नासाच्या अंतराळ मोहीम 66-67 चे रशियन अंतराळवीर Sergey Korsakovअंतराळवीर Oleg Artemyev आणि अंतराळवीर Denis Matveev-फोटो नासा संस्था
नासा संस्था -18 मार्च
रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने रशियावर काही बाबतीत निर्बंध घातल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ह्यांनी अमेरीकेला अंतराळातील अंतराळस्थानक उडवून देण्याचा आणि अमेरिकन अंतराळवीरांना स्थानकातच सोडून देण्याचा इशारा दिल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांनी अमेरिकेच्या अंतराळमोहिमेवर ह्या निर्बंधाचा काहीही परिणाम होणार नसून अंतराळमोहिमेवर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ठ केले होते नासा संस्थेत अनेक देश एकत्रितपणे अंतराळमोहीम राबवतात त्या मूळे पूर्वनियोजित अंतराळ मोहिमे अंतर्गत अंतराळ मोहीम 66-67चे तीन रशियन अंतराळवीर सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत
रशियन अंतराळवीर Oleg Artemyev ,अंतराळवीर Denis Matveev आणि Sergey Korsakov हे तिन्ही अंतराळवीर शुक्रवारी अठरा मार्चला रशियातील कझाकस्थान येथील बैकोनूर उड्डाणस्थळावरून अंतराळस्थानकाकडे रवाना झाले Soyuz MS-18 हे अंतराळयान 11.55 a.m. EDT(8.55a.m.स्थानिक वेळ ) वाजता ह्या तीन अंतराळवीरांना घेऊन स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि तीन तास दहा मिनिटांचा अंतराळ प्रवास करून स्थानकाजवळ पोहोचले
दोन तासांनी स्थानक आणि अंतराळयान जोडल्या गेल्यानंतर 3.12p.m.ला ह्या तीनही अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या राहात असलेल्या अमेरिकन आणि रशियन अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले काही वेळाने सर्वांनी एकत्रित येऊन नासा संस्थेशी आणि कुटुंबियांशी लाईव्ह संवाद साधला आणि त्यांना आम्ही सुखरूप पोहोचल्याचे सांगितले ह्या रशियन अंतराळवीरांनी युक्रेनच्या राष्ट्रध्वजावरील निळा आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेला स्पेससूट घातलेला पाहून त्यांना पत्रकारांनी हा रंग निवडण्यामागचे कारण विचारले असता प्रत्येकाला आपल्या आवडीचा ड्रेस परिधान करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही हा रंग निवडला असे अंतराळवीर Sergey Korsakov ह्यांनी सांगितले
रशियन अंतराळवीर Sergey Korsakov,अंतराळवीर Oleg Artemyev आणी अंतराळवीर Denis Matveev पिवळ्या रंगाच्या स्पेससुटमध्ये स्थानकातून नासा संस्थेशी संवाद साधताना- फोटो-नासा संस्था
विशेष म्हणजे अमेरिका आणि रशिया ह्यांच्यातील तणावाचा कोणताही परिणाम ह्या अंतराळवीरांवर झाला नाही स्थानकात अमेरिकन आणि रशियन अंतराळवीर एकत्रित राहून तिथे सुरु असलेले संशोधन करीत आहेत आता हे तीनही अंतराळवीर सहा महिने स्थानकात राहून तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील ह्या अंतराळवीरांच्या पृथ्वीवरून स्थानकाकडे उड्डाण,स्थानकातील प्रवेश आणि Welcome ceremony चे लाईव्ह प्रसारण नासा T.V. वरून करण्यात आले होते
अंतराळवीर Mark Vande Hei पूर्वनियोजित कार्यक्रमानूसार रशियात परतणार
अमेरिका आणि रशियाच्या तणावपूर्ण वातावरणामुळे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या तारखेवर अनिश्चितता निर्माण झाली असली तरी अंतराळवीर Mark Vande Hei त्यांचा स्थानकात जास्त दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित करून 355दिवसांचा स्थानकातील मुक्काम संपवून 30 मार्चला पृथ्वीवर परतणार आहेत 30 मार्चला ह्याच सोयूझ यानातून रशियन अंतराळवीर Pyotr Dubrov आणि Anton Shkaplerov पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या सोबत अंतराळवीर Mark Vande देखील पृथ्वीवर परततील
No comments:
Post a Comment