अंतराळवीर Bob आणी Douglas स्थानकातील प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानंतर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था-8 जुन
अमेरिकेतील नासा संस्थेच्या Huston येथील सेंटर मधुन Space X Crew Dragon च्या ऐतिहासिक यशस्वी उड्डाणाबद्दल
अंतराळवीर Douglas Hurley आणी Bob Behnken ह्यांच्याशी ABC News आणी NBC News च्या पत्रकारांनी लाईव्ह संवाद साधला त्याचा हा वृत्तांत
ABC news-" Bob & Douglas How are you both ?" तुमचा हा स्पेसमधला पहिला आठवडा कसा गेला?
Bob & Douglas - Pretty Well ! Very Busy ! छान चाललय! आमचा आठवडा बिझी गेला ईथे आल्यावर आम्ही आधी ट्रेडमील वर काम केल,प्लंबीगच काम केल स्थानकतील थोड दुरूस्तीच काम पाहिले आणी आता Chris Classidy सोबत ईथे आम्ही आनंदात आहोत आता इथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागीही झालोय
ABC News-अमेरिकेत सध्या खूप कठीण परिस्थिती आहे! कोरोनाचा वाढता संसर्ग Lock down मुळे सारे व्यवहार ठप्प आहेत आणि आता वांशिक भेदाच्या उद्रेकामुळे उसळलेली दंगल ! अशा परिस्थितीत तुम्ही पृथ्वीवरील लोकांना काय सल्ला द्याल?
Bob- पृथ्वी अनमोल आहे! ती एकमेव आहे! तिचे संरक्षण करण आवश्यक आहे सारे नागरिक समान आहेत इथे अंतराळ स्थानकात वेगवेगळ्या देशाचे अंतराळवीर एकत्र राहतात पृथ्वी संरक्षणासाठी आणी असाध्य रोग निवारणासाठी अनेक ऊपयुक्त अत्याधुनिक संशोधन करतात जे पृथ्वीवर करता येत नाहीत आगामी मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक संशोधन आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अत्याधुनिक प्रयोग देखील ईथे सुरू आहेत आम्ही जसे इथे एकोप्याने राहतो तसेच तुम्ही राहा
ABC News-तुमच्या हातात डायनो दिसतोय तो स्थानकात तरंगताना दिसतोय तो तिथे कुठुन आला त्याबद्दल सांगा?
Bob- आम्ही अंतराळ प्रवासासाठी निघताना शेवटच्या आठवड्यात आमच्या दोघांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र एकत्र आलो होतो तेव्हा मुलांनी आम्हाला स्थानकात जाताना काय भेट द्यायच ह्याचा विचार केला खूप विचार केल्यावर त्यांना हे गिफ्ट सुचल माझ्या मुलाने आम्हाला ते सोबत नेण्याची विनंती केली मग त्यांनी त्याला "Tremor" हे नाव दिल दोघांच्या कुटुंबियांनी आम्हाला त्यांची स्थानकातील निवासादरम्यान आठवण रहावी म्हणून हे गिफ्ट दिल आता ते दोघेही स्थानकात त्यांनी दिलेला डायनो Tremor तरंगताना पाहून Super Exited झाले असतील त्या निमित्याने ते अंतराळ प्रवासाशी जोडले गेले त्यांच्या शाळेतील मित्रांसोबत दोघे हा अनुभव शेअर करतील आपण दिलेला स्थानकातील तरंगणारा डायनो दाखवतील माझ्या पहिल्या अंतराळवारीच्या वेळेस माझा मुलगा जन्मला नव्हता त्या मुळे त्याला माझ्या अंतराळ निवासाविषयी माहिती नव्हती आता मात्र त्याला हे सार पाहून आनंद होईल आमच्या दोघांच्या कुटुंबियांचे पारिवारिक संबंध आहेत त्या मुळे डायनो पाहून दोघांची मुले Super Exited झाली असतील
ABC News- तुमच्या Space X Dragon च्या ऐतिहासिक ऊड्डानाचा अनुभव कसा होता ? त्या बद्दल सांगा आणी तुमचे कुटुंबीय हा लाईव्ह कार्यक्रम पहात असतील विषेशतः तुमच्या पत्नी त्यांना तुम्ही काय सांगाल?
Douglas- Launching चा अनुभव खुपच अविस्मरणीय आणी छान होता नवा होता,आरामदायी होता आणी
आम्ही दोघेही आर्मीत पायलट होतो त्यामुळे कुटुंबीयांपासुन बरेच दिवस दुर होतो त्यामुळे त्यांना दुर रहाण्याची सवय आहे आम्ही त्यांना सांगितले आहे की आम्ही सुरक्षित आहोत सुखरूप पोहोचलो आहोत प्रवासाचा अनुभव आल्हाददायक होता आमची काळजी करु नका आता आम्ही स्थानकात आहोत आमच काम सुरू झालय तुम्हीही तुमची काम करा lock down मुळे सारी कामे ठप्प झाली होती मुलांना त्यांचा अभ्यास आणी ईतर कामे करायला सांगितल आहे
NBC News- (Washington)- Congratulations! Bob & Douglas ! तुमच्या वैशिष्ठपूर्ण उड्डाणाबद्दल !
उड्डाणा दरम्यान आधीचा Shuttle program आणी आताचा Space X Dragon launch ह्यात काही फरक जाणवला का?
Douglas-निश्चितच खूप फरक जाणवला!अपोलो यान मोठ होत Space X Dragon छोट आहे पण ते अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज आहे नासा आणी Space X टिमने अंतराळवीरांना त्रास होऊ नये त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा ह्याचा विचार करून यानाचे डिझाईन केले आहे त्या साठी हे यान बनविणाऱ्या इंजिनीअर्सनी आधीच्या अंतराळ प्रवासात आलेल्या अडचणी कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा यानात बसविली आहे आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने कमी वेळात उत्कृष्ठ काम केलय
Bob - Launching च्या वेळेस यान छोट असल्याने आणी अत्याधुनिक रचनेमुळे Falcon 9 rocket burn होताना वेगळे होताना आम्ही पाहु शकलो आधीची अपोलो यानाच्या वेळेस हि प्रक्रिया अवघड होती,रफ होती पण आता हि प्रक्रिया सुलभ होती यानाच विलगीकरण स्मुथ होत आवाजाची तीव्रता कमी होती शीवाय Space X Dragon मध्ये airflow चांगला असल्याने एकोणीस तासांच्या अंतराळ प्रवासात आम्ही आलटुन,पालटुन काही तास झोप घेऊ शकलो Spacesuits च्या अत्याधुनिक डिझाईन मुळे मोकळ वाटल आणी Dragon स्थानकाजवळ पोहोचल्यावर यानाची स्थानकाशी hatching,docking ची स्वयंचलित यंत्रणा सहजतेने कार्यरत झाल्याने त्रास कमी झाला
NBC News- ह्या ऐतिहासिक उड्डाणानंतर पुन्हा एकदा अमेरिका अंतराळवीरांना अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या अंतराळयानातून अंतराळात पाठविण्यासाठी स्वयंपूर्ण झाली अस तुम्हाला वाटतय का ?
Bob -हो ! नक्कीच ! आता अमेरिकेचा बंद पडलेला shuttle प्रोग्रॅम पुन्हा जोमाने सुरु होईल आणि त्याचा फायदा आगामी अंतराळ मोहिमा आणि अंतराळवीरांना होईल
NBC News - भावी अंतराळवीर आणी अंतराळवीर होऊ ईच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यासाठी काय आवश्यक आहे त्यासाठी अनेक जण ऊत्सुक आहेत, प्रेरित आहेत
ईथे येण्यासाठी आधी सायन्स फिल्डमधल्या कुठल्याही शाखेत graduate असण आवश्यक आहे शिवाय ईथे आधी सांगितल्याप्रमाणे स्थानकात अनेक देशाचे अंतराळवीर एकत्रित राहतात आणी संशोधन करतात त्यामुळे टिमवर्क आवश्यक आहे कठीण परिस्थितीत तग धरून ईथल्या झीरो ग्रव्हीटीत रहाण्याची क्षमता असण आवश्यक आहे आणी आपल ध्येय साध्य करण्याची जिद्द आणी चिकाटी हवी कितीही अडचणी आल्यातरी न डगमगता आपल ध्येय साध्य करायला हव सद्या सगळ्या जगाला करोनान हैराण केलय lock down मुळे सारे व्यवहार ठप्प आहेत शाळा,कॉलेजेस बंद आहेत तरीही ह्या विपरीत परिस्थितीला घाबरून,डगमगुनन जाता ह्या समस्येवर मात करून तुमच ईच्छीत ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करण आवश्यक आहे आम्ही ईथे येण्याआधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर झालेल lock down,Work at home,निवडक कर्मचाऱ्यांची ऊपस्थीती आणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठीचे कडक नियम पाळून शीवाय आम्हाला Quarantine करण्यात आल होत तरीही नासा आणी Space X च्या टिमने मिळुन जिद्दीने सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून हि मोहीम यशस्वी केली आणी ऐतिहासिक launching होऊ शकल तशीच जिद्द तुम्हीही ठेवा
NBC News-स्थानकात दुसऱ्यांदा प्रवेश केल्यावर आपल्या घरी पुन्हा आल्यासारखे वाटले का? काय बदल जाणवला?
हो! निश्चितच!खूप आनंद झाला फरकही जाणवला आता स्थानकही अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज झालय बऱ्याच नवीन सुविधा ऊपलब्ध आहेत त्यामुळे आधी पेक्षा ईथला मुक्काम आरामदायी होईल ह्या आधीही आम्ही स्थानकात राहून गेल्यामुळे ईथल्या झीरो ग्रव्हीटीची आणी ईतर गोष्टीची सवय होती आता Chris सोबत रहायला मिळेल अर्थात कीती दिवस ते सांगता येणार नाही Chris ची आमची जुनी ओळख आहे
NBC News- अमेरिकेतील सध्याच्या परिस्थिती बद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ?
Bob - आधी सांगितल्या प्रमाणे आम्ही स्थानकात जसे सर्व देशांचे अंतराळवीर एकत्रित राहतो ,संशोधन करतो तसेच सर्वांनी एकोप्याने राहावे पृथ्वी अनमोल आहे सर्व सामान आहेत सर्वांनी समजून शांततेत राहावे सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात तर हे अत्यंत आवश्यक आहे देशापुढे अनेक संकटे आणि समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा
No comments:
Post a Comment