नासाच्या Lunabotics स्पर्धेतील विजेती लुसिया ग्रिसांती रोबोसह आणि श्रीया सावंत -फोटो नासा संस्था
नासा संस्था- 12 एप्रिल
अमेरिकेची बंद पडलेली चांद्रमोहिम पुन्हा सुरु झाल्यानंतर नासाच्या आर्टिमस मोहीमेची अंतीम तयारी जोरात सुरु आहे आर्टिमस मोहिमेत अमेरिकन नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी नासा संस्थेतर्फे वेगवेगळे ऊपक्रम राबविले जात आहेत आणी अमेरिकन नागरिक देखील त्यात ऊत्साहाने सहभागी होत आहेत ह्याच आर्टिमस मोहिमेत अमेरिकन विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी नासा संस्थेने हायस्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव स्पर्धा जाहीर केली होती
केजी ते हायस्कूलच्या विद्यार्थ्यासाठी जाहीर झालेल्या Lunabotics Junior Contest ह्या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना Artemis चांद्रमोहिमेसाठी एका रोबोचे डिझाईन करण्याचे Challenge देण्यात आले होते हा रोबो चंद्रावरील खडबडीत कमी गुरूत्वाकर्षणीय वातावरणात तेथील भुपृष्ठावर फिरेल व तेथील भुभाग खणून चंद्रावरील माती,खडकाचा चुरा,धूळ ह्याचे मिश्रण (रेगोलीथ) गोळा करून तो नमुना कंटेनरमध्ये भरेल आणी विषेश म्हणजे हे डिझाईन युनिक असेल
ह्या स्पर्धेला अमेरिकेतील 2,300 विद्यार्थ्यांनी ऊत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता नुकताच ह्या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून ह्या स्पर्धेत श्रिया सांवत आणी लुसीया ग्रिसांती ह्या दोन विद्यार्थीनी विजेता ठरल्या ह्या दोघींनी तयार केलेल्या रोबो डिझाईन मध्ये स्पर्धेतील सर्व आवश्यक गोष्टींंची पुर्तता करण्यात आली आहे
Georgia Cumming येथील श्रिया सावंत ह्या पंधरा वर्षीय विद्यार्थीनीने 6वी ते 12वी ह्या गटातील पहिले बक्षीस मिळवले असुन तीने RAD- Regolith Accretion Device हा रोबो डिझाईन केला आहे श्रिया सावंत हिने तयार केलेल्या डिझाईन मधला रोबो स्वयंचलित असुन त्या मध्ये एका बकेट ड्रमचा वापर केलेला आहे त्याच्या सहाय्याने रोबो चंद्रावरील भुमीचे ऊत्खनन करेल आणी चंद्रावरील माती धुळ,खडक ह्यांचे गोळा केलेले नमुने ड्रममध्ये भरेल विद्यार्थ्यांना रोबो डिझाईन करताना चंद्रावरील कमी गुरूत्वाकर्षण,धुळ,प्रदूषण आणी तेथील खडबडीत भुपृष्ठ अशा वातावरणात ऊत्खनन करताना आणी फिरताना रोबो स्थिर राहून त्याचे संतुलन राखण्याचे Challenge होते श्रियाने ते यशस्वीपणे पार पाडले
Tom River-New Jersey येथील नऊ वर्षीय लुसीया ग्रिसांती हिने केजी ते पाचवी ह्या गटात दुसरे बक्षीस मिळवले आहे तिने Olympus ह्या रोबोचे डिझाईन तयार केले आहे तिने रोबोला दिलेल्या नावात अमेरिकेची नासाची आधीची अपोलो मोहीम आणी आताची आर्टिमस मोहीम ह्याचा समावेश आहे ग्रीक पौराणिक कथांच्या अपोलो आणी आर्टिमसच्या घरावरून चांद्रमोहिमेसाठी नासाने हि नावे निवडली तिने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या रोबोचे डिझाईन तयार केले असुन चंद्रवरील खडबडीत भुपृष्ठावरील भुमीवर ऊत्खनन करण्यासाठी रोबोला अणुकुचीदार चाके बसविली शिवाय खडकाला मातीपासून वेगळे करण्यासाठी शंकुच्या आकाराचे ऊपकरण बसवले ह्या शंकूच्या आकाराच्या ऊपकरणाच्या सहाय्याने रोबो जमिनीवरील व खालील भागात उत्खनन करेल आणि खोदलेल्या भागातील रेगोलीथ गोळा करेल
ह्या स्पर्धेतील स्पर्धकांची निवड करण्यासाठी देशभरातील 500 शिक्षक,व्यावसायिक आणी नासा संस्थेतील मान्यवरांची समीती नेमण्यात आली होती त्यांनी अंतिम फेरीत विस जणांची निवड केली त्यांना Lunabotics ज्युनियर प्राईज देण्यात आले
अंतीम निवडीनंतर निवड झालेल्या श्रिया आणी लुसीया ह्यांच्याशी त्यांच्या क्लासरूम मध्ये नासाच्या फ्लोरीडा येथील केनेडी स्पेस सेंटरचे डायरेक्टर Janet Detro ह्यांनी लाईव्ह संवाद साधुन ह्या रोबोच्या डिझाईन बद्दल सखोल माहिती जाणून घेतली त्या नंतर अंतिम निर्णय घेण्यात आला
ह्या विद्यार्थीनींच्या निवडीनंतर नासाच्या STEM Engagement office मधील Associate Administrator Mike Kincaid आनंदित झाले आहेत ह्या विद्यार्थ्यांची कल्पकता,नाविन्य आणी ऊत्साह पाहून मी देखील Exited झालो ह्या मुलांचे असामान्य कर्तृत्व आणी बुध्दीची झेप पाहून भविष्यकालीन आर्टिमस पिढीच्या यशाची मला खात्री पटली !
आगामी आर्टिमस मोहीमेतील तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळविराचा समावेश आहे ह्या मोहिमेतील आणी भविष्यकालीन मानवी अंतराळ मोहिमेत चंद्रावर जाणाऱ्या अंतराळयानासाठी तळ तयार करण्यासाठी तसेच भविष्यकालीन मानवी निवासासाठी तेथे Water Harvesting आवश्यक आहे शिवाय तेथून रॉकेट ऊड्डाणासाठी ईंधनाचीही आवश्यकता आहे त्या साठी तेथील भूपृष्ठाचे ऊत्खनन करून भुगर्भातील खणलेल्या मातीत मिनरल्स आणी खनिजांचा शोध घेतल्या जाणार आहे
No comments:
Post a Comment