Perseverance Mars Rover चे निरीक्षण करताना नासा संस्थेतील इंजिनीअर्स -फोटो- नासा संस्था
नासा संस्था -
नासाचे Perseverance मंगळ यान वीस जुलैला मंगळाकडे झेपावणार आहे सध्या ह्या यानाच्या launching ची तयारी अंतिम टप्प्यात आहे कोरोना महामारीच्या संकटातही लोक Perseverance मंगळ यानाच्या launchingची ऊत्सुकतेने वाट पहात आहेत नासा संस्थेतर्फे launch America प्रमाणेच ह्याही वेळेस #Countdown To Mars ह्या मोहिमे अंतर्गत हौशी नागरिकांना त्यांच्या भावना सोशल मीडियावरून व्यक्त करण्याची संधी दिली गेली आणी लोकांनीही ह्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय
नासा प्रमुख Jim Brownstone म्हणतात,"पन्नास वर्षांपूर्वी आम्ही चांद्रमोहिमेची तयारी करत होतो आणी आता आम्ही मंगळभुमीवरील Samples गोळा करण्याची तयारी करतोय जसे आपण आता अपोलो मोहीमेतील अंतराळ वीरांचा गौरव करतो तसेच भविष्यात मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांचा गौरव केल्या जाईल त्यात महिला अंतराळवीरांचाही समावेश असेल Perseveranceचाही असाच गौरव केल्या जाईल"
नुकताच नासा संस्थेतर्फे Perseverance मंगळ यानाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी perseverance टिमचे
Project manager,तंत्रज्ञ,शास्त्रज्ञ व टिममधील संबंधीत कर्मचाऱ्यांशी lock downच्या निर्बंधामुळ सोशल मीडियावरून लाईव्ह संवाद साधण्यात आला
सध्या सारे जग कोरोना महामारीने त्रस्त आहे अमेरिकेत देखील lock down सुरु आहे त्यामुळे कडक निर्बंध पाळुन हि मोहीम राबवण आव्हानात्मक होत पण ह्या प्रोजेक्ट टीममधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला ऊत्तम साथ देत आणी कडक नियमांचे पालन करत खूप मेहनत करून हि मोहीम पुर्णत्वास नेण्यात मदत केली असे Perseveranceचे Project Manager म्हणाले Perseveranceच उड्डाण ऊन्हाळ्यात होणार होत पण कोरोना महामारी मुळे आता विस जुलैला यानाच ऊड्डान करण्यात येेणार आहे पण जर त्या वेळेस हवामान ठिक नसेल किंवा काही अडचण आल्यास तर मात्र ऑगस्ट मध्ये हे ऊड्डान करण्यात येईल सध्या Perseverance नासाच्या Florida येथील Launching Pad वर नेण्यात आले आहे तिथे यानाची अंतीम चाचणी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्य करत आहे
सध्या अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग वाढत चाललाय शास्त्रज्ञ,डॉक्टर्स आणि विविध संस्थेतर्फे कोरोनावर औषध व लस शोधण्याचे काम जोरात सुरु आहे पण अजूनही यश आलेले नाही अशा वेळेस कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस समाजसेवी अहोरात्र आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करत आहेत त्या सर्व करोना वॉरीअर्सचा सन्मान करण्यासाठी ह्या सर्वांची नावे एका सर्पाकृती पातळ aluminumपट्टिवर कोरुन Perseverance यानावर बसविण्यात आली आहे त्यामुळे भविष्यात मंगळावर मानवी वस्ती वसल्यास तेथील लोकांना पृथ्वीवरील कोरोना महामारी आणी कोरोना वॉरीअरची आठवण राहिल
यानावर बसविण्यात आलेली कोरोना वॉरियर्सची नावे कोरलेली पट्टी - फोटो -नासा संस्था
Perseverance यानाचे डिझाईन अत्याधुनिक व नावीन्यपूर्ण आहे आधीच्या मंगळ यानातील त्रुटी दुर करून हे यान बनविण्यात आले आहे ह्या यानातील रोबोटिक आर्म वरील Computers,microphoneआणी Camera हे पुर्वीच्या यानाच्या तुलनेत जास्त powerful आहेत आणी त्यांच्यात मंगळावरील अद्ययावत माहिती अत्यंत कमी वेळेत पृथ्वीवर पाठवण्याची क्षमता आहे त्यासाठी यान अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने युक्त बनविले आहे आणी यानातील यंत्रणा देखील अत्याधुनिक व जास्त कार्यक्षम आहे
ह्या मोहिमेत आधीच्या मंगळमोहिमे प्रमाणेच मंगळावरील लोप पावलेल्या पुरातन सजीव सृष्ठिच्या अस्तित्वाचे पुरावे शोधण्यात येणार आहेत Perseverance यान मंगळावरील Jezero Crater ह्या भुपृष्ठावर ऊतरणार आहे आणी तेथील भुभागातील व भूगर्भातील माती,दगड,केमिकल,वायू व सजीव सृष्ठिच्या लोप पावलेल्या ऐतिहासिक खाणा खुणा आणी त्याला दुजोरा देणारे Biologicalअवशेष (Fossils) शोधून त्यांचे फोटो नमुने आणी सखोल संशोधीत माहिती पृथ्वीवर त्वरित पाठवली जाणार आहे ह्यासाठी रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करण्यात येणार आहे
Perseverance यानाच्या सहाय्याने मंगळाच्या भूमीवरील सजीवांच्या अस्तित्वाला पृष्ठि देणारे पुरावे पुर्वी संशोधीत केलेल्या दऱ्या खोरे,पर्वत व नदिकिनाऱ्यावरील आटलेल्या पाण्याच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारे स्त्रोत,त्यांच्या कडा ह्यांचे फोटो व नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर पाठविण्यात येणार आहेत शिवाय नदिकाठची चिखलयुक्त माती,दगड,गोटे वाळु ,धुळ आणी मंगळावरील प्राचंड,वादळ,वारा ,ऊन ह्यामुळे तयार झालेले झीजलेले दगड,त्यांचा चुरा ह्यांचे नमुनेही गोळा करण्यात येणार आहेत
ह्याचा ऊपयोग आगामी मानवसहीत मंगळमोहिमेत होईल शीवाय आगामी मंगळ मोहीमेतील मानवी वस्तीच्या निवासासाठी साठी
अनुकल वातावरण असणारी जागाही ह्या मोहिमेत शोधण्यात येणार आहे ह्यासाठी ह्या यानासोबत Ingenuity नावाचे helicopter ही पाठवण्यात येणार असून जीथे Perseverance यान जाऊ शकत नाही तीथे ऊड्डान करुन हे helicopter मानवी वस्ती निवासासाठी पोषक वातावरण असणारी जागा शोधेल व प्रतिकूल परिस्थितीत सुरक्षित स्थळी ऊड्डान करून तेथील माहिती व फोटो पृथ्वीवर त्वरित पाठवेल त्यासाठी ह्या helicopter मध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे प्रथमच परग्रहावर यानासोबत helicopter पाठविण्यात येणार असून त्याचीही चाचणी पूर्ण झाली आहे ह्या helicopter च्या सहाय्याने तेथील भौगोलिक माहिती मिळेल व तेथील वातावरण आणी हवामानातील बदल नोंदवले जातील
यानाच्या Parachute चे डिझाइन पण वैशिष्ट्यपूर्ण व तेथील वातावरणाचा विचार करुन बनविण्यात आले आहे
No comments:
Post a Comment