Wednesday 15 May 2024

Blue Origin 19 मेला सहा नागरिकांना अंतराळ पर्यटन घडवणार

 

   Blue Origin च्या NS -25 अंतराळयानातून अंतराळ पर्यटन करणारे नागरिक -फोटो -Blue Origin

Blue Origin- 15 मे 

सामान्य हौशी नागरिकांना अंतराळ पर्यटन घडविण्यासाठी अमेरिकेने खाजगी कंपन्यांंना परवानगी दिल्या नंतर Blue Origin कंपनीने नागरिकांना  New Shepard अंतराळयानातुन सहा वेळा अंतराळ पर्यटन घडविले आता सातव्यांंदा Blue Origin सहा प्रवाशांना अंतराळ पर्यटन घडविणार आहे 

 

                    Blue Origin कंपनीने   NS -25 मोहिमेसाठी बनविलेला Mission Patch

19 मेला कंपनीच्या West Texas येथील Launch -1 ऊड्डाण स्थळावरुन NS-25 अंतराळयान NS Rocket च्या सहाय्याने ह्या सहा नागरिकांसह अंतराळात ऊड्डाण करेल Blue Origin च्या NS-25 अंतराळयानातुन अंतराळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये 

Mason Angel,Sylvain Chiron ,Kenneth L Hess,Carol Schaller,Gopi Thotakura,Former Airforce Captain Ed Dwight ह्यांचा समावेश आहे Ed Dwight ह्यांची अमेरिकेचे अध्यक्ष John F.Kennedy ह्यांनी 1961मध्ये Black अंतराळवीर म्हणून निवड केली पण वर्णभेदामुळे त्यांना अंतराळ प्रवासास परवानगी मिळाली नव्हती

हे सहा प्रवासी NS -25 अंतराळ यानातुन काही मिनिटे अंतराळ प्रवास करतील अंतराळयान पृथ्वी व अंतराळ ह्या मधील कक्षा भेदून पृथ्वीच्या वर62 मैल ( 100कि.मी.) अंतरावर पोहोचेल तेव्हा काही मिनिटे हे अंतराळ प्रवासी वजनरहित अवस्था अनुभवतील आणी यानात 360 अंशात सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत अनुभव घेतील आणी पुन्हा काही मिनिटात पृथ्वीवर सुखरूप परततील 

 Blue Origin च्या ह्या सातव्या मोहिमेसाठी  NS -25 Mission Patch बनविण्यात आला असून त्यावर ह्या अंतराळ प्रवाशांचे वैशिष्ट दर्शविणारी चिन्हे कोरली आहेत


No comments:

Post a Comment