नासाच्या North Carolina येथील Governors Mansion Ceremony मधील शुभारंभाच्या कार्यक्रमातील Loblolly Pine Artemis I Moon Tree -फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 5 मे
नासाच्या आर्टिमस मोहिमेतील चंद्रवृक्ष लागवड अभियाना अंतर्गत नागरिकांना त्यांच्या घरी किंवा संस्थेत रोप लागवड करण्याची सुवर्णसंधी नासा संस्थेने जाहीर केली होती त्याला इच्छुक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नासा संस्थेकडे आलेल्या शेकडो अर्जातून रोप लागवडीसाठी काही संस्थांची निवड निश्चित करण्यात आली हि रोप लागवड मोहीम 2024 -2025 मध्ये राबविण्यात येणार असून टप्प्या टप्प्याने ह्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे
नासा संस्थेने ह्या चंद्र वृक्षाच्या रोप लागवडीसाठी निवड निश्चित करताना संस्थेतील संबंधित व्यक्तींची आवश्यक पात्रता त्यांची रोप लागवडीची आवड,ती वाढवताना जोपासना करण्याची वृत्ती रोपांची काळजी घेण्याची क्षमता आणि भविष्यात ह्या वाढलेल्या चंद्र वृक्षापासून आर्टीमस जनरेशन मधील मुलांना मिळणारी शैक्षणिक संधी ह्या बाबींचा विचार केला गेला
नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात,"ह्या आर्टीमस वृक्ष लागवड अभियाना नंतर चंद्र वृक्षाच्या नव्या युगाचा शुभारंभ होईल कारण पृथ्वीवरील सर्व मानवाचा अंतराळावर हक्क आहे अवकाश आपल्या सर्वांचे आहे जेव्हा हि आर्टीमस जनरेशन रोपांची लागवड करतील त्यांची जोपासना करतील काळजी घेतील तेव्हा भविष्यकालीन अंतराळवीरांना आणि संशोधकांना रोप लागवडीसाठी सुपीक जमिनीचा शोध घेण्यासाठी प्रेरित करतील !"
मागच्या महिन्यात 24 एप्रिलला ह्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला आर्टीमस -II मोहिमेतील अंतराळवीर Christina Koch ह्यांनी त्यांच्या North Carolina राज्याला भेट दिली तेव्हा आर्टीमस मोहिमेच्या स्मरणार्थ तेथील Governor Mansion मधील Tree Dedication Ceremony समारंभात सहभागी होत त्यांनी पहिल्या चंद्रवृक्षाचे रोप लावून ह्या अभियानाचा शुभारंभ केला Christina Koch ह्यांच्या Alma Mater White Oak High School तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला
नासाच्या अपोलो -14 चांद्र मोहिमेत ह्या चंद्र वृक्षांच्या रोपांच्या बिया अंतराळवीर Stuart Roosa ह्यांनी चंद्रावर सोबत नेल्या होत्या त्यांनी अमेरिकेतील Forest Officer ला विनंती करून 500 रोपांच्या बिया त्यांच्या सोबत चंद्रावर नेण्यासाठी मागितल्या होत्या ह्या बियांवर अंतराळप्रवासा दरम्यान आणी चंद्रावरील वातावरणात काय बदल होतो त्यांची वाढ कशी होते ह्या बाबतीत त्यांना संशोधन करावयाचे होते ह्या रोपांच्या बियांनी देखील अंतराळयानातून त्यांच्या सोबत चंद्राच्या पृष्ठभागाभोवती भ्रमण केले होते ह्या मोहीमेतील अंतराळवीर चंद्रभुमीवर ऊतरुन तेथील मातीचे नमुने गोळा करून आणे पर्यंत त्यांनी यानातुन चंद्राभोवती फेऱ्या मारल्या होत्या ह्या बियांनी चंद्रावर 270,000 मैलाचा अंतराळ प्रवास केला पृथ्वीवर परतल्यानंतर नासा संस्थेत त्यांची लागवड करण्यात आली त्या नंतर 2022 मध्ये आर्टीमस -1 मोहिमेतील Orion अंतराळ यानातून त्यातील काही रोपे चंद्रावर पाठवण्यात आली होती त्या मध्ये मूळ चंद्रवृक्षातील Sycamores,Sweetgums Douglas Firs,Loblolly pins आणि Giant Sequoias ह्या जातीच्या रोपांसह इतर रोपांचा समावेश होता
ह्या मोहिमेतील Forest Service Chief Randy Moore म्हणतात "ह्या रोपांचा पृथ्वीपासून चंद्र आणि पुन्हा पृथ्वी पर्यंतचा हा प्रवास किती अविश्वसनीय आहे आता ह्या रोपांच्या प्रवासाचा हा अंतिम टप्पा आहे ह्या देशातील संस्थेत किंवा कॅम्पस मध्ये ह्या रोपांची वाढ होताना पाहायला आम्ही उत्सुक आहोत हि झाडे जेव्हा वाढतील तेव्हा ती शतकानुशतके मानवाला आनंद देतील,सावली देतील आणि शास्त्रज्ञाना शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतील !''
अमेरिकेतील 48 राज्यातील 50 संस्थांच्या अर्जाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून हि निवड करण्यात आली असून आता 2024-2025 ह्या वर्षात टप्प्या टप्प्याने ह्या चंद्रवृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात येणार असून अमेरिकेतील फॉरेस्ट डिपार्टमेंट मधील अधिकारी आणि नासा संस्थेतील ह्या अभियानातील शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनात ह्या रोपांची लागवड व जोपासना करण्यात येईल
No comments:
Post a Comment