नासाच्या अंतराळ मोहीम 71 चे रशियन अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub स्थानकाच्या रशियन सेगमेंट बाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -26 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 71चे अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी 25 एप्रिलला स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक रशियन सेगमेंट बाहेरील भागातील Radar System मधील कामासाठी करण्यात आला 25 एप्रिलला हे दोन्ही अंतराळवीर 10.55 a.m.ला स्पेसवॉक करण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 3.33 p.m.ला स्पेसवॉक संपवून स्थानकात परतले
चार तास छत्तीस मिनिटे चाललेल्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी रशियन सेगमेंट बाहेरील Nauka Module भागातील Synthetic Radar System वर पॅनल Install केले शिवाय स्थानकाच्या कामासाठी लागणारे Hardware आणि स्थानकातील लॅबमध्ये सुरु असलेल्या संशोधन आणि सायंटिफिक प्रयोगासाठी लागणारे सायंटिफिक उपकरण फिक्स केले शिवाय धुळीमुळे किंवा इतर कारणामुळे स्थानकाबाहेरील भाग खराब होतो तो भाग झिजतो,गंजतो हि झीज किती प्रमाणात झाली ह्याचे निरीक्षण नोंदविण्यासाठी प्रायोगिक साहित्य फिक्स केले
ह्या दोन्हीही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक साठी आधीच तयारी करून ठेवली होती त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज केले त्यातून लिकेज होत नाही ना ? ह्याचे चेकिंग केले आणि स्पेसवॉक साठी लागणारे Hardware ,बॅटरी व इतर साहित्य चेक केले होते ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Oleg ह्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता आणि अंतराळवीर Nikolai ह्यांनी निळ्या रंगांच्या रेषा असलेला Orlan स्पेससूट परिधान केला होता
अंतराळवीर Oleg Kononenko ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतील हा सातवा स्पेसवॉक होता आणि अंतराळवीर Nikolai Chub ह्यांचा हा दुसरा स्पेसवॉक होता अंतराळ स्थानकाच्या कामासाठी अंतराळवीरांनी केलेला आजपर्यंतचा हा 270 वा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment