Saturday 9 April 2022

नासाचे अंतराळवीर Mark Vande hei ह्यांनी परतण्याआधी त्यांच्या दीर्घकालीन वास्तव्याबद्दल स्थानकातून साधलेला संवाद

 NASA astronaut and Expedition 65 Flight Engineer Mark Vande Hei on the International Space Station.

 नासाचे अंतराळवीर Mark Vande Hei स्थानकातील वास्तव्यादरम्यान व्हेजी चेंबर मध्ये देखभाल करताना -फोटो नासा संस्था 

 नासा संस्था -

नासाचे अंतराळवीर Mark Vande hei अंतराळस्थानकात 355 दिवस रहाण्याचा विक्रम प्रस्थापित करून मागच्या आठवड्यात पृथ्वीवर परतले आहेत त्यांच्या ह्या दिर्घकालीन वास्तव्याबद्दल स्थानकातून परतण्याआधी त्यांनी Huston येथील नासा संस्थेशी साधलेल्या संवादाचा हा वृतांत

Rob Navies (Jscpao) - Mark! स्थानकातील दिर्घकाळचे वास्तव्य संपवून आता तु पृथ्वीवर परतणार आहेस स्थानकात जास्त दिवस रहाव लागेल अस तुला ऐनवेळी सांगण्यात आल तेव्हाची मनस्थिती कशी होती ?कशी तयारी केलीस ?

Mark- अगदी शेवटच्या दिवशी ऐनवेळी मला हि संधी मिळाली माझ्याकडे फक्त एक दिवस होता मी जास्त वेळ विचार करण्यात न घालवता तात्काळ त्या मिळालेल्या संधीवर फोकस केल आणी हि संधी घ्यायची ठरवल वेळ कमी असल्यामुळे मला ह्या ट्रिपच नियोजन आधी करता आल नाही नाहीतर आपण एखाद्या ट्रिपच नियोजन कित्येक दिवस आधीपासूनच ठरवतो मानवाला मिळालेल्या कल्पकतेच्या देणगीमुळे हे सहज शक्य होत पण माझ्याकडे वेळ कमी होता आणी ईच्छाशक्ती तीव्र होती नवीन काही तरी करण्याची दुर्मिळ संधी मिळणार होती त्या मुळे मी ती घेण्याच ठरवल

Rob - ह्या दिर्घकाळच्या वास्तव्यादरम्यान तुझी मानसिक स्थिती कशी होती विषेशतः विकेंडला असे अनेक विकेंड स्थानकात गेले तेव्हा कधी कंटाळवाणे क्षण आले का?

Mark-  मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित केल मला आता ईथेच रहायचय हे मनाशी पक्क केल हळूहळू सवय झाली आपण सारेच सोशल मांईडेड असतो तीथे पृथ्वीवर आपण आपल्या मित्रांसोबत कुटुंबियांसोबत वेळ घालवतो तेव्हाच्या क्षणाच्या आठवणी मनात होत्या आणी पृथ्वीवर परतल्यानंतर पुन्हा आम्ही भेटणार होतोच ईथे संशोधन करण्याची झिरो ग्रॅविटीत राहण्याची अमूल्य संधी होती ती पृथ्वीवर अनुभवायला मिळणार नव्हती हे मनाशी पक्क केल होत आम्ही सर्व अंतराळवीर एकत्रित काम करतो वेळ मिळाला की वीकेंडला घरच्यांशी संवाद साधत होतो आणि मी रोज मेडीटेशन ,व्यायाम करत होतो जेव्हा कंटाळा येत होता तेव्हा चांगल्या गोष्ठी आठवत होतो त्या मुळे वेळ छान गेला

Rob - पृथ्वीपासून लांब रहाताना शारीरिदृष्ठ्या अस्वस्थतेचे क्षण अनुभवले असतील विषेशतः ह्या दिर्घकालीन वास्तव्यातील सर्वोच्य आनंदाचे आणी असहाय्यतेचे क्षण ह्या बद्दल सांग

Mark-माझ्या स्थानकातील वास्तव्यादरम्यानचा सर्वोच्च आनंदाचा अविस्मरणीय क्षण म्हणजे स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत तरंगत माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत डोळ्यातील पाणी लपवत हसत हसत जेवण करण त्या क्षणी सहकारी अंतराळवीरांनी केलेल्या कमेंट्सच वाईट वाटुन न घेता खेळकरपणाने हसुन दाद देण कारण सगळ्यांची कंडीशन सारखीच असते आणी असहाय्य अवस्था म्हणाल तर ईथल्या झिरो ग्रॅव्हीटीत विपरीत वातावरणात सतत तरंगत रहाण आव्हानात्मक असत शारीरिकदृष्ठ्या खूप  प्राब्लेमचा सामना करावा लागतो विशेषतः Headaches, अशावेळी  खूप अस्वस्थता जाणवते पण खूप काम असत आणी आपोआपच परिस्थितीशी जुळवून घेतल्या जात 

Rob -तुम्ही स्थानकात सात किंवा जास्ती अंतराळवीर मिळुन रहाता अशावेळेस तुम्ही एकटेपणाचा सामना करता ह्यावर सहजासहजी विश्वास बसण कठीण असत मागच्या वर्षीच्या कोरोना काळात काळात तुमच्या कामा दरम्यान असे क्षण आले का?

Mark- मला तस वाटत नाही जर सकारात्मक विचार असतील तर एकटेपणा जाणवत नाही ह्या कोरोनाच्या काळात जेव्हा निर्बंध आले तेव्हा आपण सारेच घरात isolate झालो होतो तेव्हा घरात कीती कमीजण होते त्या बाबतीत आम्ही लकी ठरलो ईथे आम्ही सातजण होतो आम्ही त्या काळातही घरच्यांशी आणि सोशल मिडीयावरून लोकांशी संवाद साधु शकलो आम्ही आमच संशोधनही करत होतो त्यामुळे पृथ्वीवरच्या तुलनेत आम्ही ईथे सुरक्षित होतो त्या वेळी नासा संस्थेतील Health & performance group ने आम्हाला खूप मदत केली त्यांच्यामुळे आम्ही आमच्या घरच्यांशी बोलु शकलो आणी सोशलमिडीयावरून नवीन लोकांशीही संवाद साधु शकलो

Rob- Mark जेव्हा तुला माहिती आहे का कि तु ,पृथ्वीवर परतशील तेव्हा तु 151 मिलीयन मैलाचा अंतराळ प्रवास केलेला असेल म्हणजे जवळपास चंद्रावर 312 रांऊड ट्रिप! तसेच तु स्थानकात आलेल्या वेगवेगळ्या व्यावसायिक कंपनीच्या अंतराळयानाना पाहिले आहेस ह्या बद्दल आणी भविष्यात मानवी अंतराळप्रवासा बद्दलच तुझ मत काय आहे?

Mark-मला आनंद वाटतो  आणी मला विश्वास आहे की नासा संस्थेने  खाजगी कंपनीत व्यावसायिकदृष्ठ्या केलेली हि यशस्वी सुरवात आहे ह्या मुळे भविष्यात अंतराळवीरांचा अंतराळप्रवास सहजतेने सुरक्षित आणी आरामात होईल आणी आगामी काळात खाजगी अंतराळवीरांप्रमाणेच सामान्य लोकही सहजतेने आमच्या सारखेच अंतराळात भ्रमण करतील आणी त्यांना आकाशातील ग्रहांबद्दल जास्तीतजास्त माहिती मिळेल 

Rob- तुझ्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान स्थानकात रशियन सिनेनिर्माता आणी रशियन सिनेअभिनेत्री स्थानकात आले होते शीवाय दोन जपानी अंतराळयात्रीही,ते अंतराळवीर नव्हते तरीही त्यांना स्थानकात येण्याची परवानगी मिळाली त्या बद्दल सांग !तो अनुभव कसा होता?

Mark- अमेझिंग! खरच आश्चर्यकारक अनुभव होता तो ! त्या दोघांनी आमच्यासारख प्रोफेशनल ट्रेनिंग घेतल नव्हत पण कमी ट्रेनिंग घेतल होत त्यामुळे ते स्थानकात कसे adjust होतील ह्याची आम्हाला काळजी होती पण आंतरिक ईच्छेच्या जोरावर त्यांनी हे साध्य केल ते खूप लवकर ईथल्या वातावरणात सरावले त्यांची एनर्जी बघून आम्हीही प्रेरित झालो होतो त्यांच्यासोबतचा काळ खूप छान गेला तसाच अनुभव दोन जपानी अंतराळ प्रवाशांचा होता ह्या चौघा स्थानकातील अंतराळगेस्ट सोबतचा काळ खूप छान होता आणी मला तो अनुभवता आला त्यांनी रीतसर परवानगी काढली होती इथे येण्याची !

Rob - आता वर्षभरानंतर तु स्थानकातून परतणार आहेस ह्या क्षणी तुझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत!

Mark  - खरच खूप कठीण आहे ह्या क्षणीच्या भावना शब्दात व्यक्त करण !खरतर संमिश्र भावना आहेत ! पृथ्वीवर परतल्यानंतर मी माझ्या कुटुंबीयांना भेटणार ह्याचा आनंद आहे मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यानंतर मी माझ्या पत्नीला प्रत्यक्षात पाहिल नाही त्यामुळे तो क्षण आनंददायी असेल पण मी माझ्या पत्नीला प्रॉमिस केलय की ह्यापुढे मी स्थानकात रहायला जाणार नाही ह्याच दु:ख आहे कारण हे स्थानकातल घर माझ्यासाठी स्पेशल आहे ईथे मला आंतरदेशीय मित्र मिळाले त्यांच्या सोबत संशोधन करायची संधी मिळाली आम्ही सर्वांनी ईथे एकत्रित सण साजरे केले पार्टी केली त्याच्या आठवणी अविस्मरणीय आहेत त्या माझ्या मनात कायम रहातील मी नासा संस्थेचा खूप,खूप आभारी आहे त्यांनी मला स्थानकात रहाण्याची संशोधन करण्याची अमुल्य संधी दिली त्यांच्यामुळेच मी ईथे राहु शकलो मला ईतके छान मित्र मिळाले पण मी परत ईथे येऊ शकणार नाही ह्याच वाईट वाटतय त्यामुळे ह्या क्षणी मनात कडुगोड आठवणी आहेत आता उर्वरित आयुष्य मी देशासाठी आणी संशोधनासाठी घालवणार आहे 

Rob-तुम्ही स्थानकातून परतताना आणी सोयुझ MS-19मध्ये शिरताना Hatching च्या वेळी स्थानकाचा फोटो आणी व्हिडीओ काढण्याची परवानगी घेतली आहे अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांना ती मिळालीय ह्या बद्दल सांग

Mark- निश्चितच!आम्ही तिघेही स्थानकातून निघताना नवीन Docking portवरून निघणार आहोत सोयुझ यानात खूप कमी जागा असते त्याही कंडीशनमध्ये Pyotr निघताना स्थानकाचे फोटो आणी व्हिडीओ घेणार आहे Pyotr कमांडरसीट जवळच्या जागेत झोपलेल्या पोजमध्ये बसेल म्हणजे त्याला थोडी मोकळी जागा मिळेल आणी hatchingच्या वेळी habitation compartment मध्ये असलेल्या स्थानकाच्या समोरच्या भागातील खिडकीतून फोटो आणी निघतानाच्या प्रक्रियाचे व्हिडीओ शुटिंग करेल त्या वेळी मी त्याला मदत करेन आणी व्हिडीओ घेतल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या सीटवर बसु हा आमच्यासाठी नवा अनुभव असेल

 Rob- सुरवातीच्या आणी नंतरच्या launching आणि landing मध्ये काय फरक होता ?

Mark-खूप फरक होता आधी अनुभव नसल्याने पहिला अनुभव खूप मजेशीर होता सुरवातीला अंतराळात शिरताना खूप ऊष्णतेचा सामना करावा लागला आणी अचानक पृथ्वीची कक्षा भेदल्यावर वजनरहित अवस्था झाल्यावर सिटवरुन मागेपुढे होताना बेसावध असल्यामुळे स्थीर रहाण कठीण झाल होत नंतर स्थानकातील झिरो ग्रॅविटीत स्थिरावताना हळूहळू सवय झाली तसच परतताना पॅराशूट कधी ऊघडेल,ऊघडेल की नाही आपण जिंवत परतु की नाही असे वाटत असतानाच अचानक पॅराशूट ऊघडल्यावर आणी जमिनीवर ऊतरताना पहिल्यावेळी अनुभव नसल्याने डोक्यावर पडल तर लागेल अशी भीती होती शीवाय खाली ऊतरण्याआधी हवामानाचा अंदाज घेऊन मगच खाली ऊतरण्याची परवानगी मिळते अशावेळेस वाट पहाण खूप कंटाळवाण असत पण दुसऱ्या वेळेस आधीच्या अनुभवाचा फायदा होतो ऊतरताना आपल्या डोक्याला लागणार नाही ह्याची काळजी घेतल्या जाते मागच्या वेळेस आम्ही फेब्रुवारीच्या महिन्यात परतलो त्यामुळे पृथ्वीवर थंड वातावरण होत त्यामुळे परतल्यानंतर प्रथम आम्ही तेथील मातीचा भाजीपाल्यांच्या पिकांचा सुगंध घेतला आता भर ऊन्हाळ्यात परतणार आहोत

Rob- हो ! ह्या वेळी कझाकस्थानातील वातावरण 50 डिग्री फॅ.ईतके ऊष्ण आहे! परतल्यानंतर पहिली गोष्ट कोणती करणार आहेस

Mark-  मी माझ्यासाठी आणी पत्नीसाठी  Coffee बनवणार आहे आणी आम्ही दोघे Coffee,Guacamole आणी Chips चा आस्वाद घेत एकत्रित गप्पा मारत शनिवार निवांत घालवणार आहोत

No comments:

Post a Comment