अंतराळवीर Bob Behnken आणी Chris Cassidy स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडताना -फोटो - नासा संस्था
नासा संस्था -27 जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy आणि Bob Behnken ह्यांनी स्थानकाच्या दुरुस्तीसाठी 26 जूनला त्यांच्या कार्यकाळातील नियोजित चार स्पेसवॉक पैकी पहिला स्पेसवॉक पूर्ण केला
हे दोनही अंतराळवीर सकाळी 7.32a.m.ला त्यांचा स्पेससूट चार्ज करून स्पेसवॉक साठी स्थानका बाहेर पडले आणि सहा तास सात मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सहा तासांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या solar arrays ह्या भागातील जुन्या जीर्ण झालेल्या बॅटरीज बदलवून नवीन जास्त पॉवरफुल आणि प्रकाश देणाऱ्या बॅटरीज बसविल्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या Solar arrays च्या Starboard trussह्या भागातील जुन्या बॅटरीज बदलल्या ह्या पहिल्या स्पेसवॉक मध्ये अंतराळवीरांनी दोन पॉवर चॅनल्स पैकी एका भागातील काम पूर्ण केले त्यांनी सहा पैकी खराब झालेल्या पाच जुन्या Nickel Hydrogen बॅटरीज काढून त्या जागी नव्या Lithium -ion बॅटरीज बसविल्या आणी त्यांच्या सर्किट साठी आवश्यक असणाऱ्या दोन adapter plates हि फिट केल्या
अंतराळवीर Chris Cassidy आणि Bob Behnken स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
उर्वरित दुसऱ्या भागातील जुन्या खराब झालेल्या बॅटरीज व adapter plates बसविण्यासाठी एक जुलैला दुसरा स्पेसवॉक करण्यात येणार आहे ह्या Lithium -ion बॅटरीज आधीच्या Nickel Hydrogen बॅटरीज पेक्षा जास्त पॉवरफुल आहेत त्या जास्त प्रकाश देतात शिवाय जास्त काळ टिकतात आणि कमी जागा व्यापतात ह्या बॅटरीजचा उपयोग अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅविटीतील लॅब मध्ये होतो अंतराळ स्थानक अंतराळात भ्रमण करताना जेव्हा अंधारात असते तेव्हा उजेड निर्मितीसाठीआणि इतर कामासाठी ह्या बॅटरीचा प्रकाश उपयुक्त ठरतो
ह्या दोन्ही अंतराळवीरांचा त्यांच्या कार्यकाळातील स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा सातवा स्पेसवॉक होता
अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आजवर केलेल्या स्पेसवॉकसाठी 37 तास आणि 21मिनिटे व्यतीत केले तर अंतराळवीर Bob Behnken ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेल्या सात स्पेसवॉक दरम्यान 43तास आणि 40 मिनिटे व्यतीत केले आहेत आणि स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 228 वा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment