Peggy Whitson Shane Kimbrough स्थानकातून Super bowl LI football सामन्याला पाठिंबा देताना
फोटो -नासा संस्था
नासा संस्था 1 feb.
अमेरिकेतील Houston शहरात सध्या Super bowl LI football चे व्यावसायिक सामने सुरु आहेत
28 जानेवारीला सुरु झालेले हे सामने 5 फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहेत ते पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉल प्रेमी अमेरिकेत जमले आहेत ह्या super bowl च्या फुटबॉल सामन्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात नासा संस्थाही सहभागी झाली आहे
ह्याचाच एक भाग म्हणून नासा संस्थेने शास्त्रज्ञ व पत्रकारांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते
ह्या कार्यक्रमाद्वारे त्यांनी अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांशी फोन वरून संपर्क साधून त्यांचे बोलणे ऐकण्याची संधी शास्त्रज्ञ व पत्रकारांना दिली
नासाच्या अंतराळ मोहीम 50 ची flight engineer Peggy Whiston व Commandar Shane kimbrough ह्यांनी Houston येथील नासाच्या Johnson Space center मधील अधिकाऱयांशी फोन वरून संपर्क साधला व स्थानकात दोघांनी फुटबॉल खेळून ह्या सामन्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होत खेळाडूंना पाठिंबा दिला
अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत मानवी आरोग्यविषयक,सायन्स विषयी व आगामी अंतराळ मोहिमेतील मानवी निवासासाठी आवश्यक असलेले वेगवेगळे संशोधन संशोधक सतत करत आहेत
सध्या संशोधक Multi-Omics study हा मानवी आरोग्याच्या प्रतिकार शक्तीशी निगडित प्रयोग करण्यात गुंतले आहेत हे संशोधन मार्च 2015 मध्ये सुरु झाले मानवाची पचन संस्था व आतड्यातील सूक्ष्म जंतू ह्यावर तेथील वातावरणाचा काय परिणाम होतो? हे अभ्यासण्यासाठी काही बायॉलॉजिकल samples गोळा करून त्यांचे निरीक्षण नोंदवल्या जातेय
नासाचे संशोधक व अभियंते अंतराळस्थानकाचा उपयोग करून अंतराळातील काही नमुने गोळा करून ते पृथ्वीवर सुरक्षितपणे आणण्यासाठी व पृथ्वीच्या कक्षेतील कचरा हटवून नष्ट करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहेत त्या साठी अंतराळ वीरांनी स्थानकात छोटे spheres तयार केले आहेत व हे spheres वापरून अंतराळातील वस्तू पकडून आत घेण्याचा प्रयत्न केल्या जात आहे त्या साठी खास software बनवून computer models द्वारे अंतराळातील कचरा कसा नष्ठ करता येईल ?ह्यावर विशेष संशोधन करण्यात येत आहे
2030 पर्यंत मंगळावर मानवासहित मंगळयान पाठवणे हे नासा संस्थेचे ध्येय असून त्या दृष्ठीने शास्त्रज्ञाचे प्रयत्न सुरु आहेत 2018 मध्ये Orion space craft मंगळावर जाण्यासाठी आता सज्ज झाले आहे त्या मुळेच मानव अंतराळात महिनोन्महिने किंवा वर्षेसुद्धा तिथल्या वातावरणात तग धरून राहू शकेल असे प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत अंतराळ स्थानकातील मानवी निवास व संशोधनांमुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने आगामी मानवासहित मंगळ मोहिम यशस्वी होईल अशी आशा आता त्यांना वाटतेय
No comments:
Post a Comment