Sunday 3 June 2018

नासाच्या मोहीम 55चे तीन अंतराळवीरआज पृथ्वीवर परतणार



https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/soyuz_launch_-_landing.jpg


 नासा संस्था -29 मे
नासाच्या अंतराळमोहीम 55चे अंतराळवीर त्यांचा अंतराळ स्थानकातील कार्यकाळ आटोपून तीन जूनला (आज ) पृथ्वीवर परतणार आहेत त्यांच्या पृथ्वीवर परतीच्या प्रवासाचे लाईव्ह प्रसारण नासा टीवी वरून करण्यात येणार आहे
पृथ्वीवर परतण्याच्या आधी शुक्रवारी अंतराळवीरांनी त्यांचा नेहमीचा Command Ceremony चा कार्यक्रम पार पाडला

Expedition 55 Crew Portrait
          मोहीम 55चे अंतराळवीर अंतराळ स्थानकातील Commond Ceremony च्या कार्यक्रमादरम्यान
          फोटो -नासा संस्था
सध्याचे अंतराळ स्थानकाचे कमांडर Anton Shkaplerov ह्यांनी त्यांच्या कमांडर पदाची जवाबदारी आता
अंतराळ मोहीम 56 चे अंतराळवीर Drew Feustel ह्यांच्याकडे सोपवली आहे
नासाचे Flight engineer Scott Tingle ,अंतराळवीर Shkaplerov व जपानचे अंतराळवीर Norishinge Kanai हे तीनही अंतराळवीर सोयूझ MS-07 ह्या अंतराळयानातून पृथ्वीवर परतणार आहेत
ह्या तीनही अंतराळवीरांनी 168 दिवस अंतराळस्थानकात राहून त्यांचे संशोधन पूर्ण केले असून त्या दरम्यान अंतराळ स्थानकातुन त्यांनी पृथ्वी भोवती 2,688 वेळा भ्रमण केले आणि 71.2 मिलियन मैलाचा प्रवास पूर्ण केला आहे
हे तीनही अंतराळवीर अंतराळस्थानकातून अंतराळयानाने प्रथम काझाकस्थान येथे पोहोचतील
नंतर helicopter ने कझाकस्थान येथील Karaganda येथे पोहोचतील तेथे त्यांची आवश्यक शारीरिक तपासणी होईल
अंतराळवीर Scott tingle व अंतराळवीर Kanai नासाच्या विमानाने Houston येथे जातील
अंतराळवीर Shakaplerov हे दुसऱ्या विमानातून रशियातील Star City येथील त्यांच्या घरी परततील
सहा तारखेला नासाचे नवीन तीन अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे प्रयाण करतील तोवर अंतराळ मोहीम 56चे अंतराळवीर Feustel ,Ricky Arnold आणि Oleg Artemyev हे अंतराळ स्थानकात राहून त्यांचे संशोधन सुरु ठेवतील

No comments:

Post a Comment