नासा संस्था -6 मार्च
नासाच्या अपोलो मोहिमे अंतर्गत 1969 साली अंतराळवीरांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेऊन चांद्रमोहीम यशस्वी केली होती त्या ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे पुर्ण झाल्यानंतर अमेरीकेच्या नासा संस्थेमार्फत पुन्हा एकदा हि बंद पडलेली चांद्रमोहिम सुरू करण्यात आली आहे ह्या आगामी Artemis चांद्रमोहिमे अंतर्गत 2024 साली तीन अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्यात येणार आहे विषेश म्हणजे त्यात एक महिला अंतराळवीराचा समावेश असून चंद्रावर पहिले पाऊल ठेवण्याचा मान तिला देण्यात येणार आहे
ह्या Artemis मोहिमेची सुरुवात आधी मानवरहित Orion अंतराळयान चंद्रावर पाठवुन करण्यात येणार आहे ह्या Artemis 1 मोहिमेची ऊड्डान टेस्ट आधी नोव्हेंबर आणी नंतर फेब्रुवारीत होणार होती पण काही तांत्रिक अडचण आणी कोरोना निर्बंधामुळे हि टेस्ट लांबली आता मे किंवा जुन मध्ये हि टेस्ट होणार असल्याची माहिती नासा संस्थेतर्फे देण्यात आली आहे सध्या ह्या मोहिमेची जय्यत तयारी सुरू आहे हि मोहिम यशस्वी झाल्यावर भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांचे चंद्रावर जाणेयेणे सुरु होईल आणि चंद्रावर सजीवांना राहण्यायोग्य वातावरणाचा शोध घेणे शक्य होईल
सौरमोहिम आणी मंगळमोहिम ह्या प्रमाणेच नागरिकांना ह्या चांद्रमोहिमेत सहभागी करुन घेण्यासाठी नासा संस्थेने एक अभिनव ऊपक्रम राबविला आहे हौशी नागरिकांना Artemis 1 मोहिमेअंतर्गत Orion अंतराळयानातुन त्यांची नावे चंद्रावर पाठविण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे नासाच्या साईटवर नागरिकांना त्यांच्या नावाची नोंदणी करता येणार आहे एकदा का त्यांच्या नावाची नोंदणी झाली की नासा संस्थेतर्फे त्यांना व्हर्च्युअल बोर्डिंग पास मिळेल आणी ह्या मोहिमेची सखोल माहितीसुद्धा त्यामुळे कितीकाळ त्यांची नावे Orion अंतराळयानासोबत चंद्रावर प्रवास करतील हे कळेल जोपर्यंत Orion यान चंद्राभोवती फिरेल तोपर्यंत नागरिकांची नावेदेखील चंद्रावर प्रवास करतील
Artemis- 1 मोहिमेअंतर्गत Orion अंतराळयान नासाच्या फ्लोरीडा येथील केनेडी स्पेस सेंटर मधील 39B ह्या ऊड्डाणस्थळावरून चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावणार आहे आणी जवळपास तीन आठवडे चंद्राभोवती फिरणार आहे हे ऊड्डाण कधी होते ह्याची ऊत्सुकता नागरिकांना लागली आहे सध्यातरी नासा संस्थेने नागरिकांना त्यांची नावे चंद्रावर पाठविण्याची सुवर्णसंधी जाहीर केली आहे
No comments:
Post a Comment