14 मे ला सौर विस्फोट आणि सौर वादळा मुळे सूर्याच्या अंतरंगातून अंतराळात उत्सर्जित होणाऱ्या आगीच्या ज्वाळा -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -16 मे
सुर्याच्या अंतर्गत भागातून 13 मे व 14 मेला अत्यंत वेगाने शक्तीशाली आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्याची माहिती नासाच्या Solar Dynamics Observatory ने दिली आहे ह्या वेगाने बाहेर पडणाऱ्या ज्वाळांचे फोटो देखील Solar Dynamics Observatory ने टिपले आहेत ह्या फोटोत आगीच्या ज्वाळांचे लोट बाहेर फेकल्या गेल्या नंतर सूर्या पासून बाहेर पडलेल्या Ultra Violet rays मुळे हा भाग सोनेरी निळसर रंगाने अत्यंत प्रकाशमान झाला आहे हे आगीचे लोट अंतराळात फेकल्या गेल्या मुळे पृथ्वीला धोका होऊ शकतो असा ईशाराही नासा संस्थेच्या वेधशाळेने दिला होता त्या मुळे पृथ्वीवरील यंत्रणा सतर्क झाली आणि स्थानकातील अंतराळवीरांनी काही विपरीत घडू नये म्हणून आधीच खबरदारी घेतली होती सौर उपकरण,सौर प्रणाली काही वेळ बंद ठेवली होती
2024 च्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सौर वादळाला सुरवात झाली
सूर्याच्या बाहेरील करोनाच्या सक्रिय स्फोटक क्षेत्रातून ज्वालाग्नी भडकत होता त्यातून आगीचे लोट
विद्युत भारित सूक्ष्म कण बाहेर पडत होते 7-11 मे ह्या दिवसात स्फोटाची तीव्रता
वाढली सौरवादळे होऊन मोठया प्रमाणात आगीचे लोट बाहेर पडू लागले 13 व 14 मेला सौर वादळ आणखीनच तीव्र झाले आणी करोनाच्या सक्रिय स्फोटक क्षेत्रातील दोन भागातून 13 तारखेला संध्याकाळी 10.09 वाजता आणि 14 तारखेला 8.55 ला पुन्हा शक्तिशाली धगधगत्या आगीच्या ज्वाळांचे अनेक लोट बाहेर पडले त्या पैकी आठ ज्वाळा अत्यंत शक्तिशाली होत्या हे सौर वादळ आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या आगीच्या ज्वाळा ताशी तीन मिलियन मैल वेगाने पृथ्वीच्या दिशेने बाहेर पडत होत्या असे सौर वादळ 2003 मध्ये झाले होते त्या नंतर वीस वर्षांनी आता पाहायला मिळाले असे नासाचे शास्त्रज्ञ म्हणतात
हे सौरवादळ जेव्हा पृथ्वीवर पोहोचले तेव्हा विद्युत भारित किरणे,वायू,धूलिकण ह्यांनी तयार झालेले ढग आकाशात जमले त्या मुळे पृथ्वीवासीयांना आकाशात रंगीबेरंगी Auroraचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले दक्षिण अमेरिका,कॅलिफोर्निया आणि उत्तर भारतातील काही भागात ह्या Aurora चे दृश्य दिसले
10 मे ला South Western British Columbia येथे दिसलेले सौर वादळामुळे निर्माण झालेले नयनरम्य Aurora चे दृश्य -फोटो -नासा संस्था
सर्व जगाला प्रकाशमान करणारा सुर्य प्रत्यक्षात आगीचा पेटता गोळा आहे त्याच्या अंतर्गत भागात ज्वलनशील पदार्थ आणी वायूमुळे सतत आग घुमसत असते आणी त्यापासून तयार होणारे आगीचे लोट,ज्वाळा,विध्युत भारीत किरणे वायुकण प्रचंड वेगाने सुर्याच्या करोना ह्या भागात फेकल्या जातात त्यामुळे तेथील भागात तीव्र उष्णता आणि प्रकाश असतो ह्या भागातील चुंबकीय क्षेत्रात ज्वलनशील पदार्थ,वायू,विद्युतभारीत किरणे,विद्युतभारीत कण गोलाकार फिरत असतात तेथे सतत ऊष्ण सौर वारे वहात असतात,सौरवादळे होतात जेव्हा ह्या वादळाची तिव्रता वाढते तेव्हा शक्तीशाली स्फोट होतात आणि त्यामुळे निर्माण झालेले आगीचे लोट ह्या चुंबकीय क्षेत्रातुन बाहेर अंतराळात फेकल्या जातात आणी ह्या भडकत्या शक्तीशाली ज्वाळांमधून अपायकारक विनाशकारी सौर कीरणे बाहेर पडतात पृथ्वीवरील रेडिओ Communications ,Electric Power Grids ,Navigation Signals अंतराळ यान आणि अंतराळस्थानकात राहणाऱ्या अंतराळवीरांसाठी हे सौर वादळ धोकादायक ठरू शकते
No comments:
Post a Comment