना ज्या साचेबद्ध आकारात त्या बनविल्या जातील तसाच आकार त्यांना प्राप्त होईल पाणी घालून त्याचा वापर करता येऊ शकतो  Mycellia मध्ये वातावरणातून सूर्यकिरणांच्या मदतीने हवेतील Oxygen शोषून Co2 बाहेर टाकल्या जाईल आणि ह्या विटांमध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन देखील राखले जाईल ह्या विटांवर आजूबाजूच्या दूषित वातावरणाचा परिणाम होऊ नये म्हणून सुरक्षित ठिकाणी त्या ठेवल्या जातील 

अंतिम निवड करण्याआधी नासाच्या Innovative Concept Program (NIAC) द्वारे ह्या विटांचे आधी नासा संस्थेतील लॅब मध्ये परीक्षण केले गेले ह्या बुरशीचा उपयोग करून Bio Composites,Fabricated prototypes ह्या सारख्या अनेक गोष्टींची लॅब मधील परग्रहा सारख्या कृत्रिम वातावरणात चाचणी घेतली गेली ह्या विटांमध्ये वापरण्यात आलेले इतर साहित्य व तेथील किरणोत्सर्गापासून ह्या विटांचा बचाव करण्यासाठीचे उपाय ह्या बाबी विचारात घेऊन चांद्रभूमीवरील घराचे नमुना मॉडेल बनविण्यात आले हि नाविन्यपूर्ण संकल्पना फक्त परग्रहावरच नाही तर पृथ्वीवरही उपयुक्त ठरू शकते

NIAC program टीमचे प्रमुख Jon Nelson म्हणतात, "Mycotecture Off Planet हि संकल्पना अंतराळ विश्वातील भविष्य कालीन शोधमोहिमेची पायाभरणी आहे  2024च्या जानेवारीत ह्या प्रोजेक्ट ची निवड झाली पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात चाचणी झाल्यानंतरचा हा तिसरा टप्पा आहे!" येत्या दोन वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी नासा संस्था दोन दशलक्ष डॉलरची मदत करणार असून NASA Ames मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ व ह्या मोहिमेचे टीम प्रमुख Lynn Rothschild हे ह्या कामाचे नेतृत्व करतील

ह्या विटांची अंतिम निवड झाल्यानंतर नासाचे Administrator Bill Nelson म्हणाले,"नासा संस्थेतील शास्त्रज्ञ परग्रहावरील संशोधनासाठी आणि तेथील भविष्यकालीन मानवी निवासासाठी सतत प्रयत्न करत असतात नासा संस्था देखील नवनवीन उपक्रम राबवून आजवर अस्तित्वात नसलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला प्रोत्साहन देते भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहीमांसाठी अशा शोधांची गरज आहे नासाच्या Space Technology आणि NIAC च्या टीमने मिळून ह्या विटांचा शोध लावला आहे हा नाविन्यपूर्ण शोध आगामी आर्टेमिस मोहिमेसाठी उपयुक्त आहे ह्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करून दाखविले आहे आर्टेमिस मोहिमेतील अंतराळवीरांच्या चांद्रभूमीवरील वास्तव्यासाठी आणि तेथील भविष्यकालीन मानवी वसाहत निर्मितीच्या पायाभरणी साठीचा हा शुभारंभ आहे अंतराळविश्वातील  हि नवी पाऊलवाट भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळ निवासासाठीही उपयुक्त ठरेल!"

No comments:

Post a Comment