नासाच्या अंतराळ मोहीम 66 चे रेकार्ड ब्रेकर अंतराळवीर Mark Vande अंतराळ स्थानकातीलU.S. Destiny Lab Module मध्ये संशोधन करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीम 66 चे अंतराळवीर Mark Vande Hei रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि Pyotr Dubrov ह्यांच्यासोबत तीस मार्चला पृथ्वीवर परतणार आहेत Soyuz MS -19 ह्या अंतराळयानातून हे तिघेही रशियातील कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे बुधवारी परतणार आहेत
हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परतण्यासाठी निघण्याआधी स्थानकात मंगळवारी त्यांचा Command Change Ceremony, Farewell ceremony पार पडेल स्थानकातील सद्याचे कमांडर Anton Shkaplerov हे स्थानकाच्या कमांडरपदाची सूत्रे अंतराळवीर Tom Marshburn ह्यांच्याकडे सोपवतील त्या नंतर स्थानकातील अंतराळवीर ह्या तिघांना निरोप देतील ह्या दोन्ही सोहळ्याचे आणि पृथ्वीवरील रशियातील Landing चे नासा T.V. वरून लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे
अंतराळवीर Mark Vande Hei आणि Pyotr Dubrov हे दोघेही 5 एप्रिल 2021मध्ये स्थानकात राहायला गेले होते आणि आता स्थानकातील 355 दिवसाचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या स्थानकातील ह्या मोहिमेतील वास्तव्यादरम्यान त्यांनी पृथ्वीभोवती 5,680 इतक्या फेऱ्या मारल्या आणि 150 मिलियन मैलाचा अंतराळप्रवास पूर्ण केला आहे
अंतराळवीर Mark Vande दुसऱ्यांदा अंतराळस्थानकात राहायला गेले होते त्यांच्या ह्या दोन अंतराळ मोहिमेत त्यांनी आजवर स्थानकात 523 दिवस राहून संशोधनात सहभाग नोंदवला ह्या त्यांच्या स्थानकातील दुसऱ्या अंतराळ मोहिमेतील वास्तव्यात त्यांनी सलग 355दिवस राहून संशोधन केले शिवाय त्यांनी स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला त्यांनी अमेरिकन अंतराळवीरांच्या 340 दिवस सलग स्थानकात राहण्याचा आधीचा विक्रम मोडीत काढला स्थानकातील झिरो ग्रॅव्हीटीत जास्त दिवस राहिल्यावर मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात मानवी शरीर त्यावर मात करून विपरीत वातावरणात कसे तग धरते ह्या विषयीच्या संशोधनात ते सहभागी झाले होते
रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov हे चवथ्यांदा स्थानकात राहायला गेले होते त्यांच्या चार वेळच्या अंतराळ मोहीमेदरम्यान त्यांनी स्थानकात 708 दिवस वास्तव्य करून संशोधनात सहभाग नोंदवला अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती त्यांनी देखील स्थानकात 355 दिवस वास्तव्य करून संशोधनात सहभाग नोंदविला
हे तिन्ही अंतराळवीर अंतराळातून पॅराशूटच्या साहाय्याने पृथ्वीवर उतरतील प्राथमिक चेकअप नंतर नासाचे अंतराळवीर Mark Vande विमानाने त्यांच्या Houston येथील निवासस्थानी पोहोचतील तर हे दोन्ही रशियन अंतराळवीर रशियातील Star City येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये परततील
No comments:
Post a Comment