अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore नासाच्या Florida येथील Kennedy Space Center मध्ये Flight Test साठी दाखल झाल्यानंतर
नासा संस्था - 29 एप्रिल
अमेरिकेची बंद पडलेली अमेरिकन भूमीतून स्वनिर्मित अंतराळ यान ऊड्डाण मोहीम पुन्हा सुरु झाल्यानंतर अमेरिकेने खाजगी संस्थांना अंतराळयान बनविण्यासाठी आणी व्यावसायिक अंतराळयान ऊड्डाणाची परवानगी दिली त्या नंतर Space X Crew Dragon व Cargo Ship अंतराळस्थानकात अंतराळवीरांची व सामानाची सुखरूप ने आण करीत आहेत आता Boeing Starliner अंतराळयान मानवी ऊड्डाणासाठी सज्ज झाले आहे येत्या 6 मेला ह्या अंतराळयानाची मानवी ऊड्डाण चाचणी होणार आहे
नासाची अंतराळवीर Sunita Williams आणी Butch Wilmore हे दोघे ह्या ऊड्डाण चाचणीत सहभागी होऊन स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत सध्या त्यांचे ऊड्डाणपुर्व ट्रेनिंग सुरू आहे या मोहीमेत Butch Wilmore कमांडरपद आणी Sunita Williams पायलटपद सांभाळणार आहेत
नासाच्या Florida Space Force Station मधील Cape Canaveral Space Launch Complex 41 येथील ऊड्डाण स्थळावरुन Boeing Starliner अंतराळयानातुन हे अंतराळवीर स्थानकात जाण्यासाठी ऊड्डाण करतील 6 मेला सोमवारी 10.34 p.m.ला Atlas V Rocket च्या सहाय्याने Boeing Starliner अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावेल आणि 8 मेला बुधवारी स्थानकात पोहोचेल
हे दोन्हीही अंतराळवीर स्थानकात एक आठवडा वास्तव्य करतील त्या नंतर ते पृथ्वीवर परततील सध्या हे अंतराळवीर उड्डाणस्थळी दाखल झाले असून उड्डाणपूर्व तयारीत व्यस्त आहेत ह्या अंतराळविरांची नव्या अंतराळयानातुन हि पहिलीच व्यावसायिक ऊड्डाण चाचणी असल्यामुळे आवश्यक ऊड्डाणपुर्व चाचण्या घेण्यात आल्या असून ह्या अंतराळवीरांनी 26 एप्रिलला अंतराळयानातील Software System चेकिंग,स्पेससूट चेकिंग व इतर आवश्यक गोष्टी चेक केल्या
Boeing Starliner अंतराळयान Spacious आहे त्यामध्ये चार अंतराळवीर आरामात बसून अंतराळ प्रवास करू शकतील अंतराळयानाच्या यशस्वी उड्डाण मोहिमेनंतर ह्या अंतराळयानाच्या व्यावसायिक अंतराळ उड्डाणावर शिक्कामोर्तब होईल आणि त्या नंतर अंतराळवीरांना स्थानकात नेण्याण्यासाठी व स्थानकात सामान नेण्याआणण्यासाठी कार्गोशिप साठी ह्या यानाचा नियमित वापर सुरु होईल
ह्या Boeing Starliner अंतराळयानाच्या आणि अंतराळवीरांच्या ह्या पहिल्या स्थानकाकडील उड्डाणाचे व स्थानकातील प्रवेशाचे लाईव्ह प्रसारण नासा टी वी .वरून करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment