Space X -Crew -4 चे अंतराळवीर अंतराळ प्रवासाच्या दिशेने प्रवासा दरम्यान-फोटो नासा संस्था
नासा संस्था -27 एप्रिल
Space-X Crew -4 अंतराळ मोहिमे अंतर्गत बुधवारी 27 एप्रिलला अंतराळवीर Kjell Lindgren अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Jessica Watkinsआणि युरोपियन अंतराळवीर Samantha Cristoforetti हे चौघे स्थानकात सहा महिने रहाण्यासाठी गेले आहेत
बुधवारी 3.52 मिनिटाला ह्या चारही अंतराळवीरांना घेऊन Space X Crew Dragon नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून स्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी रात्री 8.15 मिनिटाला स्थानका जवळ पोहोचले एक तासांनी 9.15 मिनिटाला Crew Dragon मधील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि Crew Dragon ह्यांच्यातील Hatching प्रक्रिया पार पडली त्या नंतर अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर काही वेळाने अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला त्यावेळी सर्वांनी एकत्रित नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधला आणि सुरक्षित पोहोचल्याचे सांगितले
अंतराळात पोहोचल्यानंतर स्थानकातील अंतराळवीरांसोबत Kjell Lindgren,अंतराळवीर Bob Hines अंतराळवीर Jessica Watkinsआणि अंतराळवीर Samantha Cristoforetti एकत्रित -फोटो नासा संस्था
अंतराळवीर Kjell Lindgren आणि अंतराळवीर Samantha ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे 2009 मध्ये Kjell Lindgren अंतराळवीर झाले आणि 2015 मध्ये नासाच्या अंतराळ मोहीम 44-45अंतर्गत पहिल्यांदा स्थानकात राहायला गेले त्या वेळी त्यांनी स्थानकात 141 दिवस वास्तव्य केले होते अंतराळवीर Samantha अंतराळमोहीम 42-43 अंतर्गत 2015 मध्ये स्थानकात राहायला गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी स्थानकात पाच महिने वास्तव्य केले होते अंतराळवीर Jessica Watkins आणि अंतराळवीर Bob मात्र पहिल्यांदाच स्थानकात राहायला गेले आहेत
ह्या अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासदरम्यान काही अडचण येऊ नये म्हणून Space X Crew ड्रॅगनच्या स्वयंचलित यंत्रणेवर नासाच्या केनेडी स्पेस सेंटर आणि Johnson स्पेस सेंटर मधून नियंत्रण ठेवण्यात आले होते ह्या अंतराळ प्रवासा दरम्यान अंतराळवीरांनी संस्थेशी लाईव्ह संपर्क साधला त्या वेळी त्यांना संस्था प्रमुखांनी तुमचा प्रवास कसा सुरु आहे तुमचे अनुभव शेअर करा असे सांगितले तेव्हा सर्वांनी प्रवास व्यवस्थित सुरू आहेे असे सांगत त्यांचा अनुभव शेअर केला
अंतराळवीर Kjell Lindgren ह्यांनी Dragon ला अंतराळवीरांनी Freedom असे नाव दिल्याचे सांगत ह्या वेळेसचा अनुभव छान आहे प्रवास आरामदायी आहे ड्राइव्हिंग स्मूथ आहे असे सांगितले शिवाय Dragon मधून प्रवास करताना launching प्रक्रिया प्रत्यक्ष पाहायला मिळाल्याचेही सांगितले
अंतराळवीर Jessica ह्यांनी माझा हा पहिलाच अंतराळप्रवास असल्याने मी यानाच्या खिडकीतुन बाहेर पाहायचा अनुभव घेतेय पृथ्वीवरच्या रात्रीदिवसाचा अंधार उजेडाचे चक्र आणि पृथ्वीवरच्या सजीव सृष्ठीचे विलोभनीय दृश्य पााहुुन मी आनंदीत झाले आहे विशेषतः मी Geologist असल्यामुळे पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या खडकांचे निरीक्षण व अभ्यास करण्याची मला आवड आहे आणी आत्ता मला अंतराळातून ते पहाण्याची अमुल्य संधी मिळालीय पृथ्वीच सौन्दर्य अलौकिक आहे! तुम्हीही पहा!अस म्हणून तिने कॅमेऱ्यातून पृथ्वीदर्शन घडवल प्रवासा दरम्यान आम्ही जेवण,नास्ता आणि झोपही घेतली आमचा प्रवास छान सुरु आहे अस सांगितल
अंतराळवीर Bob ह्यांनी प्रवासाचा अनुभव चांगला असल्याचे सांगत त्यांनी देखील क्षितिजावरच्या सुंदर रंगीबिरंगी प्रकाशपटलाच दर्शन घडवल शिवाय त्यांनी आणी अंतराळवीर Samantha ह्यांनी सोबत आणलेले Ziro -G इंडिकेटर Soft Toy दाखवले त्यांनी सांगितले मला माझ्या मुलीने Zippy Turtle दिलय ते तीच फेव्हरीट आहे आणि आमच्या ट्रेनिंग पासून ते आमच्या जवळ आहे सर्व ट्रेनिंग इव्हेंटमध्ये आणि फोटोत सुद्धा ते आमच्या सोबत होत विशेष म्हणजे 2017 मध्ये आमच्या अंतराळवीरांच्या ट्रेनिंग मध्ये आमच्या ग्रुपच नाव देखील Turtle होत आता माझी मुलगी ज्युलिया आणि Samantha ची मोठी मुलगी Kelsey ह्या दोघी बेस्ट फ्रेंड झाल्या आहेत
अंतराळवीर Samantha म्हणाल्या माझी मोठी मुलगी Kelsey हिने मला मंकी दिलाय त्याच नाव Etta आहे ती इटालियन आहे इटालियन भाषेत लहान मंकीला Etta म्हणतात तिने मला सोबत नेण्यासाठी Etta ची निवड केली तेव्हा मीही Exited झाले कारण तोही माझ्यासोबत अंतराळप्रवास करणार होता माझ्या ह्या दुसऱ्या अंतराळ प्रवासाचा अनुभव अमेझिंग आहे रात्री प्रवासा दरम्यान झोपायच्या वेळेस अचानक माझी sleeping bag पुढे खिडकीच्या दिशेने ओढल्या गेली मी बाहेर पाहिल तेव्हा अंतराळयानाच्या पुढे प्रवास करतानाच्या ज्वलन प्रक्रियेमुळे बाहेर पडणाऱ्या ज्वाळांच्या प्रकाशाचा पट्टा मला दिसला तो धगधगता तेजस्वी प्रकाशझोत पाहून मला सिनेमातील भुताची आठवण झाली जो सुरवातीला प्रचंड तेजाने भव्य रूप घेतो आणि माणसा मागे धावतो आणि नंतर वेगवेगळे आकार घेत सावलीचे रूप घेतो आणि लुप्त होतो त्यावेळेसचा आवाज देखील सिनेमातील भुताच्या आवाजासारखा होता हे दृश्य खरच अमेझिंग होत
ह्या वेळेस संस्थेतील प्रमुखांनी तुम्ही तुम्हाला दिलेली ट्रीट आणि जेवण केल का हे विचारल तेव्हा Samantha म्हणाल्या हो !आम्ही जेवण घेतल कुणीतरी Chocolate coated Candy ची बॅग काढली आणि सर्वांना दिली पण मी त्यावेळी दुसर काहीतरी खात असल्यान माझी Candy मात्र मला मिळाली नाही पण No Problem ! नंतर ते मला देणार आहेत सारेCrew mate जॉली आहेत खूप चांगले आहेत त्यामुळे आमचा प्रवास कंटाळवाणा झाला नाही
आता हे चारही अंतराळवीर स्थानकात सहा महिने राहून अंतराळ मोहीम 67च्या अंतराळवीरांसोबत स्थानकात सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील सध्या स्थानकातील अंतराळवीरांची संख्या अकरा झाली असून लवकरच Crew-3 चे अंतराळवीर पृथ्वीवर परततील
No comments:
Post a Comment