नासाचे अंतराळवीर Kate Rubins आणि Andre Douglas San Francisco Volcanic Field North Flagstaff Arizona येथील वाळवंटातArtemis मोहिमेतील Tool Cart चाचणी दरम्यान -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 31 मे
नासाच्या आर्टेमिस -III मोहिमे अंतर्गत अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत चांद्रभूमीवर उतरून तिथल्या भूपृष्ठावरील,वातावरणातील आणि भूगर्भातील संशोधित माहिती आणि नमुने गोळा करणार आहेत सध्या ह्या मोहिमेची जय्यत तयारी सुरु आहे अंतराळवीरांना चंद्रभूमीवर फिरण्यासाठी नासा संस्थेने रोव्हर तयार करण्याची तीन कंपन्यांना परवानगी दिली होती ह्या अंतराळवीरांच्या आर्टीमस चांद्रमोहिमेसाठी नवीन स्पेससूटही तयार करण्यात आला आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीरांसाठी तयार करण्यात आलेला स्पेससूट,रोव्हर त्यातील सायंटिफिक उपकरणे आणि अत्याधुनिक यंत्रणा ह्यांच्या परिपूर्णतेची चाचणी एक आठवडाभर घेण्यात आली
नासाचे अंतराळवीर Kate Rubins आणि Andre Douglas ह्या दोघांनी एकत्रित ह्या चाचणीत सहभाग नोंदवला San Francisco येथील Arizona वाळवंटात हि चाचणी पार पडली ह्या चाचणी दरम्यान ह्या अंतराळवीरांनी आर्टीमस मोहिमेतील भविष्यकालीन अंतराळवीरा सारखाच स्पेससूट परिधान करून Lunar Roving Robot आणि त्यातील यंत्रणेच्या परीपूर्णतेची चाचणी घेतली ह्या वाळवंटी भागातून मार्गक्रमण करताना स्पेस सूट सिस्टीम आणि रोव्हर मधील सर्व सायंटिफिक प्रयोगासाठी वापरण्यात येणारी Operation System,हार्डवेअर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कार्यक्षमता चेक केली आणी मातीचे नमुनेही गोळा केले
अंतराळवीर Kate Rubins Arizona वाळवंटातील Moon Walk दरम्यान नमुने गोळा करताना -फोटो -नासा संस्था
Arizona वाळवंटाचा हा भाग चंद्रभूमीशी साधर्म्य असलेला आहे इथे भूकंप प्रवण क्षेत्र आणी craters आहेत त्यामुळे अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांच्या ट्रेनिंगसाठी देखील हा भाग वापरण्यात आला होता नासाच्या JPL संस्थेचे प्रमुख ,Flight Controllers ह्या मोहिमेतील.शास्त्रज्ञ,ईंजीनीअर्स आणी Field experts ह्यांच्या ऊपस्थितीत आणी मार्गदर्शनात अंतराळवीरांनी हि चाचणी पुर्ण केली
भविष्यकालिन आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षितेसाठी आणी यशस्वीतेसाठी ह्या Moon Walk आणी Technology testची आवश्यकता होती असे नासाच्या J.PL संस्थेच्या Field Test Director Barbara Janoiko म्हणतात भविष्य कालीन आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीरांच्या चंद्र भुमीवरील मार्गक्रमणात,संशोधनात काही अडथळे येऊ नयेत त्यांची मोहीम निर्विघ्न पणे पार पडावी म्हणून हि तयारी करण्यात आली आर्टिमस III मोहिमेत चार Simulated Moon Walk आणी सहा Advanced Technology runs चा समावेश होता
प्रत्यक्षात आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर जेव्हा चंद्रावर पोहोचतील तेथील भुमीवर ऊतरुन संशोधीत माहिती व नमुने गोळा करतील तेव्हा हि चाचणी ऊपयुक्त ठरेल नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील शास्त्रज्ञ आणी ईंजीनीअर्स त्यांना पृथ्वीवरून योग्य मार्गदर्शन करु शकतील हे अंतराळवीर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील संशोधनात्मक माहिती गोळा करतील तेथील आव्हानत्मक भौगोलिक परीस्थितीचा,वातावरणाचा आढावा घेतील संशोधित माहिती मिळवतील
ह्या चाचणी नंतर आता ह्या मोहिमेतील Flight Controller,शास्त्रज्ञ,ईंजीनीअर्स आणी Field experts एकत्रीत जमुन चर्चा करतील आणी ह्या मोहिमेतील यंत्रणेत काही त्रुटी असल्यास दुर करतील
No comments:
Post a Comment