अंतराळवीर Kayla Barron अंतराळस्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-16 मार्च
नासाच्या अंतराळमोहिम 66 चे अंतराळवीर Kayla Barronआणी राजा चारी ह्यांनी मंगळवारी स्पेसवॉक केला अंतराळस्थानकाला प्रकाश आणि पॉवर पुरवणाऱ्या स्थानकाबाहेरील भागातील Solar Array system बदलण्यासाठी हा Spacewalk करण्यात आला
ह्या स्पेवॉक साठी अंतराळवीर Kayla Barron आणि राजा चारी ह्यांनी आधीपासूनच तयारी केली होती दोघांनी आदल्या दिवशीच त्यांचे स्पेससुट चेक केले आणि लिकेज नसल्याची खात्री केली त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज केले शिवाय स्पेसवॉकसाठी लागणारे tools,lights,Cameras आणी Data recorders व्यवस्थित आहे की नाही हेही चेक केले होते
अंतराळवीर Kayla Barron आणि अंतराळवीर राजा चारी स्पेसवॉक साठी जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
हे दोन्ही अंतराळवीर 15 मार्चला सकाळी 8 वाजून पाच मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले आणि स्पेसवॉक पूर्ण करून दुपारी 3वाजून सहा मिनिटाला स्थानकात परतले साडेसहा तासांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाबाहेरील Starboard -4-Trss ह्या भागात स्पेसवॉक केला ह्या भागातील कमी K.Wचे Solar Array बदलून त्या जागी जास्त K.W चे Solar Array बसविण्यात येणार आहेत स्थानकाबाहेरील आठ पॉवर चॅनेल पैकी सहा चॅनेलवरील Solar Array बदलण्यात येणार आहेत त्याच्या पूर्वतयारीसाठी अंतराळवीरांनी हा स्पेसवॉक केला अंतराळवीरांनी त्या पैकी दोन पॉवर चॅनेलवर Solar Array बदलुन नवीन बसविण्यासाठी सपोर्ट ब्रॅकेट्स फिक्स केले शिवाय ह्या पुढील 23 मार्चला होणाऱ्या स्पेसवॉकसाठीची तयारीही करून ठेवली ह्या दोन अंतराळवीरांना स्थानकातून अंतराळवीर Tom Marshburn आणि अंतराळवीर Matthias Maurer ह्यांनी मदत केली
अंतराळवीर Kayla Barron ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा दुसरा स्पेसवॉक होता ह्या स्पेसवॉकसाठी Kayla ह्यांनी परिधान केलेल्या स्पेस सूट वर लाल रंगाच्या रेषा होत्या तर अंतराळवीर राजा चारी ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा पहिलाच स्पेसवॉक होता त्यांनी परिधान केलेला स्पेससूट रेषाविरहित होता स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला आजवरचा हा 247 वा स्पेसवॉक होता आता 23 मार्चला उर्वरित कामासाठी पुन्हा स्पेसवॉक करण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment