Sunday 10 June 2018

अंतराळवीर Scott Tingle, Norishige आणि Anton पृथ्वीवर सुखरूप पोहोचले



https://www.nasa.gov/sites/default/files/thumbnails/image/18-047d.jpg
 अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीर  Scott Tingle ,अंतराळवीर Antonआणि अंतराळवीर Kanai-फोटो -नासा संस्था

नासा संस्था -3 जून
नासाच्या अंतराळ मोहीम 55चे अंतराळवीर Scott Tingle, जपानचे अंतराळवीर Norishige kanai आणि रशियाचे अंतराळवीर Anton Shkaplerov तीन जूनला अंतराळस्थानकातील 168 दिवसांचा मुक्काम आटोपून पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत त्यांचे अंतराळयान कझाकस्थानातील Dzhenkazgan येथे 8.39 a.m. ला पोहोचले अंतराळवीर Scott Tingle ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी होती तर Anton ह्यांची हि तिसरी अंतराळवारी होती त्यांनी त्यांच्या तीन अंतराळ यात्रेदरम्यान अंतराळ स्थानकात 532 दिवस निवास केला आहे
ह्या तिन्ही अंतराळ वीरांनी अंतराळ स्थानकात राहून तिथे सुरु असलेल्या शेकडो प्रयोगात सहभाग नोंदवला
विशेषतः त्यांनी अंतराळ स्थानकातील झिरो ग्रॅव्हिटी चा मानवी शरीरावर,bone marrow वर होणाऱ्या परिणामावर संशोधन केले तसेच मटेरिअल टेस्टिंग आणि अंतराळ स्थानकातील वातावरणात रोपांची लागवड करून त्यांची वाढ व इतर परिणामांचे सखोल निरीक्षण नोंदवून संशोधन केले
त्यांच्या अंतराळस्थानकातील वास्तव्या दरम्यान त्यांनी पृथ्वीवरून स्थानकात पोहोचलेल्या कार्गो स्पेस क्राफ्टचे स्वागत केले ह्या स्पेस क्राफ्ट मधून अंतराळ स्थानकासाठीचे आवश्यक सामान ,इंधन ,संशोधनाचे सामान व अन्न पाठवण्यात आले होते
अंतराळवीर Scott Tingle आणि अंतराळवीर Kanai ह्यांनी अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला अंतराळवीर Anton ह्यांनीही फेब्रुवारीत स्पेसवॉक करून सर्वात जास्तवेळ स्पेसवॉक करण्याचा रेकॉर्ड स्थापित केला

No comments:

Post a Comment