नासाच्या ज्यूनो अंतराळयानातील Juno Cam Imager ने घेतलेल्या क्लोजअप वरून शास्त्रज्ञांनी Animation द्वारे तयार केलेला जोव्हियन चंद्रावरील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या Loki Patera तळ्याचा फोटो -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-19 एप्रिल
नासाच्या जुनो मोहीमेतील ज्युनो अंतराळयान गुरु ग्रहाविषयी माहिती मिळवण्यासाठी 5 ऑगस्ट 2011 मध्ये पृथ्वीवरुन गुरुच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी पाच वर्षांनी 5जुलै 2016 मध्ये गुरू ग्रहावर पोहोचले तेव्हापासून ज्युनो यान गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत आहे गुरु ग्रहाभोवती भ्रमण करत असताना तेथील वातावरणातील व गुरू ग्रहाविषयी मिळालेली संशोधीत माहिती व फोटो पृथ्वीवर पाठवत आहे ज्युनो अंतराळयानाने भ्रमणा दरम्यान आजवर गुरु ग्रह व गुरुचे अनेक चंद्र ह्या विषयी अत्यंत महत्त्वपुर्ण संशोधीत माहिती पृथ्वीवर पाठविली आहे गुरु ग्रहाला सर्वाधिक म्हणजे 95 चंद्र आहेत त्यातील फक्त 4 मोठे चंद्र आहेत असा शोध गॅलिलिओ ह्यांनी ह्या आधीच लावला होता आता गुरुचा चंद्र Jovian विषयी नवी माहिती व फोटो ज्युनो यानाने पृथ्वीवर पाठविले आहेत
नासाच्या ज्युनो अंतराळ मोहिमेतील प्रमुख शास्त्रज्ञ Scott Bolton ह्यांनी हि नवी संशोधीत माहिती प्रसारित केली आहे ज्युनो यानाने गुरु ग्रहाच्या जोव्हियन चंद्राभोवती मारलेल्या नव्या फेऱ्या दरम्यान तेथील ज्वालामुखीनी भरलेल्या क्षेत्रातील नवीन माहिती मिळवली आहे ज्युनो यानाला भ्रमणादरम्यान तेथील ज्वालामुखीच्या क्षेत्रात झालेल्या ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर बाहेर पडलेला लाव्हा रस थंड होताना तेथे एक तळे व डोंगर निर्माण झालेले आधळले ज्युनो अंतराळ यानाने यानातील अत्याधुनिक ऊपकरण व कॅमेऱ्याच्या सहाय्याने गोळा केलेली हि संशोधीत नवी माहिती व त्याचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत
ज्यूनो अंतराळ यानाने गुरु ग्रहाभोवती मारलेल्या 60 व्या फेरी दरम्यान 9 एप्रिलला घेतलेला गुरु ग्रहाच्या जोव्हियन चंद्राचा फोटो -फोटो -नासा संस्था
गुरुच्या जोव्हियन चंद्रावरील हा भाग ज्वालामुखीनी भरलेला आहे डिसेंबर 2023 आणी फेब्रुवारी 2024 मध्ये चंद्राच्या Northern latitude च्या जवळुन 1,500k.m.(930 मैल) अंतरावरुन फेऱ्या मारताना ज्युनो यानाला हा भाग आढळला ह्या विषयी माहिती देताना ह्या मोहिमेचे प्रमुख शास्त्रज्ञ Boltonम्हणतात," जोव्हियन चंद्रावरील ह्या भागात भरपूर ज्वालामुखी आहेत पण मोहिमेतील शास्त्रज्ञांनी त्यातील काही भागाचा वेध घेतला ज्युनो यानातील अत्याधुनिक कॅमेऱ्यातील ऊपकरणाद्वारे जवळुन घेतलेल्या क्लोजअप मुळे हि माहिती मिळाली जोव्हियन चंद्राच्या ह्या भागातील ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर बाहेर पडलेल्या लाव्हारसापासुन तयार झालेल्या 200 मीटर लांबीच्या (127मैल) Loki Patera नावाच्या तळ्याचा शोध आम्हाला लागला हे तळे लाव्हारस थंड होताना तयार झाले ह्या तळ्याच्या आतील भुगर्भात तप्त Magma असण्याची शक्यता आहे पण त्याचा वरील पृष्ठभाग काचेसारखा गुळगुळीत,चकचकीत आणी पारदर्शक आहे पृथ्वीवरील ज्वालामुखीच्या ऊद्रेकानंतर तयार होणाऱ्या ऑब्सिडियन काचेसारखाच हा भाग दिसत आहे बाजूला डोंगर देखील दिसत आहे !"
जुनोच्या रेडीओमिटर (MWR) ऊपकरणाद्वारे संकलीत केलेल्या संशोधीत माहितीवरून जोव्हियन मध्ये गुरूच्या ईतर चंद्राच्या तुलनेत,तुलनेने गुळगुळीत पृष्ठभाग व मध्य अक्षांशा पेक्षाही थंड असलेले ध्रुव देखील आहेत
जुनो यानाने तेथील वातावरणातील चक्रीवादळे आणी पाण्याच्या अस्तित्वाच्या शोधाविषयीही संशोधीत माहिती मिळवली आहे गुरु ग्रहाच्या युरोपा ह्या चंद्रावर पाण्याचे फवारे उडत असल्याचे आढळल्यामुळे तेथे सखोल संशोधन करण्यात आले तेव्हा तेथील भुप्रुष्ठावर गोठलेल्या थंड बर्फ़ाचे तळे असल्याची संशोधित माहितीही मिळाली आहे उन्हाळ्यात अती उष्णतेने त्यातील बर्फ़ाचे थेंब वितळून वर उडत असल्याची माहितीही ह्या आधी शास्त्रज्ञांनी प्रसारित केली होती
No comments:
Post a Comment