Thursday 10 March 2022

भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या प्राथमिक संशोधनाला नासाची मंजुरी

  NASA Innovative Advanced Concepts (NIAC) graphic

 नासा संस्था -JPL lab

भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीर Body scanner मध्ये पाऊल टाकतो आणि काही तासानंतर खास मंगळभूमीवर उतरून पायी चालून जाण्यासाठी बनविलेला कस्टममेड स्पेससूट घालून त्यातील अद्ययावत यंत्रणेद्वारे मंगळावरील विपुल प्रमाणात असलेल्या कार्बन डाय ऑक्साईड मधून वेगळा झालेला ऑक्सिजन श्वास घेण्यासाठी वापरतो किंवा शुक्र मोहिमेतील ड्रोन पक्षा सारखे पंखात हवा भरून आकाशात फिरतो आणि तेथील वातावरणाचे ,हवामानाचे सखोल निरीक्षण नोंदवतो ह्या कल्पनातीत गोष्टी खरतर सामान्यांना स्वप्नवत वाटणाऱ्या असल्या तरीही ह्या अशक्यप्राय गोष्ठी शास्त्रज्ञ भविष्यात सत्यात उतरवण्यासाठी सतत प्रयत्न करीत असतात अशाच अभिनव प्रयोगाच्या प्राथमिक संशोधनाला नासा संस्थेने मंजुरी दिली आहे 

नासाच्या Innovative Advanced Concepts प्रोग्रॅम अंतर्गत भविष्यकालीन Aeronautics आणि अंतराळ मिशन साठी उपयुक्त अशा अत्याधुनिक नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या प्राथमिक संशोधनाला नासा संस्थेने मान्यता आणि आवश्यक निधी मंजूर केला आहे ह्या संस्थेमार्फत नऊ राज्यातील सतरा संशोधकांना 5.1 मिलियन डॉलरची मदत देण्यात येणार आहे ह्या प्रोग्रॅम अंतर्गत पहिल्या भागात बारा संकल्पना आणि दुसऱ्या भागात पाच नव्या संकल्पित संशोधनाची निवड करण्यात आली आहे हे संशोधन प्राथमिक स्वरूपात असल्यामुळे सध्यातरी नासा संस्थेतर्फे त्याला अंतीम मान्यता देण्यात आलेली नाही त्या साठी सखोल संशोधन करून हि संकल्पना पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे 

नासाच्या Deputy Administrator Pam Melroy म्हणतात "भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळमोहिमेतील  अंतराळवीरांसाठी आणी रोबो साठी असे नाविन्यपूर्ण अत्याधुनिक संशोधन गरजेचे आहे नासा संस्थेने निधी उपलब्ध केल्या मुळे अशा नाविन्यपूर्ण कल्पना सत्यात उतरवणे सोपे होईल" नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे Associate Administrator Jim Reuter म्हणतात ,"ब्रह्मांडातील दूरवरच्या ग्रहांचा,विश्वाचा शोध घेण्यासाठी आणि अंतराळवीरांच्या  सुरक्षिततेसाठी अशा नवनवीन कल्पना सत्यात उतरवणे गरजेचे आहे भविष्य कालीन मोहिमेत ह्या संशोधनाचा मोलाचा वाटा असेल 

ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेत दूरवरच्या अंतराळप्रवासात अत्याधुनिक अंतराळयान अंतराळवीरांचे किरणोत्सर्गापासून संरक्षण करेल आवाजविरहित विमान इलेकट्रीक पॉवरचा वापर करून आकाशात उड्डाण करेल आणि अत्याधुनिक अंतराळयान सौरऊर्जेवर अंतराळ प्रवास करेल 

नासाच्या Maryland येथील Goddard Space Flight Center चे नोबेल विजेते खगोल शास्त्रज्ञ John Mather यांची संकल्पना अशी आहे की,अंतराळातील फुटबॉलच्या आकारातील स्टारशेड वर लावलेल्या ग्राउंड बेस टेलिस्कोपचा वापर करून दूरवरच्या ग्रहांचा प्रकाश अडवून आपल्या ग्रहमालेच्या बाहेरील पृथ्वीसारख्या ग्रहाचा आणि इतर ग्रहावरील सजीव सृष्ठीच्या शक्यतेचा शोध लावण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांना करता येईल 

Massachusetts Institute of Technology च्या Sara Seager ह्यांनी मांडलेली नवी संकल्पना शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या जवळच्या ग्रहांवरील संशोधनास उपयुक्त ठरेल शुक्र ग्रहावरील वातावरणात प्रोब पॅराशूटच्या साहाय्याने उतरेल  आणि तेथील ढग आणि वायूंचे सॅम्पल्स गोळा करून पृथ्वीवर आणेल इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतील शास्त्रज्ञ त्यावर सखोल संशोधन करतील आणि तेथील सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाची शक्यता शोधतील  

निवड झालेल्या दुसऱ्या भागातील संकल्पनेत मंगळ ग्रहावरील पर्वतीय भागाचा आणि गुहेचा शोध घेणाऱ्या छोट्या रोबोजचा समावेश आहे या शिवाय अंतराळयानासाठी अणुऊर्जा वापरण्याची अभिनव संकल्पना आणि 3D प्रिंटेड स्विमिंग मायक्रो रोबोटच्या थव्याची संकल्पना सुचवण्यात आली आहे हे रोबोज Enceladus,Europa ,Titan येथील सागरात तळाशी जाऊन तेथील सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचे सूक्ष्म अवशेषांचा शोध घेतील

No comments:

Post a Comment