नासा संस्थेच्या लॅब मधील ग्रोथचेम्बर मध्ये रोपे संशोधित करताना विध्यार्थी -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -29 जुन
Space X C.R.S-15ह्या कार्गो शिप मधून अंतराळस्थानकात पाठवण्यात आलेल्या उपयुक्त सामाना सोबतच अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी संशोधित केलेल्या नव्या रोपांचा सामावेश करण्यात आला आहे
अंतराळ स्थानकातील veggie ग्रोथ चेंबर मध्ये लावण्यासाठी निवडलेल्या चार रोपांपैकी दोन रोपे अमेरिकेतील उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संशोधित केलेली आहेत
नासा संस्थेच्या veggie प्रोजेक्ट अंतर्गत केलेल्या नव्या रोपांच्या संशोधनात ह्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता अंतराळ स्थानकात सध्या veggie प्रोजेक्ट अंतर्गत विविध प्रकारची संशोधित रोपे लावून त्याची जोपासना करण्यात येत आहे स्थानकातील ह्या कृत्रिम बागेतील उशी वाफाऱ्यात सध्या अठरा प्रकारची रोपे लावण्यात आली असून त्यांना LED लाईट द्वारे कृत्रिम रंगीत प्रकाश यंत्रणा पुरवण्यात येत आहे शिवाय आवश्यकतेनुसार पाणी देण्यासाठी water system ही बसवण्यात आली आहे तिथले वातावरणही रोपांच्या वाढीसाठी अनुकूल ठेवण्यात आलेय
नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथील ग्रोथ चेंबर मधली Extra Dwarf Pak Choy आणि Wassabi ची रोपे
फोटो -नासा संस्था
आता नासा संस्थेतील संशोधकांनी संशोधित केलेली चार नवीन रोपे स्थानकातील कृत्रिम बागेत लावण्यासाठी कार्गोशिप मधून पाठवण्यात आली आहेत ह्या चार नवीन रोपांमधली Dragoon Lettuce आणि Extra Drawf Pak choi हि दोन रोपे विद्यार्थ्यांनी संशोधित केली आहेत नवीन संशोधित Red Russian Kale आणि Wasabi Mustard ह्या शास्त्रज्ञांनी संशोधित केलेल्या रोपांबरोबरच Red Romain Lettuce चे रोपही पाठवण्यात आले आहे
ह्या आधी अंतराळ स्थानकात lettuce ची अंतराळवीरांनी यशस्वी लागवड करून त्याची जेवणात चवही चाखली आहे
नासा संस्थेच्या veggie प्रोजेक्टचे प्रमुख संशोधक Trent Smith म्हणतात ,अंतराळ स्थानकातील निवासादरम्यान अंतराळवीरांना ताजे व पोषक व डायेटयुक्त भोजन मिळावे त्यांचे आरोग्य निरोगी राहावे ह्या उद्देशाने हि रोपे स्थानकातील veggie ग्रोथ चेंबर मध्ये वाढवण्यात येतात
ह्या veggie प्रोजेक्टला आता चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे ह्या प्रोजेक्टचा आम्हाला दुहेरी फायदा झाला एकतर शास्त्रज्ञांना अंतराळस्थानकातील झिरो ग्रॅव्हिटीमध्ये वाढणाऱ्या रोपांवर उगवणाऱ्या धान्य व भाज्यांवर संशोधन करण्याची संधी मिळाली आणि अंतराळवीरांना स्थानकातील निवासादरम्यानच्या जेवणासाठी ताजी भाजी मिळाली कारण अंतराळवीरांना स्थानकात पृथ्वीवरून येणाऱ्या अन्नावर विसंबून राहावे लागते
V.E.G.-03,G,h1 हा नवा veggie प्रोजेक्ट आधीच्या प्रोजेक्टच्या तुलनेत युनिक आहे ह्या नव्या संशोधित रोपामधून अंतराळवीरांना जीवनसत्व B,Cव Potassium मिळणार आहे आणि ते अंतराळवीरांच्या पोषक आहारासाठी आवश्यक आहे कारण त्यांना देण्यात येणारे अन्न प्रिझर्व व प्रोसेस केलेले असल्याने त्यातील जीवनसत्व कमी होते आता त्यांना पोषक व ताजा आहार मिळाल्याने ते निरोगी आणि फिट राहतील शिवाय ह्या veggie प्रोजेक्टचा फायदा आगामी अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांना होईल त्यांना त्यांचे अन्न स्वत: पिकवता येईल
ह्या veggie project च्या संशोधनात नासा संस्थेसोबतच उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती ह्याचा लाभ घेत अमेरिकेतील फ्लोरिडा येथील Fairchild Botanic Garden ह्या मियामीतल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ह्या विध्यार्थ्यांच्या संशोधनाबद्दल बोलताना ह्या प्रोजेक्टचे मुख्य संशोधक म्हणाले ,ह्या विद्यार्थ्याची चिकाटी वाखाणण्याजोगी होती त्यांनी चिकाटीने आणि उत्साहाने ह्या संशोधनात भाग घेतला आणि न थकता स्थानकातील veggie ग्रोथ चेंबर ची माहिती मिळवली आणि त्या प्रमाणे वातावरण निर्मिती करून प्रकाश व पाण्याचे योग्य नियोजन करून नवीन रोपे संशोधित केली त्यांची चिकाटी आणि जिद्द पाहून त्यांच्यात शास्त्रज्ञ होण्याचे गुण आहेत असे वाटते
No comments:
Post a Comment