Wednesday 10 June 2020

Space X Crew Dragon स्थानकात पोहोचल्यानंतर अंतराळवीरांनी साधला लाईव्ह संवाद


 Expedition 63 Crew
अंतराळ स्थानकात पोहोचल्या नंतर सर्व अंतराळवीरांसोबत अंतराळवीर Douglas आणि Bob फोटो- नासा संस्था
नासा संस्था - 1 जुन
नासाच्या Space X Crew Dragon चे ऐतिहासिक यशस्वी उड्डाण अमेरिकेच्या भूमीवरून झाल्यानंतर एकोणीस तासांनी 31मे ला अंतराळयान Endeavor अंतराळ स्थानकाजवळ पोहोचताच यानातील स्वयंचलित यंत्रणेने hatching आणि docking पार पडले आणि अंतराळवीरांनी स्थानकात सुखरूप प्रवेश केला त्यानंतर लगेचच त्यांचा पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधण्यात आला
नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी Douglas Hurley आणि Bob Behnken ह्या दोन्ही अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला आणी त्यांचे यशस्वी  ऐतिहासिक उड्डाण आणि स्थानकातील docking बद्दल अभिनंदन केले शिवाय त्यांच्या ह्या नव्या Space X Dragon मधील प्रवासाबद्दल जाणून घेतले अंतराळ प्रवास कसा झाला,प्रवासादरम्यान काही त्रास झाला का? Endeavor अंतराळ यानात काही त्रुटी आढळल्या का? त्यांनी ह्या एकोणीस तासाच्या प्रवासात झोप घेतली का? अशी विचारणा केली
अंतराळवीर Douglas आणि Bob ह्यांनी आमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होता हा नवा Endeavor अंतराळयानातील अंतराळ प्रवासाचा अनुभव खूपच छान होता कोणताही त्रास जाणवला नाही अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज असलेले Space X अंतराळ यान आणि त्यातील रचना आरामदायी आहे स्वयंचलित यंत्रणेमुळे
यानाचे आणि Falcon रॉकेटचे प्रक्षेपण वैशिष्ठपूर्ण आणि कमी त्रासदायक होते hatching आणि docking प्रक्रिया सहजतेने झाली ,आम्ही ह्या एकोणीस तासांच्या प्रवासात आलटून पालटून काही तास झोपहि  घेऊ शकलो आम्हाला ह्या यानातून प्रवास करण्याची संधी दिल्यामुळे आम्ही नासा संस्था आणि Space X टीमचे आभारी आहोत असे सांगितले
त्या नंतर Jim Bridenstine ह्यांनी त्यांना  तुम्ही फ्रेश व्हा नंतर लवकरच लाईव्ह पत्रकार परिषद घेण्यात येईल असे सांगत त्यांचा निरोप घेतला
ह्या लाईव्ह संवादाच्या वेळेस Director Mark Geyer ISS Deputy Manager Kenneth Todd आणि अंतराळवीर Kjell  Lindgren उपस्थित होते
त्या नंतर स्थानकात अंतराळवीरांचा Well Come ceremony पार पडला

No comments:

Post a Comment