अंतराळ स्थानकात उगवलेली चायनीज कोबीची ताजी पाने फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 17 feb.
नासाच्या मोहीम 50 च्या अंतराळ वीरांगना Peggy Whitson ह्यांच्या महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर अंतराळ स्थानकात अखेर चायनीज कोबी उगवली आहे
17 feb.ला अंतराळस्थानकात उगवलेल्या ह्या ताज्या चायनीज कोबीचा अंतराळवीर आता आस्वाद घेतील
पण पूर्ण कोबी मात्र त्यांना खाता येणार नाही त्याची काही पाने संशोधन करण्यासाठी ते संशोधकांना देतील पृथीवर उगवलेली आणि अंतराळात उगवलेली कोबी ह्यातील फरक संशोधक संशोधनाअंती नमूद करतील अंतराळस्थानकातील रोपांची हि पाचवी यशस्वी लागवड असली तरीही अंतराळस्थानकात चायनीज कोबी मात्र पहिल्यांदाच उगवली आहे
ह्या veggy project च्या मॅनेजर Nicole Dufour ह्यांनी ह्याचे सारे श्रेय Peggy Whitson ह्यांना दिले असून हे यश कल्पनातीत आणि मोठे असल्याचे म्हटले आहे
पेगी ह्यांना लहानपणापासूनच gardening ची आवड असल्याचे त्यांनी सांगितले होते त्यांनी ह्या आधीही स्थानकात यशस्वी रोप लागवड केली होती सुरवातीला कोबीचे रोप थोडे उंचावर लावल्या गेल्यामुळे रोपाला नीट पाणी पोहोचत नव्हते हे पेगी ह्यांच्या लक्षात येताच त्यांनी हार न मानता पुन्हा रोप उशी वाफाऱ्यात व्यवस्थित लावले आणि त्याची योग्य निगा राखली महिनाभरात त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि स्थानकात हिरवी ताजी कोबी उगवली आणि अंतराळवीरांना ती खायलाही मिळाली पण सध्या अंतराळस्थानकात रोप लागवडीसाठी अत्यंत कमी जागा उपलब्ध आहे त्या साठी त्यांना मोठया रूमची आवश्यकता असल्याचे पेगी ह्यांनी सांगितले
अंतराळ स्थानकात उगवलेली चायनीज कोबी काढताना Astronaut PeggyWhitson फोटो- नासा संस्था
ह्या चायनीज कोबीची निवड इतर अनेक भाजींच्या चवी चाखून, पोषकता आणि अंतराळात वाढण्याची क्षमता तपासून करण्यात आली शेवटच्या चार भाज्यांच्या रोपामधून जास्त चविष्ठ व पोषक अशा ह्या चायनीज भाजीची निवड केल्या गेली
अंतराळातील झिरो ग्रॅव्हिटी मुळे शरीरातील द्रव्य पदार्थ वरून खाली न वाहता शरीरात सामान रीतीने पसरतात त्या मुळे सर्दी सारखी अवस्था होते आणि वास व चव घेण्याची अंतराळवीरांची क्षमता कमी होते
अंतराळवीरांना म्हणूनच त्यांचे जेवण रुचकर बनवण्यासाठी सोया सॉस ,हॉट सॉसचा वापर वरून करावा लागतो ह्यावर उपाय म्हणून अंतराळ स्थानकात चवदार रुचकर भाजीची लागवड करण्याचा project राबवण्यात आला आणि त्याला Peggy ह्यांच्या प्रयत्नाने यश मिळाल आहे
आता ह्या पुढच्या Resupply Mission मध्ये आणखी नवी रोपे पाठवण्यात येतील आणि त्यांचे निरीक्षण नोंदवून संशोधन करण्यात येईल ह्या मुळे पेगी सारख्या gardening ची आवड असणारया अंतराळवीरांना लागवडीचा आनंद तिथल्या रुक्ष वातावरणात मिळेलच शिवाय ताजी भाजीही खायला मिळेल लवकरच अंतराळ स्थानकात Arobidopsis हे फुलणारे genetic value असलेले रोप genetic अभ्यासासाठी पाठवण्यात येणार आहे ह्याचा उपयोग आगामी दूरवरच्या अंतराळमोहिमांसाठी होईल

No comments:
Post a Comment