नासाचे पार्कर सोलर प्रोब हे सौर यान - फोटो -नासा संस्था
नासा संस्था -23 मे
नासाचे पार्कर सोलर प्रोब हे सौरयान 31जुलै 2018ला नासाच्या फ्लोरिडा येथील स्पेस सेंटर येथून सूर्याकडे झेपावणार आहे पण त्या आधीच त्याची तयारी पूर्ण होत आलीय हे सौर यान प्रथमच सूर्याच्या जवळ जाणार आहे आजवर एकही यान सूर्यापर्यंत गेलेले नाही
इतक्या दूरवरून सूर्याच्या प्रचंड उष्णतेने पृथ्वीवासी हैराण होतात आणि तप्त तळपत्या सूर्याकडे मानव क्षणभरही पाहू शकत नाही अशावेळेस तिथे सौरयान पाठवून त्याची माहिती मिळवण्याची कल्पनाच किती अचाटआणि अविश्वनीय पण आजच्या ह्या शास्त्रज्ञांच्या युगात काहीच अशक्य नाहीय
हे पार्कर सोलर प्रोब आपल्या सोबत 11लाखांच्याही पेक्षा जास्त लोकांची नावेही सूर्यावर पोहोचवणार आहे
पार्कर सोलर प्रोबचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ निकोल फॉक्स म्हणतात हे अत्यंत कठीण अभियान आहे पण ह्या मुळे आपल्याला सूर्यावरील वातावरणा सोबतच आपल्या ग्रहमालेतील जवळच्या ग्रहांचीही माहिती मिळेल
हे पार्कर सौर यान त्याच्या सातवर्षांच्या कार्यकाळात चोवीस वेळा सौरवातावरणा जवळून फेऱ्या मारेल आजवर एकही सौर यान सूर्याच्या इतक्या जवळ गेले नव्हते पण पार्कर यान हे कठीण काम यशस्वी करेल अशी आशा आम्हाला वाटते
ह्या सौरयानात अत्याधुनिक सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट असून त्यात शिकागो युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ Eugene Parker ह्यांचा फोटो व त्यांनी लावलेल्या शोधाच्या माहितीची प्रतही पाठवण्यात येणार आहे त्यांनीच प्रथम सौर वादळवाऱ्याचा (solar wind ) शोध लावलाआणि त्यांचेच नाव ह्या यानाला देण्यात आले आहे विशेष म्हणजे प्रथमच जिवंत माणसाचे नाव ह्या सौर यानाला देण्यात आलेय
Eugene N Parkerह्यांच्या शोधाची माहिती installed केलेली Chip दाखवताना - फोटो -नासा संस्था
हे सोलर यान सूर्याच्या कक्षेत प्रवेश केल्या नंतर त्याच्या कार्यकाळात चोवीस वेळा सूर्याच्या वातावरणाजवळून फेऱ्या मारेल आणि तेथील वातावरणाचे निरीक्षण नोंदवून ती माहिती पृथ्वीवर पाठवेल त्या मुळे सूर्यावरील वादळी स्फोटाची माहिती मिळेल शिवाय त्याचा सॅटलाईट,अंतराळयात्री व मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामाचीही माहिती जाणून घेता येईल
मार्च महिन्यात ह्या अभियाना अंतर्गत इच्छुक व हौशी लोकांना सूर्यावर आपले नाव पाठवण्याची संधी देण्यात आली होती आणि लोकांनीही ह्या अभीयानाला उत्स्फूर्त प्रितिसाद देत ह्या संधीचा लाभ घेतला अकरा लाखांच्याही पेक्षा जास्त नावे नासा संस्थेकडे पाठवली होती
आता 18 मेला ह्या लोकांची नावे मेमरी कार्ड मध्ये संग्रहित करून यानात लावली आहेत आणि लवकरच पार्कर सोलर प्रोब आपल्या सोबत हि नावेही सूर्यावर पोहोचवण्यासाठी आणि सौर प्रवासासाठी सज्ज झाले आहे
No comments:
Post a Comment