मंगळ ग्रहावरील सूर्यग्रहणादरम्यान Perseverance यानाने टिपलेला मंगळाच्या फोबोस चंद्राचा हा विलोभनीय फोटो -फोटो नासा संस्था -(J.PL Lab)
नासा संस्था -(J.PL Lab )-22 एप्रिल
नासाच्या मंगळमोहीमे अंतर्गत मंगळावर गेलेल्या Perseverance यानाने नुकतेच मंगळावरील यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे ह्या एका वर्षात मंगळ यानाने कार्यरत राहून तेथील पुरातन जीवसृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणाऱ्या पाणवठ्याच्या जागा शोधल्या यानातील रोबोटिक आर्मच्या साहाय्याने तेथील भूपृष्ठाखालील जमिनीचे उत्खनन करून तेथील खडक माती ,मिनरल्सचे नमुने देखील गोळा केले आणि आता Perseverance यानाने मंगळ ग्रहावर नुकत्याच झालेल्या सूर्यग्रहणाची खगोलीय घटना कॅमेऱ्यात यशस्वीपणे चित्रित केली आणि त्याचा लाईव्ह व्हिडिओ पृथ्वीवर पाठवला आहे
मंगळ ग्रहाला दोन चंद्र आहेत Phobos आणि Deimos ह्या दोन चंद्रापैकी Phobos ह्या बटाट्याच्या आकाराच्या चंद्राचे सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यासमोरून जातानाचे विलोभनीय दृश्य Perseverance यानाने यानातील Mastcam -Z ह्या अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने कॅमेराबद्ध केले आणि त्याचा लाईव्ह व्हिडियोही चित्रित केला आहे मंगळावरील ग्रहणाच्या ह्या निरीक्षणामुळे शास्त्रज्ञांना चंद्राची मंगळाभोवतीची भ्रमणकक्षा आणि त्याचे मंगळ भूमी वरील गुरुत्वाकर्षणीय कक्षेकडे खेचल्या जाण्याची क्रिया ह्या संबंधित माहिती मिळाली आहे
Perseverance यानाच्या मंगळ ग्रहावरील 397 व्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला हे ग्रहण यानातील Mastcam -Z ह्या कॅमेऱ्याने टिपले हे ग्रहण चाळीस सेकेंदापेक्षा किंचित जास्त वेळाचे होते पृथ्वीवरील सूर्यग्रहणाच्या तुलनेत हे ग्रहण अत्यंत कमी वेळात संपले फोबोस चंद्र पृथ्वीच्या चंद्रापेक्षा आकाराने 157 पटीने लहान आहे आणि मंगळाचा दुसरा चंद्र Deimos त्याहीपेक्षा लहान आहे
Perseverance यानाने घेतलेले सूर्यग्रहणाचे फोटो आणि व्हिडिओ आजवर मंगळावर गेलेल्या यानांनी पाठवलेल्या सूर्यग्रहणाच्या फोटोंपेक्षा स्पष्ट आणि रेखीव आहेत 2004 मध्ये मंगळावर गेलेल्या Twin Mars Rover Spirit आणि Opportunity ह्यांनी पहिल्यांदा मंगळावरील सूर्यग्रहणाची घटना कॅमेऱ्यात चित्रित केली होती त्या नंतर Curiosity मंगळ यानाने Mastcam कॅमेऱ्याच्या साहाय्याने तेथील सूर्यग्रहणाचे लाईव्ह चित्रण करून त्याचा व्हिडिओ आणि फोटो पृथ्वीवर पाठवला होता
पण 2021 मध्ये मंगळावर पोहोचलेल्या Perseverance यानाने यानातील अत्याधुनिक झूम कॅमेऱ्याच्या साहाय्याने सूर्यग्रहणाच्या वेळी फोबोसचा घेतलेला लाईव्ह व्हिडिओ अत्यंत स्पष्ट आणि सुंदर आहे त्याचे सारे श्रेय अर्थातच Perseverance यानाच्या टीमला जाते त्यांनीच हा कॅमेरा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अद्ययावत केला अस San Diego Malin Space Scienceसंस्थेतील Perseverance टीमच्या सदस्य Rachel Howson म्हणतात आम्हाला हे फोटो आणि व्हिडिओ आधीपेक्षा चांगले येणार अशी अपेक्षा होतीच पण प्रत्यक्ष फोटो पाहून मी आश्चर्यचकित झाले कारण ते आमच्या अपेक्षेपेक्षाही चागले आणि स्पष्ट आले आहेत मंगळावरून पृथ्वीवर पोहोचताना ते सुरवातीला थोडेसे अस्पष्ट दिसले पण नंतर मात्र ते स्पष्ट दिसले हे फोटो पाहून मला वाढदिवस किंवा सुट्टीच्या दिवसाची आठवण आली कारण सुट्टी किंवा वाढदिवस येणार हे आपल्याला आधीच माहीत असत पण ती प्रत्यक्ष अनुभवतानाचा आनंद वेगळाच असतो
Colorado Space Science Institute मधील खगोल शास्त्रज्ञ Mark Lemmon म्हणतात, Mastcam-Z मध्ये बसविलेले सौर फिल्टर सनग्लासेस सारखे काम करतात ते सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करतात आणि त्यातील कलर मुळे व्हर्जन मध्ये देखील फरक पडतो आधीच्या तुलनेत आताचे फोटो चांगले आणि स्पष्ट आले आहेत ते ह्या मुळेच सूर्यग्रहणाच्या वेळेसच्या फोबोसच्या सावलीच्या प्रतिमेत चंद्रावरील चढउतार स्पष्ट दिसत आहेत शिवाय आम्हाला त्यावरील सनस्पॉट्सही पाहता आले विशेष म्हणजे Perseverance यानाने पाहिलेले मंगळावरील सूर्यग्रहण आपल्याला जसेच्या तसे पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली
ह्या ग्रहणकाळात फोबोसची मंगळावरील भ्रमण कक्षा त्यातील बदल आणि फोबोसचे मंगळावरील गुरुत्वाकर्षणीय वातावरणात खेचले जाणे हे निरीक्षण नोंदविल्या गेले त्या काळात मंगळभूमीवरील भूपृष्ठीय आवरणात आणि अंतर्गत भागात काय बदल जाणवले हे देखील नोंदवल्या गेले शास्त्रज्ञांच्या मते फोबोस हळूहळू मंगळा कडे खेचल्या जात आहे आणि आगामी दहा मिलियन वर्षात तो मंगळाकडे अधिकाधिक खेचल्या जाईल आणि मंगळभूमीवर आढळून नष्ठ होईल आताच्या Perseverance यानाने पाठवलेल्या सूर्यग्रहणाच्या लाईव्ह व्हिडिओ मुळे शास्त्रज्ञांना त्या बाबतीत संशोधन करताना सखोल माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत
No comments:
Post a Comment