Wednesday 22 May 2024

Blue Origin च्या NS-25 मोहीममेतील सहा प्रवाशांनी घेतला अंतराळ पर्यटनाचा अदभुत अनुभव

 Ed Dwight Blue Origin च्या New Shepard अंतराळ यानातून अंतराळ पर्यटन करून पृथ्वीवर परतल्यावर -फोटो -Blue Origin

Blue Origin- 20 मे

Blue Origin च्या NS-25 मोहिमेतील सहा अंतराळ प्रवाशांनी 19 मे ला अंतराळ पर्यटनाचा अदभूत आनंद घेतला हे प्रवासी Blue Origin च्या व्यावसायिक मोहिमे अंतर्गत अंतराळ प्रवासास गेले होते Blue Origin ची हि सातवी यशस्वी अंतराळ पर्यटन मोहीम होती

ह्या मोहिमेत Manson Angel,Sylvain Chiron, Kenneth L.Hess,Carol Schaller, Gopi Thotukura आणी रिटायर्ड Air force Captain Ed Dwight ह्यांचा समावेश होता 

भारतीय वंशाचे Gopi Thotukura मूळचे भारतीय आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आहेत ते  कुशल आणि अनुभवी Pilot आणि Aviator आहेत त्यांना Jet ,Bush,Aerobatic व्यावसायिक विमान उड्डाणाचा अनुभव आहे शिवाय Seaplanes ,Gliders आणि Hot Air Balloons उड्डाणाचाही अनुभव आहे त्यांनी Embry-Riddle Aeronautical University मधून पदवी घेतली असून रस्त्यावर गाडी चालविण्या आधीच त्यांनी आकाशात विमान उड्डाण केले होते 

 

             Blue Origin NS -25 मोहिमेतील अंतराळ पर्यटक -फोटो -Blue Origin

हे सर्व अंतराळप्रवासी Blue Originच्या  New Sheperd अंतराळयानातुन अंतराळ पर्यटनास गेले होते Blue Origin च्या West Texas  मधील ऊड्डाण स्थळावरुन रविवारी New Sheperd अंतराळयान 9.36 वाजता रॉकेटच्या सहाय्याने ह्या अंतराळ प्रवाशांसह अंतराळात झेपावले आणी काही वेळातच अंतराळात पोहोचले यानाने अत्यंत वेगाने अंतराळ आणी पृथ्वीची सिमारेषा भेदली आणी यान पृथ्वीच्या वर 62 मैल अंतरावर (100कि.मी.) पोहोचले 

अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटित पोहोचताच सर्वांनी आनंदाने जल्लोष केला आणी झीरो ग्रॅव्हिटितील वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा अदभूत आनंद घेतला त्यांच्या तोंडून Oh! My God ! असे उद्गार बाहेर पडले सर्वांनी एकमेकांना अंतराळयानाच्या खिडकीतून पृथ्वीचे अलौकिक सौंदर्य पहा असे सांगितले

ह्या वेळी अंतराळातून Blue Origin शी लाईव्ह संवाद साधताना Ed Dwight म्हणाले ,"मी साठ वर्षांनी अंतराळात पोहोचलो माझी ईच्छा पुर्ण झालीय ह्यावर माझा विश्वास बसत नाही !"

भारतीय वंशाचे Gopi Thotukura ह्यांनी देखील ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत," भारताचा झेंडा दाखवत ह्या Blue Origin च्या व्यावसायिक मोहिमेत अंतराळप्रवास करायला मिळाला म्हणून सन्माननीय वाटत आहे मला भारताचा अभिमान वाटतो असे सांगितले !"

हे सर्व प्रवासी काही मिनिटे झीरो ग्रॅव्हिटिचा अदभूत आनंद घेऊन पृथ्वीवर सुखरूप परतले पृथ्वीच्या कक्षेत शिरताच हे सर्वजण पॅराशुटच्या सहाय्याने खाली ऊतरले 

Ed Dwight पृथ्वीवर परतले तेव्हा त्यांना प्रवास कसा झाला असे विचारले तेव्हा ," हा माझ्या आयुष्यातील life changing अदभूत अनुभव होता मी 91 व्या वर्षी अंतराळप्रवास करून आलो मी आनंदी आहे माझी  Black Astronaut म्हणून निवड झाली होती मी आवश्यक ट्रेनिंगही पुर्ण केले होते पण ऐनवेळी वर्णभेदामुळे मला अंतराळ प्रवासाची परवानगी मिळाली नाही माझ्यात पात्रता असुनही मला जाता आले नव्हते म्हणून मी निराश झालो होतो पण अखेर Blue Origin मुळे माझी ईच्छा पुर्ण झाल्याचे सांगितले 

ह्या मोहिमेनंतर Ed Dwight ह्यांची 91 व्या वर्षी अंतराळ प्रवास करणारे सर्वात Oldest Astronaut म्हणून विक्रमी नोंद करण्यात आली असून Gopi Thotkura ह्यांची Blue Origin मधून अंतराळप्रवास करणारे पहिले भारतीय पर्यटक अंतराळवीर आणी व्यावसायिक अंतराळप्रवास करणारे दुसरे अंतराळवीर म्हणून नोंद झाली आहे ह्या आधी रॉकेश शर्मा पहिल्यांंदा अंतराळात गेले होते 

ह्या सर्व अंतराळ प्रवाशांना आता अंतराळवीर झाल्याचा NS -25 Mission Patch देण्यात आला आणि अंतराळवीर म्हणून मान्यता देण्यात आली 


No comments:

Post a Comment