Saturday 9 July 2022

नासाच्या Johnson Space center चा साठावा वर्धापनदिन आणि अंतराळवीरांचा स्वातंत्रदिनातील सहभाग

 houston_welcomes_msc_jul_4_1962

 Mercury अंतराळ मोहिमेतील सात अंतराळवीर आणि त्यांचे कुटुंबीय सत्कार समारंभा दरम्यान -फोटो नासा संस्था  

नासा संस्था - 

नासाच्या Huston येथील Johnson Space Center ला यंदा साठ वर्षे पूर्ण झाली आहेत 1962 च्या जुलै मध्ये ह्या संस्थेची स्थापना झाली सुरवातीला ह्या संस्थेचे नाव Manned Spacecraft Center (MSC) असे होते नंतर ह्या संस्थेला सध्याचे नाव देण्यात आले चार जुलै 1962 मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदा ह्या संस्थेत Mercury अंतराळ मोहिमेतील सात अंतराळवीरांचा सत्कार करण्यात आला होता 

अमेरिकेच्या अध्यक्षांनी Mercury मोहिमेतील सहभागी सात अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबियांना ह्या सोहळ्यासाठी खास आमंत्रित केले होते त्या वेळी ह्या अंतराळवीरांची जाहीर मिरवणूक काढण्यात आली होती तेव्हा हा सोहळा पाहण्यासाठी आणि ह्या अंतराळवीरांचे कौतुक करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर जमले होते त्यांच्या ह्या स्वागत समारंभाला Huston चे मेयर Lewis W Cutrer आणि MSC चे Director Robert R Gilruth उपस्थित होते 

1961साली अमेरिकेचे अध्यक्ष John F. Kennedy ह्यांनी इथेच सर्वप्रथम चांद्रमोहिमेची घोषणा केली अमेरिकेचे अध्यक्ष Ronald W Reagan ह्यांनी अमेरिकेच्या अंतराळमोहिमांसाठी संस्था विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले त्यानंतर पाच महिन्यांनी नासाच्या अंतराळ मोहिमांसाठी Huston मधील ह्या संस्थेची निवड करण्यात आली Huston आणि Space Center ह्यांच्यातले नाते अतूट आहे गेल्या साठ वर्षात Johnson Space Center मधील शास्त्रज्ञांनी अनेक यशस्वी अंतराळ मोहीमाचे उत्कृष्ठ नियोजन केले आणि त्या मोहिमेतील अंतराळ यानाचे  उड्डाण ,लँडिंग व ईतर तांत्रिक बाबी पार पाडल्या ह्या मोहिमेतील अंतराळवीरांची निवड करून त्यांना योग्य ट्रेनिंग देऊन ह्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत Huston हेे माानवी अंंतराळ ऊड्डाणाचे मुख्य केंद्र आहे Huston मधील अनेक अंतराळमोहिमा यशस्वी झाल्यामुळे  Huston  City ला Space City USA ह्या नावाने ओळखले जाऊ लागले 

 sts_50_inflt_crew_photo_w_flag_jul_1992

  1992 मध्ये STS-50 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात 4 जुलै ला स्वातंत्र्यदिन साजरा करताना -फोटो नासा संस्था

 1962 मध्ये चार जुलैला अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी अंतराळवीरांचा सत्कार पार पडल्यानंतर अंतराळवीरांचा पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनात सहभाग नोंदविल्या गेला 1982 पर्यंत अंतराळवीर अंतराळात स्वातंत्र्यदिन साजरा करत नव्हते  1992 मध्ये STS-50 अंतराळ मोहिमेतील अंतराळ वीरांनी स्थानकात 4 जुलै साजरा केला त्यानंतर 1996,97 मध्ये अंतराळवीरांनी स्थानकात अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन साजरा केला 

 mir_21_lucid_on_mir_jul_4_1996

 अंतराळवीर Shannon W Lucid रशियन अंतराळस्थानाक Mir मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना -फोटो नासा संस्था

जसजशा अंतराळ मोहिमा वाढल्या अंतराळस्थानक स्थापन झाले अंतराळवीर अंतराळ स्थानकात जाऊ येऊ लागले तिथे दीर्घकाळ वास्तव्य करून संशोधन करू लागले तसतसे त्या दरम्यान आलेला स्वातंत्र्यदिनही स्थानकातच साजरा करू लागले  सुरवातीला दिवसरात्रीचा अत्यल्प काळ आणि पृथ्वीच्या तुलनेत मिळालेला कमी वेळ ह्या मुळे ह्यात सातत्य नव्हते पण गेल्या वीस वर्षात अंतराळवीर नियमितपणे स्थानकात स्वातंत्र्यदिन साजरा करतात प्रत्येकाची स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची पद्धत वेगळी असते,युनिक असते कोणी अमेरिकेच्या झेंड्याशी साधर्म्य साधणारा ड्रेस घालून तर कोणी शूज घालून आपले देशप्रेम व्यक्त करतात 1996 साली अंतराळवीर Shannon W Lucid हिने रशियन अंतराळस्थानक Mir मध्ये अमेरिकेच्या झेंड्यासारखे शूज परिधान करून स्वातंत्र्यदिन साजरा केला होता

No comments:

Post a Comment