Wednesday 15 February 2017

नासाच्या Peggy Whitson ने वाढदिवशी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

 
                 PeggyWhitson विध्यार्थ्यांना स्थानकातील फूड पॅकेट दाखवताना  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 feb.
नासाच्या अंतराळ वीरांगना Peggy Whitson ह्यांनी 9 febला त्यांच्या वाढदिवशी (9 feb1960 ही पेगी ह्यांची जन्मतारीख ) टेक्सास येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि विध्यार्थ्यांच्या बालसुलभ औसुक्यपूर्ण प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली विद्यार्थ्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाहि दिल्या
Peggy ला लहानपणापासूनच Astronaut  व्हायच होत का?  पुढच्या जन्मीही पुन्हा त्यांना Astronaut  व्ह्यायला आवडेल का? त्या साठी त्यांनी काय तयारी केली घरच्यांचा पाठिंबा होता का ?  महिला Astronaut  म्हणून काय समस्या येतात ? संघर्ष करावा लागतो का ? आतापर्यंतचा आव्हानात्मक प्रसंग कोणता ? तुम्ही गरम अन्न खाता की सगळं पॅकेट मधूनच खाता ? पाणी कसे पिता ? झिरो ग्रॅव्हिटी मधला आवडता प्रयोग कोणता ? अंतराळ स्थानकात राहताना आणि पृथ्वीभोवती फिरताना तुम्हाला काही अजब वस्तू  आढळली का?  तुम्ही सगळे कसे राहता ?
ह्या सारखे अनेक प्रश्न विचारले तेव्हा Peggy ह्यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत काही वेळेस प्रात्यक्षिकहि करून दाखवले
Peggy एका शेतकरी कुटुंबात वाढली त्यांचे आई,वडील शेती करत Peggy चवथीत असताना मानवाने चंद्रावर पाहिल पाऊल ठेवल ती बातमी पाहून त्यांच्या मनात आपण Astronaut  व्हाव अशी इच्छा निर्माण झाली पण तेव्हा तो विचार तितकासा पक्का नव्हता पण  त्यांच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योगायोगाने नासा मध्ये महिला Astronaut साठी सिलेक्शन सुरु होत तेव्हा मात्र त्यांनी apply केलं आणि त्यांचा नासा संस्थेत प्रवेश झाला
अंतराळ स्थानकात जाण्यासाठी त्यांना विशेष ,कठीण ट्रेनिंग दिल्या जात त्या मुळे तयारी असते भीती वाटत नाही अस त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं त्यांच्यासाठी रोजच कामच आव्हानात्मक असत आणि कोठल्याही फिल्डमध्ये काम करताना संघर्ष करावा लागतोच म्हणून आपल ध्येय साध्य करण्याची जिद्द हवी आणि त्यासाठी कठीण संघर्ष करायची तयारीही !
अंतराळ स्थानकात मागच्या मोहिमेच्या वेळेस स्पेस क्राफ्ट मध्ये येताना ballistic एन्ट्री घ्यावी लागते तेव्हा मात्र सामान्य प्रेशर पेक्षा आठपट अधिक प्रेशर शरीरावर पडल्याने खूप कठीण अवस्था झाली
पुढच्या जन्मीही त्यांना Astronaut व्हायला आवडेल आणि आता त्या समाधानी आहेत त्यांना घरच्यांचा पूर्ण पाठिंबा आहे त्या मुळेच आज मी स्थानकात आहे असे त्यांनी सांगितल महिला Astronaut म्हणून त्यांना विशेष त्रास झाला नाही पण स्थानकातील खराब टॉयलेट दुरुस्त करण्यात आल्याआल्या एक दिवस वाया गेल्याच त्यांनी सांगितल
सुदैवाने माझे सहकारी मनमिळाऊ व खेळकर आहेत ते आपल काम निष्ठेने करतात त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना खूप आनंद होतो असं त्यांनी सांगितल फक्त स्थानकातीलच नाही तर आम्ही Houston ,Japan ,Mascow इथल्या वेगवेगळ्या स्टेशनशी जोडलेले असतो त्यांच्या टीमच्या सतत संपर्कात असतो आम्ही सारेजण अंतराळ स्थानकात एका कुटुंबासारखे राहतो ,वेगवेगळे प्रयोग करतो आणि काम संपले की एकत्र येतो गप्पा मारतो जेवण करतो
इथल अन्न पृथ्वीवरून आलेल व डिहायड्रेटेड असत स्थानकात काही यंत्र आहेत त्या मध्ये पाण्यासोबत गरम करून ते खाता येत अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मध्ये पाणी किंवा इतर द्रव्य पदार्थ पिण अत्यंत कठीण असत कारण पाण्याचे थेंबही तिथे तरंगतात तेव्हा त्यांना पकडण्याची कसरत मजेशीर असते अस म्हणत त्यांनी त्याच प्रात्यक्षित करून दाखवल पाणी पिण सोप व्ह्याव म्हणून पाण्याच्या पाऊचला विशीष्ट प्रकारे straw बसवलेला असतो हव तेव्हा दाब देऊन थेंब ,थेंब काढून पाणी प्याव लागत आणि नंतर त्याच तोंड बंद करावं लागत नाहीतर पाणी थेंबाच्या स्वरूपात सर्वत्र तरंगत आणि संपून जात हीच मजा कॅण्डी कोटेड बदाम खाताना येते हेही त्यांनी दाखवल


              Peggy Whitson  विध्यार्थ्यांना विशिष्ट straw व ज्युसचा बबल दाखवताना    फोटो -नासा संस्था



   Peggy Whitson  स्थानकातील तरंगणारे कँडी कोटेड बदाम दाखवताना -फोटो -नासा संस्था

Peggy शेतकरी कुटुंबातली असल्याने त्यांना बागकाम आवडते त्यांनी आधीच्या अंतराळ मोहिमेत स्थानकात कोबी आणि सोयाची यशस्वी लागवड केली होती तिच्या वडिलांचा सोया फॉर्म आहे
अजूनतरी कोणालाही स्थानकाबाहेर अंतराळात कोणतीही विचित्र व अजब वस्तू दिसलेली नाही पण पृथ्वीवरून दिसणारे आणि खाली पडणारे तारे मात्र स्थानकातून पाहताना त्यांना त्यांच्या आजूबाजूला फिरताना दिसतात ते अलौकीक सौन्दर्य पाहण्याचा क्षण विलक्षण असतो
पृथ्वीबाहेर जीवसृष्टी आहे का ? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना Peggy नीं सांगितलं कि नासाच्या वेगवेगळ्या मोहिमांद्वारे पृथ्वी बाहेरील जीवसृष्ठीचा शोध घेतल्या जातोय आणि आता पर्यंत असे हजारो ग्रह सापडलेत जे पृथ्वीसारखे असू शकतील तिथे नक्कीच जीवसृष्ठी असेल अशी शास्त्रज्ञांना आशा वाटतेय फक्त तिथली जीवसृष्ठी ,मानव व झाडे वेगळ्या स्वरूपात असतील.
रोज रात्री तिथे पृथ्वीवरच्या सारखा थकवा येतो का ? space walk च्या वेळेस भीती वाटते का ?
थकवा तर जाणवतोच पण इथे उभ्या अवस्थेत झोप घ्यावी लागते तिथल्या वातावरणाचा झोपेवर व शरीरातील सर्वच सिस्टीम्सवर परिणाम होतो
अंतराळ स्थानक तासाला 90 कि.मी.इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरत पण  space walk करताना लक्ष कामाकडे असल्यामुळे मुळे भीती जाणवत नाही पण फोटो काढण्याचा प्रयत्न करताना मात्र वेग जाणवतोच
अंतराळवीर होण्यासाठी इंजिनिअरच्या कुठल्याही शाखेची पदवी घेणं आवश्यक आहे शिवाय सायन्स व maths मधील पदवी व स्पेशलायझेशन आवश्यक आहे अंतराळ स्थानकात वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत संशोधनही सुरु आहे त्या मुळे तिथे डॉक्टर्स ,physicist ,space engineer aviation engineer pilots आणि इतर शाखेचे इंजिनीअर्स  कार्यरत आहेत Peggy Biochemist आहेत ह्या कोणत्याही शाखेत नैपुण्य मिळवण आवश्यक आहे तरच नासा संस्थेत प्रवेश मिळु शकतो असे तिने विध्यार्थ्यांना सांगितले 

No comments:

Post a Comment