Sunday 24 June 2018

अंतराळ वीरांगना Peggy Whitson नासा संस्थेतून निवृत्त


Peggy Whitson
     रेकॉर्ड ब्रेकर Astronaut Peggy Whitson अंतराळ स्थानकातील निवासादरम्यान -फोटो -नासा संस्था

नासा संस्था 15 जुन
नासाच्या अंतराळ मोहीम 50/51ची अंतराळवीरांगना व रेकॉर्डब्रेकर Peggy Whitson नासा संस्थेतून नुकतीच  निवृत्त झाली
 Iowa येथील Beaconsfield इथल्या Peggy Whitson ह्यांचं प्रथम  1986 मध्ये नासा संस्थेत सिलेक्शन झाल तेव्हा पासून आतापर्यंत संस्थेतील वेगवेगळी पदे भूषवत कार्यकुशलतेने संशोधन करून त्यांनी संस्थेचे नाव उज्वल केले
नासाचे सध्याचे Administrator Jim Bridenstine ह्यांनी Peggy Whitson ह्यांच्या सायन्स संशोधनातील अतुलनीय कामगिरी बद्दल त्यांचे संस्थेतर्फे आभार मानले Peggy ह्यांनी अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी मधील प्रतिकूल आणि कठीण अवस्थेत दीर्घकाळ वास्तव्य करून जास्त दिवस राहण्याचा विक्रम प्रस्थापित करत वयाच्या ह्या टप्प्यावर स्पेसवॉक करण्याच कठीण आव्हान यशस्वीपणे  पेलत हे यश मिळवले आहे त्यांची जिद्द ,चिकाटी आणि अंतराळ स्थानकातील संकटांना न घाबरता आलेल्या बिकट प्रसंगांना धैर्याने सामोरे नाण्याची निर्भीड वृत्ती अतुलनीय आहे Peggy ह्यांनी त्यांचा अंतराळस्थानकातील मुक्काम वाढवून संशोधन केले त्यांच मानसिक धैर्य देखील वाखाणण्याजोग आहे त्या नासा संस्थेसाठी आणि अमेरिकेसाठी रोल मॉडेल आहे असेही ते म्हणाले
त्यांनी अंतराळस्थानकातील झिरोग्रॅविटी मध्ये स्थानकातील चेंबर मध्ये नव्या जातीच्या कोबीची यशस्वी लागवड केली शिवाय तिथल्या झिनिया आणि लेट्युसच्या रोपांचीही निगा राखली त्यांनी इतरही अनेक सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवून यशस्वी संशोधन केले त्यांचा नासा संस्थेला अभिमान वाटतोय संस्था त्यांची आभारी आहे संस्थेला निश्चितच Peggy ह्यांची सतत आठवण येईल व त्यांची उणीवही भासेल असे गौरौवोद्गारही त्यांनी काढले नासा संस्थेतील इतर शास्त्रज्ञांनीहि Peggy ह्यांचे कौतुक केले
2002 मध्ये पहिल्यांदा Peggy ह्यांनी अंतराळवारी केली आणि तिथल्या वास्तव्यात तिथे सुरु असलेल्या तब्बल एकवीस सायंटिफिक प्रयोगात सहभाग नोंदवत संशोधन केले आणि अंतराळस्थानकातील पहिली महिला सायन्स ऑफिसर होण्याचा बहुमान मिळवला
2008साली Peggy दुसऱ्यांदा अंतराळ स्थानकात वास्तव्यास गेल्या आणि पहिली महिला कमांडर होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि आताच्या अंतराळ मोहीम 50-51-52च्या 2016 च्या अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांनी दुसऱ्यांदा स्थानकाच्या कमांडरपदाचा मान मिळवला
ह्याच मोहिमेदरम्यान अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी त्यांनी जास्तवेळ स्पेसवॉक करून आजवरचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि जास्तवेळ सस्पेसवॉक करणारी पहिली महिला astronaut होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला
त्यांच्या आजवरच्या मोहिमेतील त्यांनी दहावेळा केलेल्या स्पेसवॉक साठी त्यांनी 60 तास आणि 21 मिनिटे व्यतीत केली आणि त्यांनी अंतराळ स्थानकात 665दिवस वास्तव्य करून तिथल्या संशोधनात सहभाग नोंदवला
Peggy ह्यांनी ह्या मोहिमेदरम्यान त्यांचा अंतराळस्थानकातील मुक्कामही वाढवुन घेतला होता आणि असे पहिल्यांदाच झाल्यामुळे त्यांनी अंतराळस्थानकात जास्तकाळ राहून संशोधन करणाऱ्या अंतराळवीरांच्या यादीत पहिल्या महिला Astronaut होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला
Peggy Whitson ह्यांचे पृथ्वीवरील नासा संस्थेतील कामही प्रशंसनीय होते 2009-2012 ह्या काळात अंतराळवीरांच्या टीमचे नेतृत्व Peggy ह्यांनी यशस्वीपणे केले होते आणि प्रथमच नासा संस्थेत मिलिटरी मध्ये नसलेल्या महिला Astronaut ची निवड अंतराळवीरांच्या टीमसाठी झाली होती तोवर फक्त मिलिटरी मध्ये असलेल्या अंतराळवीरांनाच निवडले जात होते
Peggy Whitson ह्यांचे classmate आणि Friend, Pat Forrester म्हणतात की ,ते Peggyला मिस करतील आणि
सोबतच तीच रेकॉर्डब्रेक यशस्वी करिअर सुद्धा पण तिची अतुलनीय कामगिरी आणि स्फुरणीय यश मात्र तिची नेहेमी आठवण देईल


No comments:

Post a Comment