नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore Boeing Star Liner अंतराळयानातून स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था -6 जुन
नासाचे अंतराळवीर Butch Wilmore आणि भारतीय वंशाची अंतराळवीर Sunita Williams बुधवारी नासाच्या Boeing Star liner अंतराळयानाच्या मानवी उड्डाण चाचणीसाठी अंतराळ स्थानकात गेले आहेत Boeing Starliner हे नवे व्यावसायिक अंतराळयान नासाच्या अंतराळवीरांना स्थानकात नेण्या,आणण्यासाठी आणि खाजगी अंतराळ वाहतुकीसाठी बनविण्यात आले आहे ह्या अंतराळयानाच्या पहिल्या दोन मानव विरहित अंतराळ उड्डाण चाचण्या यशस्वी झाल्यानंतर ह्या यानाच्या पहिल्या मानवी उड्डाण चाचणी अंतर्गत हे दोन्ही अंतराळवीर एक आठवड्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले आहेत
ह्या आधी Boeing Starliner यानाची उड्डाण चाचणी एकदा अंतराळयानातील लिकेज प्रॉब्लेम मुळे आणि दुसऱ्यांदा उड्डाणाच्या अंतिम क्षणी रॉकेट प्रज्वलित झाल्यानंतरही कॉम्पुटर प्रणालीत बिघाड झाल्याने उड्डाणास विलंब झाल्याचे लक्षात येताच रद्द करण्यात आली होती अखेर ह्या सर्व समस्यांचे निराकरण करून Boeing Starliner अंतराळयान स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले बुधवारी पाच जूनला नासाच्या Florida येथील Cape Canaveral Space Force Station मधील उड्डाण स्थळावरून 10.52a.m.ला ह्या अंतराळवीरांसह Boeing Star Liner अंतराळयान Atlas V Rocket च्या साहाय्याने यशस्वीपणे अंतराळात झेपावले आणि काही वेळातच अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होऊन अंतराळ स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले
नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात ,"Boeing Star liner यानाच्या मानवी उड्डाण चाचणीत ऐनवेळी आलेल्या समस्येमुळे ह्या मोहिमेला विलंब झाला तरीही निराश न होता नासाच्या ह्या दोन्ही बोल्ड अंतराळवीरांनी आलेल्या कठीण परिस्थितीवर धैर्याने मात केली आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवत हि मोहीम यशस्वी केली आता हे अंतराळवीर नवीन कोऱ्या अंतराळयानातून Star liner यानाच्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाण चाचणीसाठी स्थानकाच्या दिशेने सुरक्षित अंतराळ प्रवास करत आहेत हे पाहून आनंद होत आहे नवीन अंतराळ यानातून मानवी उड्डाण चाचणी जितकी रिस्की आहे तितकीच Exciting आहे आणि हि पहिली चाचणी घेण भविष्यकालीन अंतराळवीरांच्या अंतराळप्रवासासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे Boeing Star liner अंतराळयानातून भविष्यकालीन अंतराळवीरांच्या उड्डाणाच्या शुभारंभासाठी Go Butch !,Go Suni! !"
नासाचे अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore Boeing Star Liner अंतराळयानातून स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ होताना -फोटो -नासा टी वी
Boeing Commercial Crew Program मोहिमेचे Vice President Mark Nappi ह्यांनी देखील Boeing Star liner अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर आनंद व्यक्त केला Boeing Star liner अंतराळयान जेव्हा रॉकेट पासून वेगळे झाले आणि अंतराळात पुढच्या प्रवासाच्या दिशेने मार्गस्थ झाले तेव्हा यान योग्य दिशेने व्यवस्थित प्रवास करत असल्याची खात्री झाली ह्या दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुरक्षित होऊन ते सुखरूप स्थानकात पोहोचावेत आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर पोहोचावेत अशी आमची इच्छा असल्याने आम्ही त्याच्या सुरक्षित उड्डाणाला महत्व दिले
Boeing Star liner च्या पहिल्या दोन मानव विरहित चाचणीच्या यशानंतरची हि तिसरी मानवी उड्डाण चाचणी आहे हे दोन्हीही अंतराळवीर अंतराळ प्रवासादरम्यान अंतराळ यानाची उड्डाण क्षमता,यानातील अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणा त्यांची कार्यान्वित होण्याची क्षमता Transportation System,Environmental control system आणि पृथ्वीवरून स्थानकात जाऊन पुन्हा परत पृथ्वीवर सुखरूप परतण्याची क्षमता ह्या बाबीचे निरीक्षण नोंदवतील ह्या अंतराळप्रवासा दरम्यान Boeing आणि नासा संस्थेतील ह्या मोहिमेतील प्रमुख त्यांच्या लाईव्ह संपर्कात असतील आणि ह्या स्वयंचलित यंत्रणेवर लक्ष ठेवतील सर्व बाबींची व्यवस्थित पूर्तता झाल्यानंतरच Boeing Starliner च्या भविष्यकालीन अंतराळमोहिमेसाठीच्या वापरासाठी अंतिम मंजुरी देण्यात येईल
Boeing Star Liner अंतराळयान जेव्हा स्थानकाच्या Harmony Module जवळ पोहोचेल तेव्हा यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल आणि स्थानक आणि अंतराळयान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडेल ह्या अंतराळवीरांच्या 25 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर गुरुवारी सहा जूनला 12.15p.m.ला अंतराळयान स्थानकाजवळ पोहोचेल स्थानकात सध्या राहात असलेल्या नासाच्या अंतराळ मोहीम 71 चे अंतराळवीर त्यांचे स्थानकात स्वागत करतील हे अंतराळवीर एक आठवडा स्थानकात वास्तव्य करतील आणि तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागी होतील
No comments:
Post a Comment