खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळचे सूर्याला प्राप्त झालेले नैसर्गिक Diamond Ring चे विलोभनीय दृश्य -फोटो नासा संस्था
नासा संस्था -9 एप्रिल
ह्या वर्षातले पहिले खग्रास सूर्यग्रहण आठ एप्रिलला घडले सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आल्याने सूर्याला चंद्राने झाकोळले आणि काही मिनिट पृथ्वीवर अंधार पसरला ह्या चार मिनिटे बारा सेकांदाच्या काळात सूर्याने नैसर्गिक चकाकत्या डायमंड रिंगचा आकार घेतला होता चंद्र सूर्यापेक्षा आकाराने लहान असल्यामुळे आणि सूर्या भोवतीचा चकाकता करोना झाकल्या न गेल्यामुळे सूर्याला चकाकत्या अंगठीचे स्वरूप प्राप्त होते सूर्य म्हणजे प्रचंड पेटता धगधगता आगीचा गोळा आहे सूर्याच्या अंतर्गत भागात सतत स्फोट होत असतात आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या आगीच्या पेटत्या ज्वाळांचे लोट आणी प्रखर किरणे सूर्याभोवती करोनाच्या स्वरूपात जमा होतात सूर्य आणि करोना ह्या मध्ये असलेल्या मॅग्नेटिक फिल्ड मुळे तो भाग सूर्यापासून वेगळा दिसतो आणि हि नैसर्गिक पर्वणी पाहण्याची सुवर्ण संधी फक्त खग्रास ग्रहण काळातच मिळते
खग्रास सूर्यग्रहणादरम्यान दिसणारे सूर्याभोवतीच्या तेजोमय प्रभावळीचे मनमोहक दृश्य -फोटो -नासा संस्था
आठ एप्रिलला ह्या वर्षातले पहिले खग्रास सूर्यग्रहण Dallas , North America ,Atlantic सागराजवळील Newfoundland आणि Canada येथे दिसले अमेरिकेतील मध्य भागात आणि युरोप मध्ये खंडग्रास स्वरूपात दिसले ह्या नंतरचे खग्रास सूर्यग्रहण आता 2045 साली दिसणार असल्यामुळे हि नैसर्गिक पर्वणी पाहण्यासाठी अमेरिकेतील नागरिक हजारोच्या संख्येने खुल्या मैदानात एकत्र जमले होते नासाच्या संस्थेतील कर्मचारी आणि शास्त्रज्ञ हे ग्रहण खग्रास रूपात जिथेजिथे दिसणार होते त्या भागात पोहोचले होतेपरदेशातील शास्त्रज्ञ खगोलप्रेमी देखील हे ग्रहण पाहण्यासाठी अमेरिकेत पोहोचले होते
खग्रास सूर्यग्रहणा दरम्यान सूर्याची वेगवेगळ्या आकारातील दृश्ये -फोटो -नासा संस्था
अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी देखील स्थानकातून ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला ग्रहण होण्याआधीपासूनच नासा संस्थेतर्फे नागरिकांना ग्रहण पाहण्याचे आवाहन करण्यात येत होते त्या साठी कोणती काळजी घ्यायची,ग्रहण कसे पाहायचे ह्याची माहिती देण्यात येत होती नागरिकांना ग्रहण पाहण्यासाठी खास तयार केलेल्या चष्म्याचे मोफत वाटप करण्यात आले होते
खग्रास सूर्य ग्रहण पाहण्यासाठी अमेरिकन आणि परदेशी नागरिकांनी केलेली गर्दी -फोटो -नासा संस्था
अंतराळवीरांनी देखील ग्रहण पाहण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली अनेक अंतराळवीरांनी वेगवेगळ्या भागातून ग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी साधली अंतराळवीर Jeremy Hansen ह्यांनी Niagara Falls येथून ग्रहण पाहिले त्यांच्या प्रमाणेच हजारो नागरिक तेथे ग्रहण पाहण्यासाठी एकत्र जमले होते
अंतराळ स्थानकातील अंतराळवीर ग्रहणकाळात त्यांच्या संशोधनाच्या व इतर कामात व्यस्त होते तरीही अंतराळवीर Matthew Dominick आणि Jeanette Epps ह्या दोघांनी स्थानकाच्या Cupula मधून ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला आणि ग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ काढला ह्या काळात स्थानक कॅनडाच्या South Eastern भागातून भ्रमण करत होते तेव्हा ह्या अंतराळवीरांनी चंद्राची पृथ्वीच्या वरील भागात पडलेली सावली कॅमेराबद्ध केली त्याचा लाईव्ह व्हिडिओ काढला हा भाग तेव्हा छत्रीसारखा दिसत होता हि सावली New York मधून New Foundland कडे प्रवास करीत होती आणि त्या वेळी सूर्याचा 90 टक्के भाग झाकला गेला होता पृथ्वीवरील नागरिक आकाशातील सुर्यग्रहण पाहु शकतात पण पृथ्वीवरुन सुर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर पडलेली सावली फक्त अंतराळातूनच पहाता येऊ शकते अंतराळवीरांमुळे पृथ्वीवासीयांना हि सावली लाईव्ह पाहायला मिळाली
अंतराळवीरांनी सूर्यग्रहणादरम्यान पृथ्वीवर पडलेल्या सावलीचे कॅमेराबद्ध केलेले दृश्य -फोटो -नासा संस्था
सूर्य पूर्णपणे झाकल्यागेल्यानंतर पृथ्वीवर चार मिनिटे बारा सेकंद अंधार पसरला भर दिवसा अंधार पडल्यामुळे पक्षांचा किलबिलाट ऐकू आला ग्रहण पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांनी आनंदाने जल्लोष केला काहींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आम्ही लकी आहोत आम्हाला हे ग्रहण पाहायला मिळाले अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली
नासा संस्थेने ह्या ग्रहणाच्या वेळी काही सायंटिफिक प्रयोग केले अंतराळात रॉकेट सोडून पृथ्वीच्या वरील भागातील वातावरणीय बदलांचे निरीक्षण नोंदविण्यात आले ह्या काळात पशुपक्षांच्या वागणुकीत होणारे बदल अभ्यासण्यात आले
No comments:
Post a Comment