Sunday 10 June 2018

अंतराळ मोहीम 56-57ची अंतराळवीरांगना Serena Aunon दोन अंतराळवीरांसोबत अंतराळस्थानकात दाखल

Expedition 56 Crew Greeting
 अंतराळ स्थानकातुन संवाद साधताना अंतराळवीर  Sergey  अंतराळवीर Alexanderआणि SerenaAunon
 फोटो -नासा संस्था

नासा संस्था -8 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 56-57 अंतर्गत नवे तीन Crew Member अंतराळ स्थानकात राहायला गेले असून त्यात एका अंतराळवीरांगनेचा समावेश समावेश आहे
बुधवारी सहा जूनला कझाकस्थानातील बैकानूर येथून MS-09 ह्या सोयूझ अंतराळ यानातून नासाच्या अंतराळ मोहीम 56 ची नासाची अंतराळवीरांगना Serena Aunon ,Esa चे अंतराळवीर Alexander Grest आणि रशियाचे अंतराळवीर Sergey Prokopyev अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले आणि दोन दिवसांनी शुक्रवारी अंतराळ स्थानकात पोहोचले
सोयूझ MS-09 हे अंतराळयान 11.17a.m.ला अंतराळ स्थानकाशी जोडले गेले तेव्हा अंतराळस्थानकात सध्या
राहात असलेल्या Drew ,Ricky आणि Oleg ह्या अंतराळवीरांनी त्यांच स्थानकात स्वागत केले
ह्या अंतराळवीरांच्या स्थानकातील प्रवेशाचा क्षण नासा संस्थेतर्फे त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्यात आला शिवाय
ह्या अंतराळवीरांशी संवाद साधण्याची संधीही देण्यात आली
सुरवातीला नासा संस्थेच्या प्रमुखांनी त्यांची विचारपूस करत ते सुखरूप पोहोचल्याबद्दल त्यांच अभिनंदन केल
सर्वांच्या कुटुंबीयांनी त्यांच अभिनंदन करत त्यांना अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचल्या बद्दल आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या स्थानकातील निवासासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या
तुम्ही आनंदी आणि छान फ्रेश दिसत आहात! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो! अस साऱ्यांनी सांगितलं
Serena ही अंतराळवीरांगना अंतराळ स्थानकात  प्रत्यक्ष पोहोचलेली पाहताना तिच्या कुटुंबियांचा मित्रमैत्रिणींचा  आनंद अनावर झाल्याच सांगत तू Crew च्या ड्रेस मध्ये fantastic दिसतेस! तुझा आम्हाला अभिमान वाटतोय! तू अखेर स्थानकात पोहोचलीसच ! खरंच आजचा दिवस ऑसम आहे ! ,AmezingTime आहे हा ! अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर तिच्या एका नातेवाईकांनी तिला स्थानकात तुझा पोनीटेल हवेत वर उडतोय तुझी body सोडून जातोय! असे सांगत तू तुझे केस मोकळे सोड ते किती उंच उडतात ते दाखव म्हणताच सेरेनाने तसे करूनही  दाखवले
सेरेना अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जाणारी 61वी महिला असून नासा संस्थेत 2009 साली तिची निवड झाली होती आणि आता नऊ वर्षांनीं कठीण ट्रेनिंग नंतर ती अंतराळ स्थानकात राहायला गेली आहे
शेवटी साऱयांनीच आम्ही तुम्हाला मिस करू म्हणत त्यांना शुभेच्छा देत त्यांचा निरोप घेतला
हे अंतराळवीर पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील व डिसेंबर मध्ये पृथ्वीवर परततील


No comments:

Post a Comment