Axiom -1चे चारही अंतराळवीर स्थानकात पोहोचल्या नंतर Welcome ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था -9 एप्रिल
नासा संस्था,Space X आणि Axiom Space ह्यांच्या सहकार्याने अंतराळविश्वातील खाजगी व्यावसायिक अंतराळ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे ह्याच व्यावसायिक मोहीमेअंर्गत Axiom -1 ह्या मोहिमेद्वारा चार अंतराळवीर 8 एप्रिलला आठ दिवसाच्या वास्तव्यासाठी स्थानकाच्या दिशेने अंतराळप्रवासास निघाले आणि 21 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 9 एप्रिलला सुखरूप स्थानकात पोहोचले
Axiom -1 मोहिमेतील सहभागी चार अंतराळवीरांमध्ये
- Michael Lopez Alegria - कमांडर
- Larry Connor-(U.S) -Pilot
- Extan Stibbe(Israel )- Mission Specialist
- Mark Patty(Canada )
ह्यांचा समावेश आहे शुक्रवारी आठ एप्रिलला नासाच्या Kennedy Space Center Florida येथील उड्डाणस्थळावरून Space X च्या Endeavour अंतराळयानातून 11.17a.m.ला हे चारही अंतराळवीर अंतराळस्थानकाकडे रवाना झाले आणि नऊ एप्रिलला 8.29a.m.ला स्थानकाजवळ पोहोचले
10.13 a.m.ला स्थानक आणि अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने जोडल्या गेल्या नंतर ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकाच्या Harmony Module मधील Docking port च्या मधल्या भागातील Camera मध्ये काही कारणाने व्यत्यय आल्यामुळे स्थानकातील अंतराळवीरांना फोटो व व्हिडीओ व्यवस्थित न दिसल्यामुळे अंतराळयान स्थानकाशी नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे ऊशीराने जोडले गेले
ह्या चारही अंतराळवीरांचे स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळविरांनी स्वागत केले त्या नंतर Welcome ceremony पार पडला तेव्हा ह्या चारही अंतराळवीरांनी नासा ,Space X आणी Axiom Space संस्थेशी लाईव्ह संवाद साधला त्या वेळी ह्या अंतराळवीरांचे सर्वांनी अभिनंदन केले अंतराळविरांनी देखील आमचा अंतराळप्रवास खूप आरामदायी झाल्याचे सांगत तुम्ही आम्हाला हि संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार असे म्हणत आभार मानले तेव्हा नासाच्या Associate Administrator-Kathryn Lueders म्हणाल्या ,"तुम्ही सर्वजण खूप आनंदात दिसत आहात ह्या आठ दिवसात तुम्हाला सर्वांंना एकत्रित काम करायचे आहे त्यासाठी शुभेच्छा !"
स्थानकात सध्या राहात असलेल्या सात अंतराळवीरांसोबत Axiom चे अंतराळप्रवासी खालच्या रांगेत -फोटो नासा संस्था
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशानंतर नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी Axiom,Space X नासा आणी Axiom टिममधील अंतराळवीरांचे अभिनंदन केले ते म्हणाले ,"ह्या टिममधील सर्वांचे अथक परीश्रम,जिद्द आणी कर्तृत्वामुळे आजचे हे पहिले ऐतिहासिक ऊड्डाण शक्य झाले अंतराळ विश्वातिल व्यावसायिक ईंडस्ट्रीच्या सहकार्याने आता खाजगी अंतराळविरांना अंतराळस्थानकात नेणे,आणणे सोपे झाले आहे भविष्यकालीन मानवी अंतराळप्रवासाचा हा यशस्वी शुभारंभ आहे !"
Axiom चेअध्यक्ष आणी CEO-Michael Saffredini ह्यांनी देखील ह्या अंतराळवीरांचे अभिनंदन केले "ह्या चारही अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशाने अंतराळ विश्वातिल खाजगी अंतराळवीरांच्या अंतराळयात्रेच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे नासा आणी SpaceX ह्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे हा शुभारंभ भविष्यात यशाचे शिखर गाठेल ह्यात शंका नाही!"
ह्या चारही अंतराळवीरांनी ह्या मोहिमेसाठी अंतराळवीरांप्रमाणेच आवश्यक ट्रेनिंग घेतले आहे ह्या अंतराळवीरांच्या ट्रेनिंगला नासाच्या Huston येथील Johnson Space Center मध्ये 2021च्या ऑगस्ट मध्येच सुरुवात झाली होती शीवाय त्यांनी E.SA,Space X आणी Axiom Space ह्या संस्थेतही ट्रेनिंग घेतले
ह्या मोहिमेचे कमांडर अंतराळवीर Lopez-Alegria हे मुळचे स्पेनचे आहेत पण अमेरिकेतील California मध्ये त्यांचे शिक्षण झाले तेथेच ते स्थायिक झाले सध्या ते नासामध्ये अंतराळवीर आहेत
हे चारही अंतराळवीर आठ दिवस स्थानकात रहातील आणी अंतराळ मोहीम 67च्या अंतराळवीरांसोबत तिथे सुरू असलेल्या संशोधनात व कमर्शियल अँक्टिव्हिटीज मध्ये सहभागी होतील
No comments:
Post a Comment