नासाचे अंतराळवीर Loral O'Hara,रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि बेलारूस Spaceflight Participant Marina पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -7 एप्रिल
नासाच्या अंतराळमोहीम 70 चे अंतराळवीर Loral O' Hara रशियन अंतराळवीर Oleg Novitskiy आणि बेलारुसची Spaceflight participant Marina Vasilevskaya सहा एप्रिलला पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत नासाच्या अंतराळवीर Loral O'Hara ह्या 15 सप्टेंबर 2023मध्ये अंतराळवीर Oleg Kononenko आणि Nikolai Chub सोबत सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेल्या होत्या अंतराळवीर Oleg आणि अंतराळवीर Nikolai एक वर्ष स्थानकात राहणार आहेत
Soyuz M.S.-24 अंतराळयान पृथ्वीवर पोहोचल्यानंतर पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरताना -फोटो -नासा संस्था
हे तीनही अंतराळवीर 5 एप्रिलला 11.54p.m.ला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 6 एप्रिलला 3.17a.m.(12.17p.m.स्थानिक वेळ )ला पृथ्वीवर पोहोचले Soyuz M.S.-24 अंतराळयान ह्या तिघांसह पृथ्वीच्या कक्षेत शिरताच अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कझाकस्थानातील Dzhezkazgan येथील वाळवंटात सुरक्षितपणे खाली उतरले तेव्हा नासाची Recovery Team तेथे पोहोचली त्यानंतर टीममधील नासाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढले आणि त्यांना खुर्चीवर बसविले टीममधील डॉक्टरांनी त्यांचे प्राथमिक चेकअप केले
अंतराळवीर Loral O'Hara पृथ्वीवर पोहोचल्यानंतर अंगठा दाखवून आनंद व्यक्त करताना -फोटो -नासा संस्था
अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचताच त्यांनी पृथ्वीवरील सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेत पहिला श्वास घेतला अंतराळवीर Loral O'Hara ह्यांनी तेथे हजर असलेल्या अंतराळवीरांना अंगठा दाखवत हसून प्रतिसाद दिला आणि त्यांनी Loral ह्यांना स्थानकात सोबत नेण्यासाठी दिलेली डॉल देखील परत आल्याचे दाखविले बेलारूसच्या Marina ह्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली " पृथ्वीवर परतल्या नंतरचा हा क्षण खूप मोलाचा आहे कारण पृथ्वीवरील हे वातावरण स्पेशल आहे ह्याची जाणीव अंतराळ स्थानकात गेल्यावर होते पृथ्वीवरील नागरिक लकी आहेत म्हणूनच आपण त्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे !" अंतराळवीर Oleg ह्यांनी सोयूझ यानावर स्वाक्षरी केली त्यानंतर ह्या अंतराळवीरांना पुढील चेकअपसाठी कझाकस्थानातील Recovery Staging City मध्ये नेण्यात आले ह्या अंतराळवीरांच्या अंतिम चेकअप नंतर Loral O'Hara ह्यांना नासाच्या विमानाने Huston येथील Johnson Space सेंटर मध्ये नेण्यात येईल आणि दोन्ही अंतराळवीरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येईल
नासाच्या अंतराळवीर Loral O'Hara पहिल्यांदाच सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेल्या होत्या त्यांच्या ह्या पहिल्या अंतराळमोहिमेत त्यांनी स्थानकात 204 दिवस वास्तव्य केले आणि त्या दरम्यान त्यांनी मानवी Heart health ,Cancer Treatments आणि Space Manufacturing Techniques ह्या विषयात सखोल संशोधन केले अंतराळवीर Oleg Novitskiy ह्यांची हि चवथी अंतराळवारी होती त्यांच्या चार वेळच्या अंतराळ मोहिमेत त्यांनी 545 दिवस स्थानकात वास्तव्य केले आणि तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला ह्या अंतराळवीरांनी स्थानकात येणाऱ्या अंतराळवीरांचे,अंतराळयानाचे आणि कार्गोशिपचे स्थानकात स्वागत केले बेलारुसच्या Spaceflight participant Marina मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेल्या होत्या त्यांनी स्थानकात 14 दिवस वास्तव्य केले
No comments:
Post a Comment