नासाचे Curiosity Mars Rover मंगळाच्या पृष्ठभागावरील खोदलेल्या खडकाळ भागात कार्यरत -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -8 जुन
गेल्या सहा वर्षांपासून मंगळावर कार्यरत असलेल्या नासाच्या Curiosity Rover ह्या अंतराळ यानाने अत्यंत उपयुक्त माहिती पाठवली असून मंगळावर पूर्वी सजीव सृष्टी अस्तित्वात होती ह्या शक्यतेला पुन्हा दुजोरा मिळाल्याची माहिती नासा संस्थेने प्रसारित केली आहे
Curiosity Rover यान 2012 साली मंगळावर गेले होते गेल्या सहा वर्षांपासून हे यान त्याच्या अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने तिथली उपयुक्त माहिती गोळा करून त्याचे फोटो निर्विघ्नपणे पृथ्वीवर पाठवत आहे
आता Curiosity rover ने मंगळावरील खडकांमधले तीन अरब वर्षे जुने organic अवशेष शोधले आहेत
मंगळावरील Gale Crater ह्या भागातील खडकाळ भाग रोव्हरच्या रोबोटिक आर्मच्या साहाय्याने खोदल्यानंतर हे अवशेष सापडले आहेत ह्या भागात पूर्वी नदी वाहात असल्याचे पुरावे ह्या आधीच सापडले आहेत कालांतराने तिथले वातावरण बदलले आणि पाण्याचे स्रोत आटले असावेत ह्याचा पुरावा तिथल्या sedimentary दगडांच्या अस्तित्वाने मिळाला होता हे खडक नदीतून वाहात आलेल्या किंवा साचलेल्या गाळाने तयार होतात
ह्याच sedimentary खडकांमध्ये खोदल्यानंतर अवघ्या पाच सेंटीमीटर अंतरावर सापडलेल्या ऑरगॅनिक अवशेषांमध्ये सजीवांचा अस्तित्वासाठी आवश्यक असलेले Carbon ,Hydrogen,Oxygen,Nitrogen ह्या वायूचे अस्तित्व सापडले असून त्या मुळेच तिथे मानवी जीवन अस्तित्वात असल्याची शक्यता आहे कारण मानवाच्या अस्तित्वातूनच हे वायू वातावरणात पसरतात आणि त्याच्यासाठी ते अत्यंत आवश्यकही असतात हे अवशेष तीन अरब वर्षांपूर्वीचे आहेत म्हणजेच त्याच काळात तिथे सजीव सृष्टी अस्तित्वात होती
असे असले तरीही आताच त्या बद्दल ठामपणे सांगता येत नाही कारण हे ऑरगॅनिक अवशेष कदाचित तिथे झालेल्या उल्कापाताच्या टकरीमुळे किंवा अन्य कारणांनी पृथ्वीवरून तिथे गेले असण्याचीही शक्यता आहे त्या मुळे आता शास्त्रज्ञ ह्या माहितीचा सखोल अभ्यास व संशोधन करून तिथे सजीव सृष्टी अस्तित्वात होती हे सिद्ध करतीलच
पण ह्या ऑरगॅनिक अवशेषाच्या सापडण्याने तिथे नक्कीच सजीवसृष्टी अस्तित्वात होती असे शास्त्रज्ञांना वाटते त्या मुळेच Curiosity Rover ने पाठविलेल्या ह्या अत्याधुनिक संशोधित उपयुक्त माहितीमुळे शास्त्रज्ञ आनंदित झाले आहेत
No comments:
Post a Comment