नासाच्या Space X -Crew 4 अंतराळमोहीमेसाठी निवड झालेल्या अंतराळवीर Jessica Watkins -फोटो -नासा संस्था
नासा संस्थानासा आणी स्पेस X ह्यांच्या स्वयंनिर्मित Space X Crew Dragon मधून अंतराळविरांना अंतराळस्थानकात नेऊन परत आणण्याची मोहीम आता नियमित सुरू झाली आहे आजवर स्पेस X Crew Dragonने अंतराळविरांना तीनवेळा अंतराळस्थानकात पोहोचवले आणी पृथ्वीवर सुरक्षित परत आणले आहे त्यामुळेच आता भविष्यकालीन अंतराळ मोहिमांची पुर्वतयारी सुरु झाली आहे ह्याच मोहिमेअंतर्गत मागच्या महिन्यात स्पेस X च्या मोहीम चार आणी सहा साठी अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे
नासाच्या स्पेस X-4 Crew Dragon साठी Jessica Watkins ह्यांची निवड करण्यात आली आहे त्या ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम पाहतील 2017 मध्ये नासा संस्थेत Jessica ह्यांची अंतराळवीर होण्यासाठी निवड झाली होती Jessica पहिल्यांदाच अंतराळप्रवास करणार आहेत अंतराळवीर Jessica सोबत ह्या मोहिमेत अंतराळवीर Kjell Lindgren ,अंतराळवीर Robert Hines आणी युरोपियन अंतराळवीर Samantha Cristofortti हे तीन अंतराळवीरही स्थानकात जाणार आहेत आणी तेथे सहा महिने राहून तेथील संशोधनात सहभागी होणार आहेत अंतराळवीर Lindgren आणी Hines ह्यांची ह्या मोहिमेत कमांडरपदी आणी पायलटपदी तर अंतराळवीर Samantha ह्यांची स्पेशालिस्टपदी नियुक्ती करण्यात आली आहे
एप्रिल 2022 मध्ये नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील ऊड्डानस्थळावरून Space-X Crew -4 -Dragon आणी Falcon 9 Rocket च्या सहाय्याने हे अंतराळवीर अंतराळात ऊड्डान करतील आणि सहा महिने स्थानकात राहून तेथील संशोधनात सहभागी होतील
Space X- Crew-6 चे अंतराळवीर Stephen Bowen आणि अंतराळवीर Woody Hoburg -फोटो -नासा संस्था
नासाचे Space X-Crew-6 Dragon 2023 मध्ये स्थानकात जाणार असून ह्या मोहिमेसाठी अंतराळवीर Stephen Bowen आणी अंतराळवीर Woody Hoburg ह्यांची निवड झाली आहे ह्या मोहिमेत Stephen Bowen ह्यांची कमांडरपदी आणी Woody Hoburg ह्यांची पायलटपदी नियुक्ती झाली आहे
अंतराळववीर Stephen ह्यांची हि चवथी अंतराळवारी आहे 2008,मध्ये मोहीम STS-126 अंतर्गत 2010मध्ये मोहीम STS- 132 अंतर्गत आणी 2011 मध्ये मोहीम STS-133 अंतर्गत ते अंतराळस्थानकात रहायला गेले होते आणि त्यांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी केलेल्या स्पेसवॉकमध्ये अंतराळात 47 तास15मिनिटे व्यतीत केले आहेत
अंतराळवीर Hoburg ह्यांची 2017 मध्ये नासा संस्थेत निवड झाली होती आणि त्यांची हि पहिलीच अंतराळवारी आहे
No comments:
Post a Comment