Friday 25 March 2022

29 मार्चला Blue Origin चे New Shepard अंतराळयान सहा प्रवाशांना अंतराळ पर्यटन घडवणार

 

          Blue Origin च्या New Shepard अंतराळ प्रवास करणारे अंतराळ प्रवासी -फोटो -Blue Origin 

Blue Origin- 21 मार्च 

सामान्य हौशी नागरिकांना अंतराळ पर्यटन घडविण्यासाठी अमेरिकेने खाजगी कंपनीच्या अंतराळयानांना अवकाश उड्डाणास परवानगी दिल्यानंतर Blue Origin च्या New Shepard अंतराळ यानाने तीनवेळा नागरिकांना अंतराळ प्रवास घडवला आता 29 मार्चला चवथ्यांदा New Shepard यान नागरिकांना घेऊन अंतराळभरारी मारणार आहे 

Blue Origin च्या New Shepard अंतराळ यानातून सहा हौशी अंतराळ यात्री अंतराळप्रवास करणार आहेत ह्या सहा प्रवाशांमध्ये New Shepard चे चीफ आर्किटेक्ट Gary Lai ह्यांचा समावेश आहे त्यांच्या सोबत Marty Allen, Sharon आणि Marc Hagle हे दांम्पत्य,Jim Kitchen आणि Dr. Geoge Nield हे नागरिक अंतराळ प्रवास करणार आहेत 

Gary Lai हे New Shepard यानाचे आर्किटेक्ट असून ते ह्या यानाचे टीमप्रमुखही आहेत त्यांनी ह्या अंतराळयानाचे डिझाईन केले आहेच शिवाय ह्या यानाच्या निर्मितीदरम्यान यानात अंतराळप्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी  अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यावर भर दिला 2004 मध्ये ते Blue Origin कंपनीत रुजू झाले त्यावेळी तिथे असलेल्या वीस कर्मचाऱ्यांमध्ये ते प्रथम होते आता ते कंपनीचे चीफ आर्किटेक्ट आणि सिनियर डायरेक्टर आहेत 2019 मध्ये त्यांना Blue Origin Founder पुरस्कार मिळाला होता 

अंतराळ पर्यटन विश्वातील हि विसावी अंतराळभरारी आहे तर Blue origin च्या New Shepard अंतराळयानाची हि चवथी अंतराळभरारी असेल West Texas येथून हे अंतराळयान अंतराळप्रवाशांना घेऊन अंतराळात झेपावेल आणि अंतराळप्रवास घडवून पृथ्वीवर परतेल ह्या अंतराळ पर्यटनाचे लाईव्ह प्रसारण Blue Origin च्या वेब साईटवरून करण्यात येणार आहे  

No comments:

Post a Comment